सापिंड्यनिषेध
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
‘ सपिंड ’ शब्दाचा समासदृष्टीने विचार करिता ज्यांचे पिंड समान म्हणजे मूळचे एकच आहेत ते, असा या शब्दाचा अर्थ होतो. मत्स्यपुराणात या शब्दाची व्याख्या लिहिली आहे, तीत श्राद्धी पिंड देणारा पुरुष व त्याच्या वरच्या पिढीचे सहा पुरुष मिळून सात पुरुषांमध्ये सपिंडसंबंध राहात असल्याचे सांगितले आहे. श्राद्धकर्त्याचा आजा, व पणजा यास ‘ पिंडभाक ’ आणि त्यांच्या वरच्या तीन पिढ्यांच्या पुरुषास ‘ लेपभाक ’ अशा विशेस्ष संज्ञा या व्याख्येत दिल्या आहेत.
विवाहाचे नाते जोडले गेल्याबरोबर पत्नीची योग्यता पतीच्या बरोबरीचे व अर्धांगीपणाची होते, यामुळे तिची गणना सपिंडात समजावी लागते; एवढेच नव्हे, तर श्राद्धकर्ता आपल्या चुलत्याचेही श्राद्ध करू शकतो; यामुळे चुलत्याची पण गणना सपिंडात होऊ शकते. अशा रीतीने श्राद्ध करिता आले की श्राद्धाचा विषयीभूत मनुष्य सपिंडांत शिरू लागेल; व गयाश्राद्द इत्यादी प्रसंगी पाहिजे त्या मनुष्याच्या नावाने पिंड देता येतो. यासाठी ज्याचे श्राद्ध केले त्याच्या कनेस सपिंड संज्ञा प्राप्त होऊन तिच्याशी विवाह करण्याची गोष्टही मनात आणिता कामाची नाही असा प्रसंग साहजिकच येईल. हा अनवस्था प्रसंग टाळण्याकरिता ‘ अवयवांपासून अवयव झालेले ’ असणे याचे नाव ‘ सपिंडसंबंध ’ अशी या शब्दाई एक निराळी व्याख्या लिहिला आहे.
ही व्याख्या कबूल केली असता प्रत्येक मनुष्यप्राण्याची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली असल्याने प्रत्येक पुरुष व प्रत्येक स्त्री यांमध्ये सापिंड्य उत्पन्न होऊन कोणीही कोणाशी विवाह करू नयेअ असेही पण मानण्याचा साहसिक प्रसंग येऊ पाहणार. यासाठी तो टाळण्याकरिता, मातेच्या बाजूने सातव्या पिढीची कन्या ही सपिंडसंबंधाची परमावधी मानून त्या वधीच्या पलीकडच्या स्त्रीपुरुषांचा संबंध होण्यास अडचण नाही असा संकोचपक्ष शास्त्रकारांनी स्वीकारिला आहे. ही पाचवी व सातवी पिढी पाहू लागण्याचा आरंभ मूळात एकाच पुरुषापासून करावा लागतो, व अशा पुरुषास ‘ कूटस्थ पुरुष ’ म्हणतात. वधूच्या बाजूच्या पिढ्यांच्या गणनेत सर्वच पिढ्या पुरुषांच्या असल्या पाहिजेत असा नियम नसून स्त्रियांच्या पिढ्या परगोत्रात गेल्या असल्या तरी चालतात.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP