होळीची गाणी - होलुबायला शिणगार

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


होलुबायला शिणगार
होलुबायला शिणगार कशाचा गं केला
होलुबायला शिणगार कुंकवाचा ग केला

होलुबायला शिणगार कशाचा गं केला
होलुबायला शिणगार बांगड्यांचा ग केला

होलुबायला शिणगार कशाचा गं केला
होलुबायला शिणगार नारलांचा ग केला

होलुबायला शिणगार कशाचा गं केला
होलुबायला शिणगार पापड्यांचा ग केला

होलुबायला शिणगार कशाचा गं केला
होलुबायला शिणगार चामट्यांचा ग केला

होळीबाईचा शृंगार
होळीबाईचा शृंगार कशाने ग केला
होळीबाईचा शृंगार कुंकवाने ग केला

होळीबाईचा शृंगार कशाने ग केला
होळीबाईचा शृंगार बांगड्यांनी ग केला

होळीबाईचा शृंगार कशाने ग केला
होळीबाईचा शृंगार नारळांनी ग केला

होळीबाईचा शृंगार कशाने ग केला
होळीबाईचा शृंगार पापड्यांनी ग केला

होळीबाईचा शृंगार कशाने ग केला
होळीबाईचा शृंगार चामट्यांचानी ग केला

होळीच्या काठीला बांगड्या, नारळ,पापड्या,चामट्या अशा वस्तू बांधलेल्या असतात. हळदकुंकू,नारळ वाहून, पूजा करून होळी पेटवली जाते. चामट्या हा काकडी, गूळ व पीठ यांपासून बनवलेला पदार्थ होळीचा प्रसाद असतो.

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP