होळीची गाणी - मांगते
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
मांगते
गावचे पाटला निजीला का जागा रं
होलूबाय मांगते फ़ेरव्याचा लेणा गं....
गावचे पाटला निजीला का जागा रं
होलूबाय मांगते साड्यांचा लेणा गं....
गावचे पाटला निजीला का जागा रं
होलूबाय मांगते बांगड्यांचा लेणा गं....
गावचे पाटला निजीला का जागा रं
होलूबाय मांगते पट्ट्यांचा लेणा गं....
मागते
गावच्या पाटला निजला की जागा रे
होळीबाई मागते जोडव्यांचे लेणे ग.....
गावच्या पाटला निजला की जागा रे
होळीबाई मागते साड्यांचे लेणे ग.....
गावच्या पाटला निजला की जागा रे
होळीबाई मागते बांगड्यांचे लेणे ग.....
गावच्या पाटला निजला की जागा रे
होळीबाई मागते पैंजणांचे लेणे ग.....
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP