होळीची गाणी - विंझनी वारा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
विंझनी वारा
काली कांबोटी देवलात वाटी
खेलणारनी कोणकोण आल्या ग?
सगल्या आल्या, सगल्या आल्या
एखलीच ग तारू नाय आली
तारू घरान काय करीते?
माल्याला लिसणी लावते
घुड्याचं तांदूल काढीते
म्हशीचे दुधनं धुवीते
गायीचे दुधानं रांधीते
भरताता जेवण वाढीते
जेवता जेवता फ़ुटला घाम
विंझनी वारा घाल गं
तुझा डझनी चुडा लाल गं
तुझा पितांबराचा घोल गं
तुझा कडीवं तान्हा बाल गं
त्याचे डोकीन टोपी लाल गं.......
पंख्याने वारा
काळे झाड-कंबोटी, देवळात ठेवली वाटी
खेळणार्या कोणकोण आल्या ग?
सगळ्या आल्या, सगळ्या आल्या
एकटीच ग तारू नाही आली
तारू घरात काय करीते?
तारू माळ्याला शिडी लावीते
सुवासिक तांदूळ काढते
म्हशीच्या दुधाने तांदूळ धुते
गायीच्या दुधात शिजवते
भ्रताराला जेवण वाढते...
जेवता जेवता त्याला फ़ुटला घाम
तारू, पंख्याने वारा घाल ग
तुझ्या डझनभर बांगड्या लाल ग
तुझ्या पितांबराचा घोळ ग
तुझ्या कडेवर तान्हे बाळ ग
त्याच्या डोक्यावर टोपी लाल ग
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP