होळीची गाणी - वाटंवरचा मुहू
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
वाटंवरचा मुहू
वाटंवरचा मुहू टिबक्या गलं, टिबक्या गलं
तथं गोवारी सोंगट्या खेलं, सोंगट्या खेलं
अरं अरं गोवार्या गायी कोठं गेल्या
गायी तं गेल्या तांबडे माला, तांबडे माला
तांबडे मालाचा वाघोबा देवू, वाघोबा देवू
वाघोबा देवाचे जतरंला जावा
काजल कुंकू संगी नेवा
मोहाच्या दारवा, धारंला न्यावा
वाटेवरचे मोहाचे झाड
वाटेवरच्या मोहाच्या झाडाची फ़ुले झडतात
तेथे गुराखी सोंगट्या खेळतात
अरे अरे गुराख्या,गायी कोठे गेल्या
गायी तर गेल्या तांबड्या माळावर
तांबड्या माळाच्या वाघोबा देव
वाघोबा देवाच्या जत्रेला जाऊया
काजळ-कुंकू सोबत नेऊया
मोहाची दारू, देवावर धार धरण्यासाठी नेऊया
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP