मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड| अध्याय ६६ वा काशी खंड प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा काशीखंड - अध्याय ६६ वा स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे. Tags : kashikhandapothipuranकाशीखंडपुराणपोथी अध्याय ६६ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ अगस्तीसी वदे शिव कुमर ॥ आतां परियेसीं कथेचा पुढार ॥ रत्नें प्रसवला नंदिकेश्वर ॥ तीं टाकिलीं सागरीं ॥१॥सह्स्त्र एक संवत्सरवरी ॥ रत्नें होतीं क्षीर सागरीं ॥ मग प्रयत्न मांडिला सुरवरीं ॥ तो कैसा आतां ॥२॥क्षीरार्णवाची करूनि कुरवंडी ॥ मंदराचळ केला रवि दांडी ॥ मग रत्नें काढिलीं परवडी ॥ सुरीं असुरीं ॥३॥अगस्तीसी वदे शिव नंदन ॥ हें पूर्वी जाहालें एक सिंधुमथन ॥ मग जैं उत्पत्तीसी जाहाला नंदी पावन ॥ तैं जाहालें दुसरें ॥४॥प्रथम मथिला श्रीर सागर ॥ चौसष्ट लक्ष जयाचा पसर ॥ दुसरे मथनीं नंदि केश्वर ॥ तो उदधि अष्टलक्ष ॥५॥आतां असो पुढें कथा कैसी ॥ नंदि केश्वर आला पित्या पासीं ॥ मग तो आनंदला शिखि ऋषी ॥ पुत्र दर्शनें ॥६॥तेणें वंदिला आपुला पितर ॥ कथिला क्षीरार्णवींचा विचार ॥ तेथें मानवला शार्ङ्गधर ॥ सहगर्णेंसीं ॥७॥मग नंदी पित्यासी वदे वचन ॥ मी क्षुधें अतृप्त जाहालों पूर्ण ॥ आतां मज भक्ष्य पाहिजे तृण ॥ वृक्षवल्लीपर्णें ॥८॥मग शिखी म्हणे कुमरा ॥ तूं गमन करीं अमर पुरा ॥ इंद्रा जिंकोनि तूं सैरा ॥ भक्षीं खांडववन त्याचें ॥९॥त्रिलोकींच्या नाना वनस्पती ॥ ज्या अमोघ असाध्य देवां प्रती ॥ तेथीं चिया सुमनें सुरपती ॥ तृप्त करीं शिवासी ॥१०॥मग तो काय करी नंदीगण ॥ पितृचरणीं केलें अभिवंदन ॥ मग पावला तो खांडववन ॥ सुरपतीचें ॥११॥त्या सुवर्णा चलाचे पाठारीं ॥ पूर्व भागीं असे ते अमर पुरी ॥ मेरुतळवटीं क्षितीवरी ॥ खांडववन तें ॥१२॥त्या खांडववनाचा पसर ॥ सहस्त्र योजनें असे विस्तार ॥ त्या पत्रीं पुष्पीं पूजितां हर ॥ मानवे इंद्रासी ॥१३॥ऐसें तें खांडववन क्षितितळीं ॥ भोंवतीं शुद्ध काश्मीराची पौळी ॥ शत एक योजनें व्योम-मंडळी ॥ उंच असे ॥१४॥मंदा किनीचा षोड शावा भाग ॥ तो खांडववनासी प्रवाहे जळ ओघ ॥ उत्तर भागीं जावया मार्ग ॥ पौळीसी असे ॥१५॥त्य उत्तर द्वरें नंदिकेश्वर ॥ वना मध्यें न करी संचार ॥ श्रृंगें उत्पाटूनि गिरिवर ॥ पाडिला पौळी ॥१६॥दक्षिण भागीं मार्ग केला ॥ मध्यें नंदिकेश्वर प्रवेशला ॥ तेथें वृक्षवल्ली देखता जाहाला ॥ नाना जातींच्या पैं ॥१७॥नाना जातीचे तेथें वृक्ष भार ॥ अमृत फळीं फळलें अपार ॥ तेथें नंदी सुट्ला महा समीर ॥ केली पत्र ओझडी ॥१८॥बहु विध्वंसी अल्प आहारी ॥ कल्पद्रुम उत्पाटी क्षितीवरी ॥ जे इंद्रासी प्रिय ते श्रृंगेंवरी ॥ पाडिले क्षितितळीं ॥१९॥तंव धांविन्नले रक्षाकर ॥ त्यांहीं देखिला तृणचर ॥ वनविध्वंस देखिला अपार ॥ पुष्पतरू नाना जातींचे ॥२०॥तेथें रक्षाकरीं केलें धांवण ॥ नंदीवरी टाकिले पाषाण ॥ जैसा पर्वतीं वृष्टि करी वरुण ॥ तैसा शिळा प्रहार ॥२१॥मग मंदिकेश्वर काय करी ॥ रक्षाकर छेदिले नासिकास्वरीं ॥ विध्वंसोनि आतले अंबरीं ॥ केली वाताहत ॥२२॥पुनरपि भक्षी दिव्य तरू ॥ उत्तम जातीसी करी संहारू ॥ कीं रंभावनीं सुटला कुंजरू ॥ विध्वं सावया जैसा ॥२३॥दिव्य कुमु दिनी तडागनीरीं ॥ त्या विध्वंसूनि टाकिल्या बाहेरी ॥ जैशा वल्ली उत्पाटूनि महापूरीं ॥ दिसती विगलित ॥२४॥कल्पद्रुमांचीं मोडिलीं वनें ॥ मानसीं इच्छी तो भक्षिणें ॥ देवां दुर्लक्ष जीं रम्य स्थानें ॥ त्यांचा क्षय केला नंदीनें ॥२५॥एक धांविन्नले अमर पुरा ॥ त्यांहीं जाणविलें सुरेश्वरा ॥ वन विध्व सोनि व्रज धरा ॥ नेणों आला कैंचा वृषक्ष ॥२६॥नेणों वृषभ कीं असुर ॥ कीं चरण फुटोनि आला गिरिवर ॥ तें नेणवे मोडूनि दिव्य तरुवर ॥ भक्षिल्या नाना जाती ॥२७॥मग काय करी सहस्त्रनयन ॥ समस्त हांकारिले सुरगण ॥ तत्काळ आले वनीं ठाकून ॥ नंदीसीं भिडावया ॥२८॥ऐसा तो सहस्त्राक्ष महा दुभुत ॥ वेगें धांविन्नला देवां सहित ॥ तंव देखिला वन विध्वं सित ॥ महा विशाळ तो ॥२९॥शक्र आज्ञा करी गीर्वाणांसी ॥ तुम्हीं धरोनि बंधन करावें त्यासी ॥ बहु विध्वंसी थोडें ग्रासी ॥ दीर्घ तस्करहा ॥३०॥मग धांविन्नलें देव सुरवर ॥ ते टाकिते जाहाले पाषाण शर ॥ गदा मुद्नर गिरिवर । टाकिती नंदी वरी ॥३१॥महा अस्त्रें हाणिती नंदिकेश्वरा ॥ पाषाण शिळा वृष्टि अपारा ॥ कीं जैसें कमळें हाणिजे कुंजरा ॥ तैसीं लागतीं अस्त्रें ॥३२॥अस्त्र नव्हे ते पुष्प वृष्टी ॥ नंदीसी सपर्पी वज्र मुष्टी ॥ अस्त्रें टाकितां जाहाला हिंपुटी ॥ परी अजित नंदी तो ॥३३॥ व्योमीं उद्भवें गंधर्वभार ॥ त्यामध्यें लोपे जैसा दिनकर ॥ तैसा झांकोळला नंदिकेश्वर ॥ देवांचिया अस्त्रें ॥३४॥ऐसे देवांचे भार देखुनी ॥ नंदी खवळला जैसा वन्ही ॥ तो तृण दग्धीतसे तत्क्षणीं ॥ तैसा नंदी देवांवरी ॥३५॥मग फुंकिला नासा पुटस्वरू ॥ तेणें उडविला देव भारू ॥ तंव वात चक्रीं पडिले तरू ॥ जे मोडिले नंदीनें ॥३६॥श्रृंगें खोंचलीं एकाच्या पोटीं ॥ तो नंदीनें टाकिला गिरिकूटीं ॥ एक ते पडलें क्षितितटीं ॥ मौळींच्या झडपेंकरूनी ॥३७॥मग ते सर्व देव गण ॥ अस्त्रें टाकूनी करिती पलायन ॥ मग स्वयेंचि राहिला आपण ॥ सुरनाथ तो ॥३८॥मग योजूनि शत शत सहस्त्र कठिण शर ॥ इंद्रें विंधिला नंदिकेश्वर ॥ परी द्रुमें जैसा गिरिवर ॥ न मानीचि तैसा ॥३९॥तेही बाण फुंकिले नासा पुटीं ॥ वाताहत केले व्योमकूटीं ॥ ते आकाशींहूनि क्षितितटीं ॥ पडिलेच नाहीं ॥४०॥मग वज्र घेऊ नियां करीं ॥ नंदी हाणीतला जैसा गिरी ॥ तें पर्वतीं पाषाणा चियापरी ॥ आदळे अंगीं ॥४१॥सहस्त्र नयनें हाणीतला वज्र घात ॥ नावेक नंदी झाला मूर्च्छित ॥ मग मूर्च्छा सांवरूनि अकस्मात ॥ उठावला धुधुःकारें ॥४२॥मग कोपें खवळला क्रोधाग्नी ॥ अट्टहासे दिधला दीर्घ ध्वनी ॥ मग नंदीनें धरिला वज्र पाणी ॥ पुच्छ वेष्टोनियां ॥४३॥मग पुच्छें भोवांडिला सुरेश ॥ त्यासी दाखविला कैलास ॥ जे सभे बैसला होता महेश ॥ तेथें टाकिला इंद्र ॥४४॥तेथें शिवस भेसी वज्रधर ॥ क्षितीं आदळला जैसा गिरिवर ॥ त्राणें उद्भवला महास्वर ॥ गर्जलें व्योम ॥४५॥तेथें थरारला सुवर्णाचळ ॥ दुमदुमला ब्रह्मांडगोळ ॥ अमरनाथ पडला निश्चिळ ॥ स्थावर जैसा ॥४६॥तंव धांवले शिवाचे गण ॥ कायसी ध्वनि उद्भवली म्हणोन ॥ तंव त्यांहीं देखिला सहस्त्र नयन ॥ अमरावतीचा अधीश ॥४७॥ऐसा आदळला वज्र पाणी ॥ क्षण एक पावला यम भुवनीं ॥ मग अंचल बातें शिवगणीं ॥ उपचारिला तो ॥४८॥मग अमराव तीसी गेला नंदी ॥ सुखें बैसला अमरपदीं ॥ जय जय कार केला ऋषि वृंदीं ॥ नंदिके श्वरासी ॥४९॥इंद्राचें होतें भद्रासन ॥ तें भूमंडळीं ॥ टाकिलें नंदीनें ॥ मग आपुले स्वइच्छे लागून ॥ केली रचना ॥५०॥म्हणोनि स्वर्ग-मृत्यु-पाताळ भुवनीं ॥ ज्या ज्या अमोघ रत्न खाणी ॥ त्या सर्व नंदिकेश्वर पासुनी ॥ उत्पन्न जाहा लिया ॥५१॥ऐसा अमर पदीं नंदिकेश्वर ॥ निर्भय बैसला परा भवूनि देव सुरवर ॥ मग आनंदला तो ऋषीश्श्वर ॥ पिता नंदीता ॥५२॥इंद्र टाकिला होता कैलासीं ॥ तो शिवगणीं नेला शिवा पासीं ॥ मग प्रश्निता जाहाला स्रुरेंद्रासी । त्रिपुरांतक तो ॥५३॥मग हर म्हणे गा वज्र धरा ॥ कवणें पीडिलें रे सुरेश्वर ॥ सुरेश्वरा ॥ सहस्त्राक्ष म्हणे जी विश्वंभरा ॥ परियेसीं विनंती माझी ॥५४॥शिवा नेणवे कवण महावीर ॥ मौळीं शृंगें जैसीं गिरिवर ॥ खांडववन मोडोनियां देव भार ॥ परा भविला तेणें ॥५५॥व्योमीं तरुपत्रा चिया परी ॥ मज उडविलें जी नासा स्वरीं ॥ मृत्यु पावतों परी शरीरीं ॥ होतें शिव नाम ॥५६॥वत्सरूप धरोनि जाण ॥ विध्वं सिलें अमर भुवन ॥ आतां सुरपद भोक्ता तयां वांचून ॥ कोणीचि नाहीं ॥५७॥मज बंधन करू नियां पुच्छीं ॥ सहज टाकिलें कैलासीं ॥ स्वर्ग-मृत्यु-पाताळीं तयासी ॥ समान द्दश्य ना श्रुत ॥५८॥अकस्मात आला कोठुनी ॥ दीर्घ पीडा केली जी शूल पाणी ॥ मग कोपला तो भाललो चनी ॥ त्रिपुरांतक ॥५९॥तंव गणांसी हांकारी शंकरू ॥ सज्ज केला अग्नि दत्त रहंवरू ॥ महा ध्वनीनें गर्जिला डमरू ॥ आणि शंख नाद तो ॥६०॥वाम करीं घेतलें सुना भचक्र ॥ दक्षिण हस्तीं त्रिशूळ त्रिवक्र ॥ देव सैन्य सवें घेतला शक्र ॥ अमरनाथ तो ॥६१॥ऐसा सर्व भारेंसीं पंचानन ॥ पावता जाहाला अमर स्थान ॥ ऐकोनि शंखाचें स्फुरण ॥ नंदी आला बाहेरी ॥६२॥तों नंदिकेश्वरातें देखे कैसा शंकरू ॥ कीं तो पूर्णिमेचा अमृतकरू ॥ कीं तो सुवर्णाचळ महामेरू ॥ ऐसा देखिला शिवें ॥६३॥तो शिवें कैसा देखिला गण ॥ वृष्टि करी पाषाण ॥ एक सज्जूनि शरासन ॥ विंधींत अमित बाणीं ॥६४॥एए हाणिती महाखङ्गतें ॥ एक टोंचिती त्रिशूळ घातें ॥ कोतिया मुद्नर शर बहुतें ॥ वेढिला नंदी ॥६५॥मग क्रोधें खवळला वत्सराजू ॥ खोंचला शिव सैन्या उजू ॥ घ्राणरंध्रीं दाटला महाफुंजू ॥ मग केली गर्जना ॥६६॥कंठ स्वरा चिया दीर्घ ध्वनीं ॥ प्रौढ शब्द उद्भवला गगनीं ॥ तेणें बधिरत्व जहालें श्रवणीं ॥ दिशा भद्रजा तींचिया ॥६७॥गर्जिन्नलीं पर्वत कोठारें ॥ तेणें थरारलीं मौळींचीं शिखरें ॥ सीमा सांडो नियां सप्त सागरें ॥ आहेर केला ॥६८॥थरारली सप्त द्वीपवती ॥ ग्रह-नक्षत्रें पडिलीं महा आवर्तीं ॥ धाकें सोम-सूर्यांची गती ॥ चलित जाहाली ॥६९॥ऐसा चालिला शिव सैन्या वरी ॥ नभ पर्य़ंत जैसा महा गिरी ॥ देव परा भविले नासा स्वरीं ॥ एक मर्दिले क्षितीं ॥७०॥जैसा मंदरा चल गिरिवर ॥ पृथ्वी न साहे तयाचा भार ॥ मग घेऊनि कूर्म अवतार ॥ पृष्ठीं धरिली विष्णूनें ॥७१॥तैसा मर्दीत चालिला बळ प्रौढीं ॥ सैन्य संहारिलें शत एक कोटी ॥ जैसे तडाग जीवनीं आड मोडी ॥ वारण करकमळीं ॥७२॥जैसा उदय जाहा लिया भास्करा ॥ व्योमीं लोपती ग्रहतारा ॥ तैसें नंदीनें निक्षे पिलें सुरां ॥ शिवा देखतां ॥७३॥ऐसा शिव सौन्याचा केला निःपात ॥ मग कोपला उमाकांत ॥ आतां या रणयागांत ॥ हा पशु होमावा ॥७४॥हा पशु कवणाचा कवण ॥ येणें मान विला नारायण ॥ परा भविला सहस्त्र नयन ॥ टाकिला कैलासीं ॥७५॥एवढी शक्ती यासी कवणाची ॥ शस्त्रें भक्षिलीं सर्व देवांचीं ॥ आतां माझेनि हस्तें आयुष्याची ॥ संख्या याची पूर्ण जाहाली ॥७६॥ऐसा कोपें खवळला त्रिपुरारी ॥ त्या क्रोधाची कवणा दीजे सरी ॥ तो प्रळयीं सर्वही संहारी ॥ तरी ऐसा कवण ॥७७॥शिवाची उपमा दीजे शिवाजी ॥ ऐसी वेदाज्ञा पुराणांसी ॥ मग त्र्यंबकें बाहूनि नंदीसी ॥ युद्धासी पाचारिलें ॥७८॥त्रिपुरांतक म्हणे रे तृणचरा ॥ केवीं अधीश जाहा लासी अमर पुरा ॥ आतां तूं प्रवाहूं नको सैरा ॥ साहें संधान माझें ॥७९॥मग त्र्यंबकें धनुष्य वाहिलें वाम करीं ॥ नंदी विंधिला सहस्त्र शरीं ॥ ते घ्राण वातें वरिच्या वरी ॥ उडविलें नंदीनें ॥८०॥जैसें वातचक्रा़चें भ्रमण ॥ व्योमीं प्रवाहें जैसें शुष्क तृण ॥ तैसें तें विरूपाक्षाचें संघान ॥ उडविलें नंदीनें ॥८१॥ऐसें देखोनि त्रिपुरांतक ॥ मग खवळला जैसा प्रलय पावक ॥ तो शांत नव्हे त्रैलोक्य दहाक ॥ कोणेही परी ॥८२॥कोटि सूर्यांचें तेज दारुण ॥ जेणें मार्तंड जाहाला संतप्त उष्ण ॥ तें सुना भचक्र पंचानन ॥ योजिता जाहाला नंदी वरी ॥८३॥क्षणें कल्पान्त करी त्रिभुवनीं ॥ हे प्रतिसाक्ष जयाची पुराणीं ॥ तो महात्रिशूळ भाळलो चनी ॥ प्रयोजी नंदीसी ॥८४॥दोन्ही शस्त्रें प्रहारी पंचानना ॥ तेव्हां नंदीनें विकासिले वदन ॥ दशनीं सहस्त्र कुटके करून ॥ भक्षिलीं शस्त्रें दोन्हीं ॥८५॥मग नंदी क्रोधाय मान शरीरीं ॥ त्राणें झडपें हाणी तला त्रिपुरारी ॥ नेरूनि टाकिला योजनें चारी ॥ नंदिकेश्वरें ॥८६॥मग अद्भुत कोपला महेशू ॥ म्हणे शक्तिवंत जाहाला रे पशू ॥ मग धरो नियां महा आवेशू ॥ प्रका शिला तृतीय नेत्र ॥८७॥शिवें उघडिला तृतीय चक्षू ॥ नंदीसी प्रदीप्त करी विरूपाक्षू ॥ तेणें भयें पळे सहस्त्राक्षू ॥ देवां सद्दित ॥८८॥परी नंदीन मानीचि अग्निजवाळा ॥ शस्त्रें भेद अंगींच्या रोमांचकुळा ॥ मग विचार आठवला जाश्वनीळा ॥ युद्धयुक्तीचा ॥८९॥मग ज्ञानें विचारी विश्वंभर ॥ तंव तो त्रिंमूर्ति त्रिविधाकार ॥ म्हणे हा तंव माझाचि अवतार ॥ त्रिनेत्रांश ॥९०॥मग नंदी म्हणे उमाकांता ॥ तुमचीं शस्त्रें देईन आतां ॥ तरी शक्ती स्मरोनियां मागुतां । युद्ध घ्यावें आम्हांसी ॥९१॥म्हणोनि सुना भचक्र त्रिशूळ ॥ नंदीनें वमूनि दिधलें तत्काळ ॥ तेव्हां आश्चर्य करिती सकळ ॥ सुरेंद्रा दिक ॥९२॥मग नंदीसी वदे उमाकांत ॥ शस्त्रें दिधळीं पूर्ण भरित ॥ आतां ऐसा कवण लज्जा वंत ॥ जो झुंजेल तुजसीं ॥९३॥शिव म्हणेगा बस वेश्वरा ॥ महापुरुषार्थीं क्षेत्रचरा ॥ तुझी महा शक्ती सर्वही सुरां ॥ अगम्य अनुपम ॥९४॥मग नंदीसी वदे शंकर ॥ तुज दिधला अभय वर ॥ तुझी इच्छा तें माग रे नाभीकार ॥ दिधला म्यां तुज ॥९५॥तुझी शक्ती देखोनि पूर्ण ॥ बहु संतोषलें माझें मन ॥ आतां मी तुज जाहालें प्रसन्न ॥ ये काळीं जाण पां ॥९६॥तंव हास्य करी बस वेश्वर ॥ पाहा हो कैसा कृपण तो सागर ॥ तो कूपतडागांसी उपकार ॥ केवीं पां न करी ॥९७॥शिवा मी कैसा जी दुर्बळ न्य़ून ॥ तुज पैं कार्य आहे जी संपूर्ण ॥ जे तूं मज व्हावया प्रसन्न ॥ जाहा लासी समर्थ ॥९८॥कैसें तेज मंद जाहालें दिवाकरा ॥ त्यासी प्रसन्न होऊ येतील तारा ॥ चिंतामणीसी स्फटिकगारा ॥ काय प्राप्त करितील ॥९९॥शिवा जें जें फळ कल्पिजे मानसीं ॥ तें तें कल्पद्रुम पुरवी सर्वांसी ॥ तो जन्मला माझिया कुशीं ॥ अमोघरत्नें ॥१००॥नव निघि भांडार जया पासुनी ॥ सर्व काळ प्रसवे चिंतामणी ॥ तो कौस्तुभ माझे चक्षु स्थानीं ॥ जन्मला शिवा ॥१०१॥सर्वपाक पंचामृत जियेपाशीं ॥ जे तृप्त करूं शके त्रैलोक्यासी ॥ माझिया लिंगीं कामधेनूसी ॥ जन्म जाहाला शिवा ॥१०२॥ऐसें जें जें कल्पिसी अंतःकरणीं ॥ तें तें समर्पा वयाचे दानीं ॥ शिवा ते जन्मले मज पासुनी ॥ नवही निधी ॥१०३॥म्हणोनि चातक नामें पक्षीश्वर ॥ त्याची वांच्छा केवीं पुरवी जलधर ॥ सिद्धि साध कांसी केवीं उदरा ॥ होईल राजा ॥१०४॥मग बस वेश्वर वदे शिवासी ॥ त्रैलोक्य देवा तूं कैला सवासी ॥ जो प्रसन्न आम्हां व्हावयासी ॥ करि तोसी प्रत्युत्तर ॥१०५॥तुमचें श्रुत असे समर्थ पण ॥ गृह मंदिर तरी स्मशान ॥ मध्यें ऐश्वर्य तें संपूर्ण ॥ विभूति भांडार ॥१०६॥तरी तेंही भीमसार भस्म खरा ॥ तोही तुज म्यां प्राप्त केला शंकरा ॥ मग जटा जूट-भस्मधरा ॥ नाम जाहालें तुज ॥१०७॥तुज जाती कुळ नाहीं नाम ॥ तुम्हां देश नाहीं कैंचा ग्राम ॥ नगरासी ठाव नाहीं तेथें सीम ॥ कैंची असेल ॥१०८॥ऐसा तूं सर्व पदार्थें कृपण ॥ आणि आम्हांसी होतोसीं प्रसन्न ॥ सुगंध मृगाचे अति गुण ॥ केवीं प्राप्त सशिया ॥१०९॥आतां शिवा मी प्रसन्न तुम्हांसी ॥ मी प्राप्त करीन जें मानसीं ॥ तुज ऐसें पात्र धुंडितां आम्हांसी ॥ न साधे त्रिलोकीं ॥११०॥नाना दानीं पात्र मिळे सगुण ॥ तरी मोक्ष पदासी होइजे पावन ॥ मी धुंडीत होतों हेंचि कारण ॥ तुज ऐसें पात्र ॥१११॥शिव म्हणे परियेसीं श्रृंगमुळा ॥ मज निखांदिसी आपुलिया बळा ॥ प्रसन्न व्हावया उताविळा ॥ जाह लासी कोटि गुणें ॥११२॥मग नंदी म्हणे गा विश्वनाथा ॥ तुम्हीं मागावें तुम चिया आर्ता ॥ तत्काळ नेदीं तरी मी सर्वथा ॥ त्रिलोकीं निंदक ॥११३॥मग शंकर म्हणे महानंदा ॥ जरी ऐसी असे तुझी शब्द मर्यादा ॥ तरी सर्वकाळ माझिया विनोदा ॥ होईं तूं वहन ॥११४॥तुझिया पृष्ठीं मी होईन स्वार ॥ मग त्रैलोक्या करीन संहार ॥ प्रळयीं चेतवीन जो अंगार ॥ ते तुझिचा शक्ती ॥११५॥मग नंदी म्हणे जी पंचानना ॥ मी चिंतीत होतों जे कल्पना ॥ तेंचि घडलें जि त्रिलोचना ॥ माझ्या पुण्योदयीं ॥११६॥मी विचारीत होतों शरीरीं ॥ हाचि वर मागा वया त्रिपुरारी ॥ जिव्हाग्रीं बैसावी विधि कुमरी ॥ हाचि वर मागी तला तुम्हीं ॥११७॥क्षण एक पाहिली तुमची मनो वृत्ती ॥ मी तुझा पशु तूं माझा पती ॥ हें भविष्य बोलिलें असे वेदांतीं ॥ अनागत भाषा ॥११८॥तूं मज स्वामी जोडलासी पूर्ण ॥ आजिवरी मी होतों अनाथ दीन ॥ आतां तुम चिये शक्तीं त्रिभुवन ॥ आकर्षीन सर्वही ॥११९॥मग नंदी प्रवर्तला स्तवन ॥ म्हणे जय जयाजी पंचानना ॥ मस्तक ठेवूनि शिवचरणा ॥ घातलें साष्टांग ॥१२०॥मी समर्थ जी त्रैलोक्य मंडळी ॥ मज स्वामी जोडला चंद्र मौळीं ॥ मी सर्व काळ असेन जवळी ॥ महा सुकृत ॥१२१॥योगीश्वरां अप्राप्य ज्ञानद्दष्टीं ॥ जो असाध्य यज केलिया कोटी ॥ तें ब्रह्म आरोहण माझिये पृष्ठीं ॥ ऐसा मी समर्थ ॥१२२॥विसर्जन झाला क्रूर भाव ॥ अत्यंत प्रकटला सद्धाव ॥ तेथें बसवेश्वर ॥ महादेव ॥ नव्हतीच भिन्न ॥१२३॥मग नंदीसी वदे वदे पंचानना ॥ म्यां समर्पिलें तुज पूजा विधान ॥ मज आधीं तुजला स्नपन ॥ त्रैलोक्या माजीं ॥१२४॥आणि नंदिसि वदे त्रिपुरारी ॥ मी तुझें नाम जपतों त्रिअक्षरीं ॥ तो मंत्र कोणी वाचे उच्चारी ॥ तो सखा माझा ॥१२५॥बसवा हें नाम त्रिअक्षरी मंत्र ॥ त्रिकाळ उच्चारी तो माझा मित्र ॥ मत्स्वरूपी तुज नेणे तो शत्रू अपवित्र ॥ युगानुयुगीं माझा ॥१२६॥आणिक वदे त्रिनयन ॥ माझें अत्यंत प्रिय काशी भुवन ॥ तेथें तुज प्राप्त करितों स्थान ॥ तें निर्वाणपद ॥१२७॥काशी मध्यें जो मुक्ति मंडप ॥ त्या निर्वाण स्थानीं तूं अधिप ॥ आणिक माझा संकल्प ॥ तूं वंद्य त्रिलोकीं ॥१२८॥शंकर वदे जी वत्सराजा ॥ माझिया रहंवरींच्या पूर्ण ध्वजा ॥ द्दष्टीवेगळें तुज सहजा ॥ न करींच क्षण भरी ॥१२९॥जे काशी यात्रा सर्व काळ करिती ॥ मुक्ति मंडपीं बसवेश्वर पूजिती ॥ त्यांची पुण्यसामुग्री कल्पांतीं ॥ अखुंट केली म्यां ॥१३०॥तूं मज अगम्य जी बसवा ॥ परी गुप्तार्थ करीन तुझी सेवा तूं वहन हें ठाऊक नर-मानवां ॥ त्रैलोक्यजंतूंसी ॥१३१॥आतां गुप्त कैसें तुमचें स्मरण ॥ तुवा भक्षिलें पुण्यतरु खांडववन ॥ तें तुझें गोमय मौळीं भूषण ॥ वंदीन विभूति वेषें ॥१३२॥मज भूषण प्रिय ते विभूती ॥ त्या भस्माची तुज पासाव उत्पत्ती ॥ झाली गा नंदिकेश्वरा मजप्रती ॥ आसना अधिकारी ॥१३३॥ये विभूतीचा सत्वागुण ॥ विभूतीनें रचिलें त्रिभुवन ॥ तें मागिलें प्रसंगीं निरूपण ॥ केलें विभूति माहात्म्यीं ॥१३४॥मग नंदी वरी आरूढला चंद्र मौळी ॥ जैसे कोटि मार्तंड उदया चळीं ॥ देव सुर घेऊनि पुष्यां जळी पूजिती नंदी-शिवां ॥१३५॥दिव्य कमळांची पूर्ण वृष्टी ॥ इंद्रं केली नंदी-शिवांचे मुकुटीं ॥ मग नाम पावला धूर्जटी ॥ पशुपति ऐसें ॥१३६॥इंद्रपदीं स्थापिला सहस्त्रनयन ॥ आनंदातें पावलें देवगण ॥ शंकरासी जोडलें नंदी वहन ॥ ऐसि यापरी ॥१३७॥षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ ऐसी या नंदीची मूळ उत्पत्ती ॥ सविस्तर निरूपिली तुज प्रती साक्षेपेंकरू नियां ॥१३८॥ऐसें नंदी-शिवांचें आख्यान ॥ जया धडे श्रवण पठन ॥ तरी तयांसी घडे दर्शन ॥ विरूपाक्षाचें ॥१३९॥द्वादश ज्योतिर्लिगांची घडे यात्रा ॥ त्यांसी वंदिजे सृष्टिकर धात्रा ॥ तो सर्वथा ना गवसे सूर्य पुत्रा ॥ कृतांतासी ॥१४०॥आणि विघ्नांचें होय निर्विघ्न ॥ अपुत्रिकां होय पुत्र संतान ॥ निर्धना प्राप्त होय धन ॥ या अध्याय श्रवणें ॥१४१॥आणि मन कामना पुर्ण होती ॥ चिंतिले अर्थ पावती ॥ अंतीं सायुज्यमुक्ती ॥ घडे अध्याय श्रवणें ॥१४२॥शिव दास गोमा म्हणे श्रोतां ॥ हें श्रवण कीजे जी आत्महिता ॥ जन्मवरी नाइकिजे वार्ता ॥ आधिव्यथेची ॥१४३॥इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे नंदिकेश्वरमाहात्म्यवर्णनं नाम षट्षष्टितमाध्यायः ॥६६॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP