होळीची गाणी - माहेरी पाठवाव्या
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
माहेरी पाठवाव्या
चिवंवं बसला चिचुकला हट्या फ़ोलीत जाय
तिकडून आला शेकडोबा तं रूमाल झेलीत जाय
अस्सा रूमाल चांगला तो शेवंती गुंतेल
अश्शा शेवंती चांगल्या तो टोकर तोडावं
अस्सा टोकर चांगला तं चिंबीशा पाडाव्या
अश्शा चिंबी चांगल्या तं खडस पाडावं
अस्स खडस चांगलं तं दुरंड्या विण्व्या
अश्शा दुरंड्या चांगल्या तं गाडीत ठेवाव्या
अश्शा गाड्या चांगल्या तं माहेरी पाठवाव्या
माहेरी पाठवाव्या
चिंचेवर ’चिचुकला’ पक्षी बसला आहे
तो आठोळ्या फ़ोडीत जातो
पलीकडून ’शेकडोबा’ रूमाल उडवीत येतो
अस्सा रूमाल चांगला की शेवंती गुंफ़ावी
अश्शी शेवंती चांगली की बांबू तोडावा
अस्सा बांबू चागला की तुकडे कापावे
अस्से तुकडे चांगले की रीपा कराव्या
अश्शा रीपा चांगल्या की दुरड्या विणाव्या
अश्शा दुरड्या चांगल्या की गाडीत ठेवाव्या
अश्शी गाडी चांगली की माहेरी पाठवावी
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP