होळीची गाणी - बोरां
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
बोरां
वाटंवरले बोरीची मी बोरां खाते, मी बोरां खाते
बोरां खाऊन मी गंग जाते, मी गंग जाते
गंगचा पाणी आटेला, मी विहिरी जाते
विहिरी दुडी भरील्या, मी घरां जाते
घरां पाव्हणा आला त्याला मी बसका देते
तान्हा बाल लडं त्याला मी झोली घालते
घरां पाव्हणा आला त्याला मी जेवण देते
बोरे
वाटेवरल्या बोरीची मी बोरे खाते
बोरे खाऊन मी नदीवर जाते
नदीचे पाणी आटले, मी विहिरीवर जाते
विहिरीवर घागरी भरल्या, मी घरी जाते
घरी पाहुणा आला त्याला मी आसन देते
तान्हे बाळ रडते त्याला झोळीत घालते
घरी पाहुणा आला त्याला जेवायला वाढते
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP