मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|मराठीतील स्त्रीधन| गडयीन (मैत्रीण) मराठीतील स्त्रीधन गडयीन (मैत्रीण) भोंडला ( हातगा ) गौरी पूजन डोहाळे उखाणा ( आहाणा ) बाळराजा सासुरवास शेजी कुलदैवत देवादिकांचीं गाणीं लक्ष्मी आई एकादशी कृष्णा कोयना उगवला नारायण तुळस श्रीकृष्णाची गाणीं मारुती राम आणि सीता ज्ञानदेव विठ्ठल रखुमाई पालखी सातवी मुलगी बेरका प्रधान तुकाराम स्त्रीधन - गडयीन (मैत्रीण) लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे. Tags : folk songgeetगीतलोकगीतस्त्री गडयीन (मैत्रीण) Translation - भाषांतर जिवाभावाची गोष्ट करायला बरोबरीचें, शिणजोडीचें माणूस या दृष्टीनें माणसाच्या आयुष्यामध्यें मित्राला अगर मैत्रिणीला फार मानाचें स्थान आहे. कोणत्याहि विषयावर निःशंकपणें विचार विनिमय करावयाचा झाला, तर त्यासाठीं स्नेह्याची माणसाला फार आवश्यकता असते. जें घरच्या माणसांजवळ मोकळ्या मनानें बोलतां येत नाहीं, तें अशा मित्राजवळ माणूस बोलूं शकतो. लोकगीतांमध्येंहि या मैत्रीच्या जिव्हाळ्याचा आविष्कार झालेला आहे. विशेषतः आमच्या खेडुत भगिनींनीं मैत्रिणीला गडन किंवा गडयीन म्हटलें असून तिचें व आपलें नातें मोठें खुलवून सांगितलेलें आहे.गडन मी ग केली इंद्रसभेची पद्मीन तुळशी दिल्यात्या जामीनतुज्या ग जिवासाठी जीवमाजा त्यो भिरीभिरी एक इळाची घाल फेरीइंद्रसभेची पद्मीन म्हणून एकजण आपल्या मैत्रिणीचा इथें गौरव करीत आहे ! आणि ती पद्मीन मिळविण्यासाठीं तुळशीसारखी पवित्र वस्तु जामीन दिल्याचें ती सांगत आहे ! मैत्रिणीबद्दलची ही भावना मोठी उदात्त तशीच कल्पनारम्यहि आहे. अशी ही मैत्रीण दररोज एकदां तरी भेटावी म्हणून जीव खुळा भैरा झाला असल्याची इथें आलेली हकीकत विशेष जिव्हाळा दर्शवीत आहे.गडन म्यां बी केली जन लोकांत नसावा लोभ अंतरीं असावागडन म्यां बी केली गांव राहिलं बारा कोस लोभ कशाला लावलासगडनी गूज बोलूं तूज्या गुजाचं मला याड गेली चांदनी सोप्या आडचांदणी सोप्याआड होईपर्यंत गुजगोष्ट करावयाचें वेड लागले असतांना; दूरच्या गांवी गेलेल्या मैत्रिणीचा विरह सहन होत नसल्याची माहिती इथें आली आहे. त्याचप्रमाणें अंतःकरणामध्यें लोभ असणें अगत्याचें आहे, मग चार लोकांत वाच्यता होण्याची गरज नाहीं, याहि महत्त्वाच्या कल्पनेचा इथें सुंदर रीतीनें आविष्कार झालेला आहे.गडन म्यां बी केली सये चांबाबीराची चिमाबंदुच्या बुटावरी राघूमैना घाली झिम्मागडन म्यां बी केली न्हवं आपल्या जातीयीचीजिवाला माज्या जड आली मध्यान रातीयीचीगडन म्यां बी केली हातीं निर्यायाचा घोळमाजी ती गडयीन आली वाड्याला चंद्रावळवाट वैला वड त्येला पारंब्या ठाईठाईमाजे तूं गडयीनी येल इस्तार तुजा लईस्नेहाला जातीगोतीचें बंधन असूं शकत नाहीं, अशी माहिती या गीतांनीं अभिमानानें सांगितली आहे. भावाच्या बुटावरील (इथें पायांतील कोणत्याहि पादत्राणाचा उल्लेख करतात.) नक्षीकाम बघून चांभाराची चिमा ही मैत्रीण असल्याचें सांगितलें आहे. त्याचबरोबर ती आपल्या जातीची नसली तरी मध्यान्ह रात्रीलाहि वेळप्रसंगी उपयोगी पडत असल्याचें म्हटलें आहे ! अशा मैत्रिणीच्या सौंदर्याचा उल्लेख 'चंद्रावळ' या शब्दानें केला असून तिचा थाट निर्यांच्या घोळावरून व्यक्त केलेला आहे. म्हणजे नऊवारी भरपूर लांबरुंद लुगडें ती नेसली होती असें यावरून दिसतें. वडाला ज्याप्रमाणें पारंब्या त्याप्रमाणें मैत्रीचा वेलविस्तार मोठा असल्याची या गीतांत आलेली कल्पना मोठी अभिनव आहे.तुजा माजा भावपना जना जायीरी नसावामाजे तूं गडयीनी बोल हुरदीं नटावातुजा माजा भावपना घडी जाईना पारायाचीमाजे तूं गडयीनी कडी उगड दारायाचीतुजा माजा भावपना कुनीं कालीयील राळमाजे तूं गडयीनी नग मनांत आनूं काळंआपलें प्रेम मनांतच असूं दे आणि कुणीं कांहीं म्हटलें (मनांत राळे कालविले) तरी तें लक्षांत न घेतां आपण सुखानें नांदूया, अशी प्रेमळ विनंति करून या गीतानें घटकाभरहि तुझ्याखेरीज करमत नसल्यानें तूं दार उघडून मला जवळ घे, अशी सूचना एका मैत्रिणीनें आपल्या सखीला केली असल्याचें सांगितलें आहे. ही मैत्रीण जणुं रुसली असावी आणि म्हणून तिची समजूत घालण्याचा हा प्रयत्न केला असावा, असें या भाषेवरून लक्षांत येतें.सुक सांगतांना दुक माजं ग उचमळंमाजे तूं गडयीनी नको पान्यानं भरू डोळगडन म्यां बी केली मी ग तिला काय देऊंमाजे तूं गडयीनी एक लवंग दोगी खाऊंआपल्या सुखदुःखाच्या गोष्टी ऐकून तूं एवढी भावनावश होऊं नकोस म्हणून एक सखी इथें दुसरीला विनवीत आहे. दोघींच्या भावना जणुं एकजीव झाल्याचीच ही प्रेमळ निशाणी होय. एकमेकींना देण्याजोगें जवळ कांहीं नसलें, तरी जें मिळेल तें दोघी खाऊं या, अशी कल्पना लवंगेच्या निमित्तानें इथें व्यक्त झाली आहे. म्हणजे देण्याघेण्यापेक्षां प्रेमळ शब्दाला किती महत्त्व आहे, तें इथें मोठ्या युक्तीनें व्यक्त केलेलें आहे.सारविल्या भित्तीवर सये चित्तार काडूं कितीलाडक्या गडनीला तिला पत्तार धाडूं कितीमैत्रिणींच्यामधील निष्काम आणि जिव्हाळ्याच्या प्रेमानें नटलेली ही ओवी एक फार सुंदर कल्पना जगापुढें ठेवीत आहे.घरची भिंत सारविली असतां निर्माण होणारी रेखाकृति म्हणजेच जणुं अक्षरावलींनीं नटलेलें पत्र ही इथें आलेली भावना मोठी ह्रदयस्पर्थी आहे. तशीच कल्पनारम्यहि आहे. एकीनें भिंत सारविली असतांना त्या घटकेला तिच्या मनांत येणारे भाव दुसरी भिंत सारवीत असतां शेंकडों मैलांचे अंतर तोडून एका क्षणांत तिच्याजवळ जाऊं शकतात, अशी ही जिव्हाळ्यानें रंगविलेली अद्भुतरम्य कल्पना आहे !स्नेहाच्या बंधनांनीं जखडलेल्या जिवांच्या अशा कितीक भावना आणखी अन्य प्रकारांनीं लोकगीतांनी बोलून दाखविल्या असतील देव जाणे !परंतु मला गवसलेल्या या सुंदर गीतांनीं खर्या मित्रप्रेमाचा महिमा गाइलेला आहे आणि तो सहज सुंदरहि झाला आहे.जुन्या काळीं मैत्रीला जातीचें बंधन आडवें येत नसे, अशी या गीतांनीं सांगितलेल्या एका अपूर्वाईच्या माहितीनें नागपंचमीच्या 'चल ग सये वारुळाला' या गीतांतहि पुनरुच्चार केला असून आजच्या घडीलाहि त्याचें महत्त्व कायम राखण्याची अगत्यपूर्वक सूचना केली आहे असें म्हणता येईल ! N/A References : N/A Last Updated : December 20, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP