मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड| अध्याय ४६ वा काशी खंड प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा काशीखंड - अध्याय ४६ वा स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे. Tags : kashikhandapothipuranकाशीखंडपुराणपोथी अध्याय ४६ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ अगस्ति वदे जी शिवपुत्रा ॥ मज तृप्ति नाहीं जी षड्वक्रा ॥ जैसा जंतुउद्बविता धात्रा ॥ नव्हे जी अशक्त तेवीं मी ॥१॥तैसीं तुझे मुखींचीं शब्दरत्नें ॥ माझिये श्रवणीं मिरवती भूषणें ॥ कीं श्रवणमुखीं भोजनें ॥ अर्पिसी मज अनाथासी ॥२॥काशीखंडकथा करितां श्रवण ॥ अधिकचि प्रदीप्त हुताशन ॥ महा किल्बिषाहुतीचें दहन ॥ केलें तुवां स्वामी ॥३॥तरी क्षमा कीजे मज अनाथा ॥ निरूपा जी मय़ूखादित्याची कथा ॥ जेणें पराभवे महा व्यथा ॥ श्रोतयां जनांची ॥४॥तंव स्वामी म्हणे गा कुंभजा ॥ सूर्यानें आराधिलें वृषध्वजा ॥ तप करितां त्या कश्यपात्मजा ॥ क्रमिले दिवस बहुत ॥५॥ते काशीमध्यें पंचनदी जाण ॥ महातीर्थ असे पापनाशन ॥ तेथें सूर्यें केलें अनुष्ठान ॥ पांच सहस्त्र वर्षें पैं ॥६॥तंव सूर्यासी तप साध्य करितां ॥ परियेसीं गा मित्रावरुणसुता ॥ कैसी तपश्चर्येची योग्यता ॥ ते ऐक ऋषिवर्या ॥७॥पांच सहस्त्र एक संवत्सर ॥ तें ब्रह्मयाचें आयुष्य साचार ॥ इतुकें केलें तप अपार ॥ मार्तंडे तेणें ॥८॥पंचनदीतीर्थाच्या तीरीं ॥ तो मार्तंड तपसाधन करी ॥ तेणें स्थापिला तो त्रिपुरारी ॥ गभस्तीश्वरलिंग तें ॥९॥तेणें सूर्यकुंड केलें महातीर्थ ॥ मग ध्यानीं लक्षिला भवानीकांत ॥ शिवभक्तीचा धरोनि स्वार्थ ॥ मनीं लक्षिला हर ॥१०॥जैसा देह अचेतन शयनीं ॥ आणि जीवात्मा भ्रमतसे मेदिनीं ॥ तैसा मार्तंड लक्षीतसे ध्यानीं ॥ त्रिपुरांतकासी ॥११॥तो तपें संतप्त थोर झाला ॥ कीं महा तपें तापला ॥ ध्यानीं मनीं स्थापूनि विसरला ॥ आपण आपणातें ॥१२॥तपतापें प्रज्वळला वन्ही ॥ अति महातेजें दीप्त झाला तरणी ॥ महाज्वाळा संचरलिया गगनीं ॥ तेणें तापला व्योमलोक ॥१३॥महाकिरणलहरी उद्भवलिया ॥ त्या सव्यापसव्य धांविन्नलिया ॥ तेणें देवमातृका पोळलिया ॥ दश दिशांच्या ॥१४॥अवघें संतप्त झालें भूमंडळ ॥ पृथ्वीजनें लंघिले कुळाचळ ॥ महापूरें वायु लोकपाळ ॥ पावले पीडा थोरी ॥१५॥क्षितिगर्भीं जे संचरले ॥ त्यांहीं पाताळजंतूंसी पीडिलें ॥ तें तप नव्हे मांडिलें ॥ प्रळयान्त लोकांसी ॥१६॥ऐसा त्या मार्तंडाचा तेजकल्लोळ ॥ कीं तो महाप्रळयींचा वडवानला ॥ तो दाहीतसे ब्रह्मांडगोळ ॥ कल्पांती जैसा ॥१७॥तैसें तरणितेजें त्रिभुवन ॥ तपें संतप्त जाहाले त्रिभुवनजन ॥ परी पवनाचें जें शीतळपण ॥ होतें ते काळीं ॥१८॥तेणें मंद जाहालीसे उष्णता ॥ म्हणोनि क्षयो नव्हे मर्त्य जंतां ॥ मग पृथ्वीचे जन भवानीकांता ॥ आले शरणागत ॥१९॥ते काशीचे लोक नेमव्रती ॥ त्यांहीं प्रार्थिला तो पशुपती ॥ जयजयाजी आदिलिंगाकृती ॥ विश्वंभरा सदाशिवा ॥२०॥दीर्घ या अविमुक्तीचें महिमान ॥ अपार सुखें जें येथींचें राहाणें ॥ ऐसें बोलती चतुर्वेद पुराणें ॥ सर्वकाळ स्वामी ॥२१॥येथींचे पंचत्वें ते सायुज्यता ॥ ऐसें जाणीतलें वेदीं पाहातां ॥ या काशीचें परम सुख निर्धारीतां ॥ मंद जाहाले चतुर्वेद ॥२२॥तरी त्या सुखास्तव काशीपुरी ॥ आम्ही सेवीतसों जी त्रिपुरारी ॥ तुम्हांऐसा असतां साहाकारी ॥ आम्हांसी कां पीडा थोर ॥२३॥नेणों कैंचा जी वडवानळ ॥ क्षितीं उद्भवलासे महाज्वाळ ॥ तेणें तेजें दश दिशा भूगोळ ॥ संतप्त जाहाला ॥२४॥जी जी महादुःखाची कोडी ॥ चौर्यायशीं लक्षांची बांदवडी ॥ निमिषार्ध न लागतांचि तोडी ॥ तो मंत्र काशी द्वय अक्षरें ॥२५॥तरी ऐसें काशीचें परम सुख ॥ वाखाणितां अशक्त चर्तुमुख ॥ तरी आम्हां हें वन्हिबहुदुःख ॥ निर्मिलें कोठोनियां ॥२६॥ऐसी त्या जंतूंची करुणा ॥ विचारोनि शिवें आणिलें मना ॥ मग कृपा उद्भवली पंचानना ॥ त्या सर्व लोकांची ॥२७॥मग बोलिला त्रिनयन ॥ सूर्यांने मांडिलें अनुष्ठान ॥ पंच सहस्त्र एक संवत्सर पूर्ण ॥ जाहाले आयुष्याचे ॥२८॥मग पंचनदीतीर्थासी ॥ तेथें गभस्तीश्वरलिंगापासी ॥ प्रसन्न व्हावया मार्तंडासी ॥ आला असे हर ॥२९॥सूर्याचें तप देखोनि शंकर ॥ मानसीं विस्मित झाला थोर ॥ तपतापें देखिला अंगार ॥ प्रळयकाळींचा जैसा ॥३०॥दश दिशा फांकला सहस्त्रकर ॥ पंच सहस्त्र वर्षें झालीं साचार ॥ मग तो कश्यपाचा कुमर ॥ आश्वासिला शिवें ॥३१॥शंकर म्हणे गा द्विजमान्या ॥ आतां स्थिर होईं गा कश्यपनंदना ॥ ऐसी विश्वनाथें केली आज्ञा ॥ तये वेळीं सूर्यासी ॥३२॥म्हणे तुझें महातप दुर्धर तरणी ॥ उष्ण केली सर्वही मेदिनी ॥ तूं स्वर्गाच्या ठायीं दिव्य मणी ॥ तृतीय चक्षू माझा तूं ॥३३॥ऐसा त्रय वेळां वदे शंकर ॥ तरी प्रत्युत्तर न करी दिवाकर ॥ अंतरनिष्ठ झाला महाथोर ॥ स्थानीं अचळ जैसा ॥३४॥तेणें मन स्थापिलें ध्यानीं ॥ मग तो शब्द नायके श्रवणीं ॥ जैसा तो जीवात्मा देहाकारणीं ॥ भोगी सुषुप्ती ॥३५॥मग शिवें अमृतकरीं धरिला ॥ तेणें तंव तो शांत झाला ॥ प्रसन्नवदनें आश्वासिला ॥ धामराज तो ॥३६॥तंव सूर्यें उघडिले चक्षू ॥ तेणें द्दष्टी देखिला विरूपाक्षू ॥ कोटी गभस्तींचें तेज चक्षू ॥ महा तेज प्रकाशू ॥३७॥सूर्याचें तेज संचरलें मेदिनीं ॥ अधिक तेजें देखिला शूलपाणी ॥ तेज लक्षितां कोटीगुणें तरणी ॥ न्यून झाला ॥३८॥जैसा उदय झालिया भास्कर ॥ तेजें मंद दिसे रजनीकर ॥ तैसा शिवतेजें अदितिकुमर ॥ तेजें मंद जाहाला ॥३९॥सर्व भूषणीं देखिलें भवानीकांता ॥ मग आश्चर्य करी तो सविता ॥ दशभुज पंचवक्र देखतां ॥ विस्मित जाहाला तरणी ॥४०॥भस्मधूली लेपिली सर्व गात्रीं ॥ गजांबरी नीलकंठ त्रिनेत्री ॥ दिव्य जटाधारी विकटाकृती ॥ मिशा पिंगट पिंगाक्ष शंकर ॥४१॥शार्दूलचर्म गजचर्मांबरें ॥ फणिवरभूषणें दिव्यांबरें ॥ वृषभवाहन भवानीशंकरें ॥ स्थापिलें पद्मासन ॥४२॥ऐसा उमेसहित शंकर ॥ त्यासी स्तविता जाहाला दिवाकर ॥ म्हणे जयजयाजी त्रिशूळधर ॥ मृगांकधरा शिवा ॥४३॥जैसी दिव्य पुष्परागाची दीप्ती ॥ कीं ते आदिनाथाची ज्ञानशक्ती ॥ तैसी उमा वामांगी हैमवती ॥ तुमची इच्छा सदाशिवा ॥४४॥त्रैलोक्यमंडळीं विचारितां ॥ हें दिसतसे ब्रह्मांडजनिता ॥ हे तंव तुम्हांसा योग्य जी समर्था ॥ ज्योतिलिंगा ॥४५॥जैसी मदनभार्या रती ॥ तीहूनि कल्पकाळीं सगुण अरुंधती ॥ ते तुवां समर्पिली जी पशुपती ॥ स्वहस्तें वसिष्ठासी ॥४६॥तैसी तुमची निजांगना भवानी ॥ तुम्हांसी भिन्न नव्हे जी शूलपाणी ॥ जैसा आमोद सुमनींहोनी ॥ न धरीचि भिन्नत्व ॥४७॥सर्वां घटीं हे शैलजा ॥ त्या घटीं व्यापक तूं वृषभध्वजा ॥ शिवासी मिळाली हे दक्षात्मजा ॥ अगाध इच्छा तुमची ॥४८॥तरी ते वाखाणितां दाक्षायणी ॥ तेजें लोपले कोटि तरणी ॥ कीं शत सहस्त्र दिनमणी ॥ उद्भवले एक वेळे ॥४९॥रूप लक्षितां ते गौर सांवळी ॥ कंचुकी शोभे वक्षःस्थळीं ॥ ते सर्व जगन्माता पयाळी ॥ स्त्रवतसे जंतुमात्रां ॥५०॥जरी बोलावी तियेची संतती ॥ तरी ते म्हणावी सर्वजनिती ॥ सांगावी शृंगाराची पद्धती ॥ तरी कुबेर भांडारी ॥५१॥आतां असो हें वर्णन हैमवती ॥ तरी ते शिवाची महाशक्ती ॥ तो भवानीकांत बहुतां स्तुतां स्तुतीं ॥ वाखाणिला सूर्यानें ॥५२॥जें सूर्यानें स्तविलें भवानीकांता ॥ आणिक स्तविली ते दक्षदुहिता ॥ तें संकलित निरूपिलें जी श्रोतां ॥ शिवकथेसी विलंबास्तव ॥५३॥ऐसें स्तवन केलें दिवाकरें ॥ दीर्घ संतोष मानिला शंकरें ॥ म्हणे पुरे गा पुरे प्रत्युत्तरें ॥ परिसें माझीं ॥५४॥मार्तंडा तुवां जें केलें स्तवन ॥ तेणें तूं झालासी पावन ॥ आतां तुज मी जाहालें गा प्रसन्न ॥ ये काळीं निश्चयेंसीं ॥५५॥तुझे मुखीं जे स्तुतितुषार ॥ तें मज प्रकाशलें गंगानीर ॥ जैसें मज तृप्त करी तो शीतकर ॥ मग म्यां मौळी धरियेला ॥५६॥तेणें शांत केला तमोगुण ॥ कीं तूं एक भक्त देखिला पूर्ण ॥ जैसा माझे भाळीं तृतीय नयन ॥ काय होशील तूं ॥५७॥जैसीं तीं आपुलीं सर्व गात्रें ॥ शरीरासी नव्हेति भिन्नमात्रें ॥ ते माझी उष्णता तृतीय नेत्रें ॥ ते म्यां समर्पिली तुज ॥५८॥सूर्यासी म्हणे भवानीरमणू ॥ तूं त्रैलोक्याचे ठायीं दिव्यभानु ॥ सर्वांघटीं व्यापक महाप्राज्ञु ॥ धुंडिराजा मार्तंडा ॥५९॥त्रैलोक्याचे ठायीं शुभाशुभ कर्में ॥ उत्पत्ति प्रलय नाना जंतूंसी जन्में ॥ हें सर्वही जाणसी तूं ज्ञानागमें ॥ सत्य वाचा माझी हे ॥६०॥तूं सर्वां घटीं परमात्मा ॥ जाणसी सर्व जीवांच्या कर्मधर्मा ॥ तो दोषदंडगुण पूज्य यमा ॥ निरूपिलें तुज माझिया ॥६१॥ मेरूचिया प्रदक्षिणेसी ॥ चौसष्टी घटिका प्रमाणासी ॥ उत्पत्ति प्रलय नित्य करिसा ॥ सर्व जीवांसी तूं ॥६२॥तूं ब्राह्मणांचा स्वामी दैवत ॥ आणि तूंचि अग्नि हुत ॥ त्यांसी यागीं करिसी नित्य तृप्त ॥ तेंहीं तूं जाणसी ॥६३॥आणिक परियेसीं गा गभस्ती ॥ तूं माझें स्वरूप साक्षात मूर्ती ॥ जे माझ्या ठायीं दिव्य तेजदीप्ती ॥ तेहीं म्यां तुज समर्पिली ॥६४॥शिव म्हणे गा कश्यपात्मजा सगुणा ॥ तुज मी करितों नामधारणा ॥ तूं सुवर्णाचलाचिया भ्रमणा ॥ दिवामणि नाम तुझें ॥६५॥धामराज मार्तंड प्रसिद्ध सविता ॥ दिनेश रवि भासकर आदित्या ॥ सूर्या अरूणा भानु उदिता ॥ हीं द्वादश नामें तुझीं ॥६६॥तुवां लिंगीं स्थापिला जो शंकर ॥ नाम ठेविलें गभस्तीश्वर ॥ तेथें पूजाविधि करी जो नर ॥ तो होय सर्व व्याधिनिर्मुक्त ॥६७॥ तुवां येथें तीर्थ निर्मिलें ॥ त्यासी गभस्ति नाम झालें ॥ तेथें स्नान दान जया घडलें ॥ ते वसती सूर्यलोकीं ॥६८॥विश्वनाथ-दक्षिणभागीं जाण ॥ दंडपाणीसमीप महाप्राज्ञा ॥ तो तूं मयूखादित्य गहन ॥ स्थापिलासी सगुण महा ॥६९॥तेथें चैत्र शुद्ध त्रयोदशी दिनीं ॥ ते तुझी यात्रा काशीमध्यें तरणी ॥ ऐसा वर देतसे शूलपाणी ॥ काशीमध्यें सूर्यासी ॥७०॥मग मृगांकधारी म्हणे दिवाकरासी ॥ तुज स्थापिलें मेरुप्रदक्षिणेसी ॥ संख्या एक लक्ष योजनें आकाशीं ॥ भ्रमिजे सृष्टिकार्या ॥७१॥मग समर्पिला अद्भुतशक्तीचा वेग ॥ मनापरीस वहिला योग ॥ तूं निमिषार्धें क्रमिसील मार्ग ॥ दोन सहस्त्र शतें दोनी ॥७२॥संख्या बेचाळीस लक्ष प्रमाण ॥ आणि पंचाहत्तर सहस्त्र योजन ॥ इतुकें घटिकेचें प्रमाण ॥ समर्पिलें शिवें ॥७३॥तुज समर्पिला दिव्य रहवंरु ॥ मनोवृत्ति उच्चैःश्रवा वारु ॥ रथीं सारथी तुझा सहोदरु ॥ प्राप्त होईल अरुण तो ॥७४॥सूया एकचक्री तुझा रहंवर ॥ कीं तें वसुमतीचें विमान सुंदर ॥ चौसष्ट घटिकेमध्यें वसुंधरा केर ॥ क्रमिसी छप्पन्न कोटी ॥७५॥स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ ऐसा हा प्रथम पुण्यग्रह तरणी ॥ एक लक्ष योजनें गगनीं दिव्यमणी ॥ स्थापिला शिवें ॥७६॥बेचाळीस सहस्त्र योजन ॥ या मार्तंडाचें शरीरप्रमाण ॥ तो द्वादशकळापरिपूर्ण ॥ सृष्टी विरिंचिदेवाची ॥७७॥दुसरा पुण्यग्रह अत्रिकुमर ॥ तो षोडशकळीं पूर्ण शीतकर ॥ त्याचा लक्षिला शरीरपसर ॥ चव्वेचाळीस सहस्त्र योजनें ॥७८॥तिसरा ग्रह बुध जाणा ॥ कैसें लक्षिलें त्याचे प्रमाणा ॥ तो चोवीस सहस्त्र योजनें जाणा ॥ शरीरसंख्या तयाची ॥७९॥चौथा पूर्ण ग्रह देवगुरु ॥ जो अंगिराऋषीचा कुमरु ॥ एकवीस सहस्त्र पसरु ॥ लक्षिला तयाचा ॥८०॥आतां तप्तग्रह जो मंगळ ॥ तो एक वसुमतीचा बाळा ॥ त्याचा लक्षितां शरीरगोळ ॥ सवालक्ष योजनें पैं ॥८१॥आणिक जो ग्रह उग्रमूर्ती ॥ त्यासी प्रसवली संज्ञा गभस्ती ॥ त्याची लक्षिली शरीरगणती ॥ सवा लक्ष योजनें पैं ॥८२॥आणिक गा भार्गवाचा नंदन ॥ तो संख्येसी सांगीतला एकनयन ॥ बत्तीस सहस्त्र योजनें पूर्ण ॥ शरीर दैत्यगुरूचें ॥८३॥आतां राहूचें शरीरप्रमाण ॥ लक्षिलें नव सहस्त्र योजन ॥ आणि केतूची संख्या पूर्ण ॥ अष्टोत्तर शतें पैं ॥८४॥स्वामी म्हणे गा अगस्तिमुनि ॥ हे नव ग्रह आले आनंदवनीं ॥ आपुलाल्या लिंगस्थापना करूनी ॥ प्रसन्न केलें सदाशिवा ॥८५॥या अध्यायाची फलश्रुती ॥ श्रवणें पठणें होय जनाप्रती ॥ त्यांचे वंशावळीसी गभस्ती ॥ चुकवी यमपंथा ॥८६॥जो अध्याय करील श्रवण पठण ॥ त्याचे शरीरीं प्रकाशें ब्रन्ध ॥ तो महादोषासी दग्धी जठरग्न ॥ द्वादश वर्षांचिया ॥८७॥सूर्यमंत्र जे त्रिकाळ जपती ॥ त्यांचे गृहीं पीडा न बाधिती ॥ आणिक धनधान्याची विपत्ती ॥ नसे त्या गृहीं पैं ॥८८॥ऐसें हें धर्मशास्त्र परिसतं ॥ सर्वथा नेणिजे व्याधिवार्ता ॥ शिवदास गोमा विनवी श्रोतां ॥ सावधान पुढिलिया कथेसी ॥८९॥इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे मयूखादित्यमाहात्म्यवर्णनं नाम षट्चत्वारिंशाध्यायः ॥४६॥॥ श्रीसांवसदाशिवार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP