-
क्रि.वि. अंगावर रोमांच , शाहारे उभे राहतील असे ; कांपरे भरुन ; थंडी - थरकांप होऊन . ( क्रि० कापणे ; भिणे ). [ ध्व . ]
-
पु. १ पापुद्रा ; पडदा ; स्तर ; मढवण ( गिलावा , लेप , रंग इ० ची ). २ रास ; ढीग ( फळे , फुले , पाने , शेण , भांडी इ० ची ). ३ समुदाय ; समूह . ४ या शब्दाचा प्रत , जात , वर्ग वगैरे अर्थी कांही विवक्षित शब्दांबरोबर उपयोग करतात ; जसे :- पुणे - मुंबईथर = पुण्यामुंबईकडील जिन्नस , रत्न इ० ; ब्राह्मण - कुणबी थर = ब्राह्मण , कुणबी इ० कांस योग्य असे ( पोशाख , कपडे इ० ); काळे , कुपे , जांबे - थर = काळे इ० रंगाचे खडक . [ सं . स्तृ - स्तर ; फा . ] ( वाप्र . ) थरास जाणे , येणे - कोणत्या तरी शेवटास पोहोचणे ( काम . ) त्याचा माझा वाद पडला आहे मग कोणत्या थरास जातो पहावे .
-
ना. पडदा , पापुद्रा , स्तर ;
-
ना. गिलावा , लेपन ;
Site Search
Input language: