वधूची अंतर्लक्षणे; स्वभावपरीक्षा
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
आता अंतर्लक्षणाविषयी विचार करावयाचा. मागे कलम ११ व १२ यांत कठोर शब्दांनी बडबड करणारी अगर भांडखोर कन्या वर्ज्य समजावी, व हळूहळू आवाजाची कन्या ग्राह्य समजावी, अशा प्रकारचा मनू व शातातप या शास्त्राकारांचा अभिप्राय असल्याचे लिहिले आहे, त्यावरून शरीराच्या बाह्य स्वरूपाबरोबर कन्येच्या स्वभावाचीही थोडीबहुत परीक्षा करावी असे सांगण्याचा त्या शास्त्रकारांचा हेतू स्पष्ट दिसतो. तसेच चांडालजातीत ज्या प्रकारचे नाव ठेवितात त्या प्रकारच्या नावाची, अगर डाकिनी, राक्षसी इत्यादी प्रकारच्या भयंकर नावाची कन्या त्याज्य समजावी असेअ जे मनुवचन लिहिले आहे, त्याचे पर्यवसानही तिच्या स्वभावाची परीक्षा होणे अवश्य आहे हे सांगण्याच्या रूपानेच असले पाहिजे. असेही पण मानण्यास काही हरकत नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP