मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा|
सूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे

सूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


येथपर्यन्त सांगितलेली बाह्य लक्षणे व अशाच प्रकारची इतर लक्षणे ग्रंथान्तरी कोठे आढळून आल्यास ती, ही सर्व कन्येकडे नुसते पाहिल्याबरोबर ताबडतोब दिसून येऊ शकतात. या लक्षणांप्रमाणे अंगाच्या बाह्य भागावर स्पष्ट दिसू शकणारी, परंतु मुद्दाम पाहात बसल्याखेरीज अगर शास्त्रीय पद्धतीने विशेष खटपट केल्याशिवाय न कळणारी काही चिन्हे असतात. ती हातापायांवरील रेघा, अंगावर उमटलेल्या तिळांसारख्या खुणा, चेहरा व मस्तकाची कवटी यांच्यावरील उंचगटे अगर खोलगटपणा यांची परस्परांशी प्रमाणे इत्यादी होत.
हातापायांवरील रेघांचा अर्थ जाणण्याचे साधन सामुद्रिकशास्त्र होय. या शास्त्रानुसार सामुद्रिकाची लक्षणे काशीखंड, बृहत्संहिता इत्यादी ग्रंथांत लिहिली आहेत. तिळांचे अर्थ समजण्याचे ग्रंथ कोणते यांची नावे कोठे पाहण्यात आली नाहीत. “ फ़ेनॉलजी ” या संज्ञेने प्रसिद्ध झाले आहे. आमच्या देशातील कोणी अर्वाचीन शोधक या शास्त्रास “ मस्तुलुंगविज्ञानशास्त्र ” हे नाव देतात, व त्यास आर्यग्रंथात आधार असल्याचेही सांगतात, परंतु ही गोष्ट अद्यापि सर्वत्र मान्य झालेली नाही.

 ही लक्षणे जाणण्याचे महत्त्व :
कित्येक प्रसंगी असे घडते की, शास्त्रनिषिद्ध बाह्यचिन्हे स्पष्ट उमटली नसतात, तथापि तद्विषयज्ञ मनुष्यास त्यांचे पूर्ण स्वरूपच अगोदरच कळून येण्यासारखे असते. वयाच्या मानाने मुलीची अंगलट व तिच्या शरीराची कान्ती यांवरून हे पूर्व स्वरूप प्राय: जाणावयाचे असते, व चौकशीअंती त्या पूर्व स्वरूपावरून मनास वाटलेली प्रतिकूल कल्पना खरी ठरली असे अनेक प्रसंगी घडून येते.
महाव्याधी, दमा, क्षय, अपस्मार, हिस्टेरिया इत्यादी अनेअक रोग मनुष्याच्या अंगी आनुवंशिक क्रमाने येण्याची शक्यता असते, व यासाठी मुलीच्या प्रथमदर्शनप्रसंगी या रोगाच्या चिन्हांविषयी कल्पना घेण्याचे काही कारण वाटले नाही. तथापि दूरदृष्टी मनुष्याने अशा रोगांपासून मुलीच्या घराण्यातील कोणास काही अपाय घडले आहेत अगर कसे, व घडले असल्यास किती जवळच्या अगर दूरच्या नात्यात, इत्यादी प्रकारचा शोध करणे अत्यंत अगत्याचे आहे यात संशय नाही. तात्पर्य, कुळाची परीक्षा करिताना बर्‍या अगर वाईट गुणांच्या माणसांबद्दल चौकशी करावयाची, त्याचप्रमाणे हीही चौकशी होणे अत्यंत अगत्याचे आहे.


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP