होळीची गाणी - दादा येशी रं
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
दादा येशी रं
दादा येशी रं माझे घरी पाव्हण्या
कंबरं धोती रं नेकले जरीचा
दादा येशी रं माझे घरी पाव्हण्या
अंगात अंगरखा नेकले रेसमाचा
दादा येशी रं माझे घरी पाव्हण्या
डोकीत पागोटी नेकले सोन्याची
दादा येशी रं माझे घरी पाव्हण्या
दादा येशील
दादा येशील रे माझ्या घरी पाहुणा
कंबरेला धोतर रे अस्सल जरीचे
दादा येशील रे माझ्या घरी पाहुणा
अंगात अंगरखा अस्साल रेशमाचा
दादा येशील रे माझ्या घरी पाहुणा
डोक्याला पागोटे अस्सल सोन्याचे
दादा येशील रे माझ्या घरी पाहुणा
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP