मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड| अध्याय ६५ वा काशी खंड प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा काशीखंड - अध्याय ६५ वा स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे. Tags : kashikhandapothipuranकाशीखंडपुराणपोथी अध्याय ६५ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ अगस्ति वदे जी षडानना ॥ कृपाळुवा स्वामी अष्टाद शलोचना ॥ तुम्हां शरणजी शिव नंदना ॥ स्वामी षण्मुखा ॥१॥कल्पूनि अपत्याची उदचिंता ॥ देशावरा क्रमिजे द्रव्यहिता ॥ मार्गीं वरपडा होय अवचिता ॥ तस्करासी पैं ॥२॥तैसा काशी वियोग हा दीर्घ चोर ॥ हा शिवमार्गींचा तस्कर ॥ तुम्ही देतां मज पीय़ूषाचा आहार ॥ तो मध्येंचि हरी हा ॥३॥मग बोलता जाहाला शिव नंदन ॥ अगस्ति तुवां जिंकिलें ब्रह्मस्थान ॥ तरी या तस्कराचा अव गुण ॥ न मानिजे तुवां ॥४॥काशी वियोग हा नव्हे तस्करु ॥ हा तुझा सखा विवेकविचारु ॥ जेणें प्राप्त होइजे पूर्ण गुरु ॥ ब्रह्मविद्येचा पैं ॥५॥घडे वियोगाचा संगर्ग ॥ तेणें वाटे पृच्छेचा प्रसंग ॥ मग द्दश्य होय परमार्थ मार्ग ॥ सायुज्यमुक्तीचा ॥६॥तरी हा ऐसा वियोग प्राप्त करीं ॥ मुक्तिपावन होय काशी पुरीं ॥ जेणें सानुकूल होय त्रिपुरारी ॥ तोचि हा वियोग ॥७॥अगस्ति वदे जी शिवसुता ॥ स्वामी मज तृप्ति होईल कैं आतां ॥ मी कल्पवृक्षातळीं असतां ॥ राहिलोंसें क्षुधाक्रांत ॥८॥स्वामी जें प्रश्नील माझा मनो भाव ॥ तो फेडावा जी माझा संदेह ॥ भक्ति विरहित मज देव ॥ प्रसन्न होतोसी ॥९॥तरी एक प्रश्न असे जी स्वामी ॥ जैसा अमृतकर शोभे व्योमीं । तैसा तो मुक्तिमंडपधामीं ॥ नंदिकेश्वर ॥१०॥जेणें शिवासी नाम जाहालें पशुपती ॥ तो नंदिकेश्वर महाबळाकृती ॥ मज निरूपा जी बळ उत्पत्ती ॥ त्या नंदिकेश्वराची ॥११॥हा त्रिविधाकार कैसा जी नंदी ॥ हा सर्वकाळ शिवाचा संवादी ॥ मज श्रुत करा जी याची यादी ॥ मूळ अवसान ॥१२॥स्वामी म्हणे गा मैत्रावरुणी ॥ तुज योग प्राप्त हा दिनमणी ॥ तेणें लाधलासी पूर्ण खाणी ॥ शिव कथारत्नांची ॥१३॥तरी परियेसीं मूळ उप्तत्ती ॥ शिवाची इच्छा ते काशी अविमुक्ती ॥ ते अविनाशी प्रलयांतीं ॥ शिव धामिनी ते ॥१४॥तैसा हा नंदी प्रलयीं अविनाश ॥ हा साक्षात सदा शिवाचा अंश ॥ अक्षर होता परमपुरुष ॥ तो क्षर जाहाला ॥१५॥षण्मुख म्हणे गा अगस्तिॠषी ॥ बरवी पृच्छा केली त्वां आम्हांसी ॥ हें महादोषांचें हरण मानसीं ॥ उद्भवलें तुझ्या ॥१६॥तुज सुचलें परोपकरक ॥ तरी परियेसीं गा भाव पूर्वक ॥ जेणें परा भवती दोषादिक ॥ सहस्त्र जन्मांचे ॥१७॥तरी या नंदीची मूळ कथा ऐसी ॥ हा कैसा प्राप्त जाहाला शिवासी ॥ येणें पराभविलें कवणासी ॥ आपुलेनि पुरुषार्थपणें ॥१८॥विरिंचिनाथाचा जो कुमर ॥ वृताशुनामें महाऋषीश्वर ॥ जयाचे अर्घ्यांजळीं अवतार ॥ मत्स्य जाहाला प्रथम ॥१९॥त्या वृताशुऋषी पासुनी ॥ महाऋषि जन्मला शिखिमुनी ॥ शिखेपासाव जन्मला म्हणोनी ॥ हेंचि गुण नाम ॥२०॥तो गेला होता अमर भुवना ॥ भेटावया कश्यप नंदना ॥ महातपसा धक प्रज्ञा ॥ देखिला वज्र धरें ॥२१॥सुरेंद्र बैसलासे सिंहासनीं ॥ जयंत कुमर शची नंदिनी ॥ सभे होतसे पैखणी ॥ नृत्यां गनांची ॥२२॥ऐसा सर्व देवेंसीं अमरेश ॥ तेणें देखिला शिखिमुनी तापस ॥ देखोनि उद्भवला महाद्वेष ॥ सुरेंद्रचित्तीं ॥२३॥मृत्यु मंडळींचा जो तपेश्वरी ॥ तो सुरेंद्राचा अत्यंत वैरी ॥ देखों न शके त्या सभेमाझारी ॥ त्या ऋषीश्वरासी ॥२४॥ऋषीनें केलें आशीर्वचन ॥ परी राजमदाचें उन्मत्तपण ॥ तापसियाचा कीजे सन्मान ॥ हें नाहीं अमरपदीं ॥२५॥अगस्ति वदे जी शिवकुमरा ॥ तूं पृच्छा परिहराचे भांडारा ॥ तरी सन्मान कैसा दातारा ॥ निरूपावा मज ॥२६॥षण्मुख म्हणे गा महातापसा ॥ आतां सन्मान तो म्हणिजे कैसा ॥ सत्त्व गुण विरहित पुरुषा ॥ न उद्भवे मानसीं ॥२७॥वृद्ध अथवा नृपति ज्ञानी ॥ सत्पात्र देव महंत मुनी ॥ तरी सन्मान कीजे नम्र होऊनी ॥ करिजे गा कैसें ॥२८॥प्रथम मधुरशव्दीं स्वधर्मीं ॥ यावें जी ऐसें म्हणिजे स्वामी ॥ तरी तो पूर्ण चंद्रवत व्योमीं ॥ आल्हादभरित ॥२९॥बैसकार आणिक आसनें ॥ पूजा विधि आणि दक्षिणा देणें ॥ सप्तपदें बहुधा जाणें ॥ ऐसा हा सन्मान ॥३०॥इंद्रसभेसी गेला तो शिखि ऋषी ॥ हा सन्मान नव्हेचि त्यासी ॥ ऐसे नम्र गुण लक्ष्मी वंतासी ॥ अल्पचि असती मही मंडळीं ॥३१॥तेथें उभा राहिला शिखिमुनी ॥ सन्मान न करी वज्र पाणी ॥ त्याचें आशी र्वचन ॥ अव्हेरूनी ॥ न पाहे सुरनाथ ॥३२॥स्वामी म्हणे गा महातपेश्वरी ॥ हे कथा जुनाट पूर्वापारीं ॥ तैं नव्हतीं सुरपतीच्या मंदिरीं ॥ चतुर्दश रत्नें ॥३३॥बहु इंद्र गेले होऊनी ॥ तैं विरिंचि होता एका मनी ॥ क्रोधाय मान झाला महामुनी ॥ देखोनि निर्भर्त्सना ॥३४॥क्रोधें संतप्त झाला तो शिखी ॥ मग प्रत्युत्तर वदला मुखीं ॥ तुज ऐसा करीन सहस्त्राक्षी ॥ दुसरा अमरेंद्र ॥३५॥जंव देखिलें नाहीं वृषभ ध्वजा ॥ तंव सन्मान नाठवे सहजा ॥ ऐसीं इंद्रासी बोलोनि पैजा ॥ निघाला तो ऋषी ॥३६॥मग विंध्यगिरीचे पाठरीं ॥ ऋषि आला त्या सरोवरीं ॥ जेथें विरिंचिनाथें पर्वतावरी ॥ साधिलें तप ॥३७॥तेणें मांडिलें जी तप दारुण ॥ पंचाग्नि आणि धूम्रपान ॥ सहस्त्र वर्षें अनुष्ठान ॥ साधिलें तेणें ॥३८॥मनीं धरूनि पुत्र कामना ॥ तेणें आराधिलें चतुरानना ॥ देवा धीशा स्रुरेंद्रा घाली आंकणा ॥ ऐसा दीजे पुत्र ॥३९॥ऐसें जाणोनियां सृष्टिकर ॥ देखोनि तपाचा गिरिवर ॥ मग पावला सावित्रीवर ॥ मानस सरोवरीं ॥४०॥विरिंचि म्हणे गा जाहालों प्रसन्न ॥ तंव ब्रह्मचारी वदे वचन ॥ अमरपद जिंकी इंद्रा पासून ॥ ऐसा द्यावा पुत्र मज ॥४१॥मग मनीं विचारी विरिंची ॥ म्हणे हे परात्परसिद्धि नव्हे आमुची ॥ आम्ही रचना करितों सृष्टिची ॥ न देखों वेदीं ॥४२॥तरी मुनि परिसीं माझें वचन ॥ काशीस्थळीं पूजिजे पंचानना ॥ विश्वंभर आराधिलियाविण ॥ हा वर नव्हे प्राप्त ॥४३॥विरिंचि म्हणे गा महामुनीश्वरा ॥ काशी मध्यें पूजीं कर्पूर गौरा ॥ तेथें भक्ति केलिया ईश्वरा ॥ तत्काळ पाविजेल ॥४४॥मग विधीनें तयासी सांगीतला मंत्र ॥ जेणें प्रसन्न होय पंचवक्त्र ॥ म्हणे आराधीं त्रिनेत्र ॥ सुफळ होतील मनोरथ ॥४५॥मग ऋषि आला आनंदवनीं ॥ पूर्व भक्तीचे अवसानीं ॥ लिंग स्थापिलें पंचाननी ॥ तंव पावला शिव ॥४६॥शिवेश्वर लिंग स्थापिलें होतें ॥ अनुष्ठानें केलीं सहस्त्रशतें ॥ मग पूर्ण भक्ति देखोनि उमाकांतें ॥ प्रकटला शिव ॥४७॥ध्यानीं बैसला होता महा ऋषी ॥ शिवें करें स्पर्शिलें त्यासी ॥ म्हणे इच्छावर प्राप्त जाहा लासी ॥ या काशी स्थळीं ॥४८॥ ऋषीनें देखिला त्रिपुरारी ॥ मग पूजा अंबु घेतलें करीं ॥ शिव नामस्तोत्रें वाचे उच्चारी ॥ मग कैसें वर्वलें ॥४९॥ मानसीं विचारी उमाकांत ॥ वर दीजे पाहूनि याची आर्त ॥ मग विचारू नियां आपुलें मत ॥ कैसा वर दिधला ॥५०॥तृतीय नेत्र स्फुरिला शंकरें ॥ त्रिमूर्ति आकर्षिली त्रिविधाकारें ॥ त्यासी उत्पत्ति जाहाली याच्या द्वारें ॥ त्या त्रिविधा कवणी ॥५१॥पृथ्वी परिध करावयासी ॥ वरुण पुत्र दिधला कर्दमासी ॥ शिवाच्या भाललोचनीं तयासी ॥ उत्पत्ति जाहाली ॥५२॥कश्यपासी दिधला जो कुमर ॥ तोही तृतीय नेत्रींचा समीर ॥ दितीचे गर्भीं जाय तो वज्र धर ॥ विजयी जाहाला ॥५३॥आणिक एका वैश्वानरा ब्राह्मणासी ॥ प्रसन्न जाहाला तो काशी निवासी ॥ गार्हपत्याग्नि पुत्र दिधला तयासी ॥ तृतीय भाल चक्षूतुनी ॥५४॥ऐसा वरुण वायु आणि गार्हपती ॥ यांची शिवें आकर्षिली अर्धशक्ती ॥ शिखिमुनि केला अतितृप्ती ॥ महादेवें ॥५५॥या त्रिवर्गाची आकर्षिली शक्ति पूर्ण ॥ तीनचि अक्षरें करी पंचानना ॥ तो त्रिविधाकार कवण कवण ॥ समर्पिला मुनीसी ॥५६॥त्रिअक्षरांचा करू नियां मंत्र ॥ मुनीसी देता झाला त्रिनेत्र ॥ म्हणे इच्छे सारिखा पावशील पुत्र ॥ हा मंत्र जपतां ॥५७॥तरी तो त्रिअक्षर मंत्र कैसा ॥ जो शिवें प्राप्त केला तापसा ॥ स्वामी म्हणे अगस्ति ऐस ॥ परियेसीं आतां ॥५८॥वकार अक्षरीं घेतला वरुण ॥ सकार अक्षरीं शिव आपण ॥ बकार अक्षरीं साक्षात पवन ॥ हा त्रिअक्षरीं बसवा ॥५९॥षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ कीं होईल त्रिदेवांची शक्ती ॥ शिवें प्रेरिली मंत्राची युक्ती ॥ कीं ते त्रिदेवांची ॥६०॥बकार तो बोलिजे ब्रह्म ॥ वकार तो साक्षात पुरुषोत्तम ॥ सकार म्हणिजे पूर्ण आगम ॥ शंकर तो ॥६१॥आतां असो हा गुप्त श्रृंगार ॥ श्रोतियां निरोंपू उघड विचार ॥ शिखिमुनीसी दिधला कुमर ॥ कवणिये शक्तीचा ॥६२॥श्रोत यांसी महा राष्ट्राची आवडी ॥ तेथें कायसी संस्कृता पांझडी ॥ या उभयां माजीं अत्यंत गोडी ॥ ते महा राष्ट्राची ॥६३॥त्या दोहीं माजीं जैसें प्रति अंतर ॥ जैसें तडाग-कूपनीर ॥ या उभयतांचा ऐसा विचार ॥ प्रति अंतरें ॥६४॥वापी कूपोदक तें अप्राप्त ॥ पात्रदोरेंवीण नव्हे प्राप्त ॥ तैसें जाणावें जी संस्कृत ॥ इतर जनांसी ॥६५॥जें तडागसरि तांचें जीवन ॥ तें करांजळीं प्राशिती सर्व जन ॥ म्हणोनि प्रतिष्ठा वदती पुराण ॥ महा राष्ट्राची ॥६६॥म्हणोनि असो हा गुप्त प्रकार ॥ ब्रह्मा तो बोलिजे जलधर ॥ विष्णुरूप तो साक्षात समीर ॥ शिव तो हुताशनी ॥६७॥ऐशा या त्रिविध देव मूर्ति ॥ हाचि मंत्र स्थापिला तो पशुपती ॥ मग शिखिमुनी जपतसे युक्तीं ॥ त्रिसहस्त्रवरी ॥६८॥मग त्र्यंबक म्हणे रे पुत्रार्था ॥ तूं प्राप्त होसी चिंतिल्या पदार्था ॥ परी माझिया शब्द पर मार्था ॥ चित्त एकाग्र करीं ॥६९॥चतुर्दश मन्वंतरवरी ॥ इंद्र भोक्ता असे अमर पुरीं ॥ पुण्यांतीं लोटेल पृथ्वी वरी ॥ आपनचि तो ॥७०॥ परी तुझा पुत्र तो सकळांसी ॥ जिंकील सुरेंद्रादि देवांसी ॥ स्वर्ग-मृत्यु-पाताळ पुटवासी ॥ न धेती समफळी यातें ॥७१॥त्र्यंबक म्हणे गा शिखिमुनी ॥ तो होईल चतुर्दश रत्नांचीं खाणी ॥ ऐसें बोलिलें वेदपुराणीं ॥ भविष्य माझें ॥७२॥मस्तकीं ठेविला अभय कर ॥ शिवें आश्वासिला तो ऋषीश्वर ॥ मस्तकीं जन्मेल तुझा कुमर ॥ त्रिविध मूर्ती तो ॥७३॥ऐसा प्रसन्न केला शूल पाणी ॥ मग ऋषि आला आपुले स्थानीं ॥ मंत्रविधीं बैसला अनुष्ठानी ॥ या मानससरोवरीं ॥७४॥शिखेसी ग्रंथि घालू नियां शिरीं ॥ मग सहस्त्र मंत्र जप करी ॥ त्र्यक्षर मंत्र त्रिमूर्ति स्मरी ॥ विधि हरि हर ॥७५॥मग शिखेची सोडो नियां ग्रंथी ॥ तंव तो पडिला दिव्य दीप्ती ॥ वत्सरूप जैसा महा मूर्ती ॥ वत्सरूप तो ॥७६॥पीतां बर वर्ण मिरवतसे मौळीं ॥ हिरण्य वर्ण मिरवे कंठ स्थळीं ॥ रक्तांबर वर्ण मुख मंडळीं ॥ मध्यें वर्ण जल धर ॥७७॥गार्ग पत्याग्नीचें परिधान ॥ तेंचि मौळीं पीतां बर वसन ॥ हें आणिलें पैं साक्षी कारण ॥ महा ऋषी प्रति ॥७८॥ध्वजा उभारिली पुत्र नंदीची ॥ तेथें जाणो नियां आला विरिंची ॥ तेणें घटिका पाहिली मुहूर्ताची ॥ केलें नाम धारण ॥७९॥विरिंचीनें जन्मकाळ पाहिला ॥ तंव तो हस्ताकीं असे उद्भवला ॥ मग निश्चय करोनि वदता झाला ॥ सृष्टिकर तो ॥८०॥विधीनें जातक वर्णिके वेदीं ॥ तो जाहाला हस्तार्क तृतीयपदीं ॥ म्हणोनि जन्म नाम झालें नंदी ॥ विरिंचि मुखें ॥८१॥विरिंचि म्हणे जी मुनिवरा ॥ हा वेदीं ऐसा निघाला निर्धारा ॥ हस्ताकीं जन्म तो योगीश्वरां ॥ वंद्य होय ॥८२॥गृहीं नवनिधी वोळंगती ॥ अश्व-गज-रथां नाहीं मिती ॥ हा परा भवील सुरपती ॥ अढळ जो इंद्रपदीं ॥८३॥मस्तकीं मिरवती पट्टसूत्रें ॥ ध्वज अंकुश कुंडल छत्रें ॥ अंगीं न रुपती अस्त्रें ॥ प्रौढद्शे मध्यें ॥८४॥विरिंचि म्हणे गा शिखि ऋषी ॥ ऐसें वरदान असे त्यासी ॥ हा नकत्र काळ नर मान वांसी ॥ निर्मिला शंकरें ॥८५॥ऐसा हा त्रिविध मूर्ती ॥ म्हणोनि नाम योजिलें प्रीतीं ॥ मग विरिंचि गेला अगस्ती ॥ सत्यलो कासी ॥८६॥मग पित्यासी प्रार्थी नंदिकेश्वर ॥ मज देईं पीयूष आहार ॥ मी झालों जी क्षुधातुर ॥ पीयूष आहारासी ॥८७॥ऋषीनें जाणूनि क्षुधातुर ॥ नेणे मानसीं केला विचार ॥ मग दाख विता झाला सागर ॥ क्षीरार्णव तो ॥८८॥मग तो वत्सराज आज्ञा भावा ॥ पितृ आज्ञें गेला क्षीरार्णवा ॥ मनो वृत्तीं संतोषला तेव्हां ॥ देखोनि क्षीरार्णव ॥८९॥मग प्राशूं लागला तो सागर ॥ तेणें मानसी केला विचार ॥ म्हणे हा नंदिकेश्वर ॥ म्हणोनि हे उपमा ॥९०॥कीं तो क्षीरघृतें भक्षिता वन्ही ॥ अग्नि तो साक्षात नंदी म्हणोनी ॥ कीं तो वृष्टिविध्वंसक गगनीं ॥ समीर नंदी ॥९१॥तेणें शोषिलें सागरींचें क्षीर ॥ ऊर्ध्व शब्दें गर्जवीं अंबर ॥ तंव धांवले महावीर ॥ विष्णूचे दूत ॥९२॥तेथें दश कोटी राखनाईत ॥ नंदी वरी धांधिन्नले अकस्मात ॥ ते नभीं परा भविले त्वरित ॥ पुनरपि क्षीर भक्षी ॥९३॥तेणें क्षीरा मृताचा ग्रास केला ॥ मग तैसाचि शुभ्र वर्ण झाला ॥ जैसा रंगें पाषाण पालटला ॥ काश्मीर तो ॥९४॥विष्णु दूत म्हणती नंदीसी ॥ हा शेष शयन तूं कां नेणसी ॥ श्रूत होईल वैकुंठ नाथासी ॥ मग तूं कैंचा सत्य ॥९५॥हें श्रुत होईल रे आदि पुरुषा ॥ तेव्हां तुज प्राप्त होईल यमफांसा ॥ आतां तूं नेणत आलासी स्वदेशा ॥ जाईं रे मागुता ॥९६॥ऐसे विष्णु दूत अनुवादले ॥ वीर गुंठीं धरोनि नंदीनें टाकिले ॥ म्हणे जा जा रे पाचारा वहिलें ॥ तुम चिया अतु र्बळीसी ॥९७॥मग हरी पासीं गेले किंकर ॥ त्यांहीं हरीसी सांगीतला समाचार ॥ म्हणे भक्षिलें जी समस्त क्षीर ॥ पयोदधीचें ॥९८॥स्थूळ दिसतसे भद्रजाती ॥ समुद्र शोपिला नाहीं गणती ॥ कीं महा ऋषि अगस्ती ॥ किंवा महा दैत्य ॥९९॥इतुका परिसोनि वृतांत ॥ क्रोधाय मान जाहला लक्ष्मीकांत ॥ आयुधें घेऊनि त्वरावंत ॥ आला पुरुषोत्तम ॥१००॥तो हरीनें विंधिला सहस्त्र वाणीं ॥ महा शस्त्रें वर्षी चक्र पाणी ॥ गदा घातें उद्भवली ध्वनी ॥ मेघ गर्जनेपरी ॥१०१॥जैसा पाषाण पडे गिरीचे पाठारीं ॥ मग तो जैसा आपणा तेंचि अव्हेरी ॥ तैसीं हरीचीं शस्त्रें ॥ नंदी शरीरीं ॥ लागती जैसीं शुष्क तृणें ॥१०२॥नंदिकेश्वर कोपें खवळला ॥ तेणें हरि नासिकास्वरें उडविला ॥ सत्यलो कापर ताही टाकिला ॥ नंदिकेश्वरें वैंकुंठीं ॥१०३॥सवेंचि आकर्षिला घ्राण स्वरीं ॥ जैसा योगीश्वर धूम्रपान करी ॥ तैसा नंदीनें आदळिला हरी ॥ नासा ग्रवातें ॥१०४॥जैसीं वात चक्रीं तरुपत्रें ॥ तीं व्योमीं भ्रमती वात सूत्रें ॥ तैसा हरि भ्रम विला पुत्रें ॥ शिखिमुनी चिया ॥१०५॥ऐसा तो सहस्त्र वरुषें हरी ॥ भ्रमत होता नंदीचे नासा स्वरीं ॥ मग चित्तीं स्मरोनि विचारी ॥ पद्मनाभ तो ॥१०६॥तेणें हरि टाकिला व्योम कुटीं ॥ मग नंदी पाहे उर्ध्वद्दष्टीं ॥ तंव हरीनें हाणी तला मुष्टीं ॥ गदा घातचि तो ॥१०७॥हरिसी पीडा जाहाली नासा स्वरीं ॥ तेणें दुःख मानिलें शरीरीं ॥ म्हणोनि गदा घात नंदी वरी ॥ टाकिला हरीनें ॥१०८॥नंदी पाहे ऊर्ध्व मुख गती ॥ तंव हरीची गदा बैसली द्विज पंक्तीं ॥ दशन भेदो नियां लक्ष्मी पतीं ॥ मानिला जयो ॥१०९॥षण्मुख वदे अगस्तीतें ॥ विरिंचीनें जातक वर्णिलें होतें ॥ तें नंदीसी आदान जाहालें निरुतें ॥ जन्म नक्ष त्राचें ॥११०॥नंदीचे दशन पाडी हरी ॥ शोणित वाहे पृथ्वीवरी ॥ तो सरिता संगम क्षीर सागरीं ॥ जाहाला जी पूर्ण ॥१११॥मग तेथें वर्तलें महाचोज ॥ जें दशनीचें पडलें रक्तबीज ॥ तयाचीं नाना रत्नें जाहालीं सहज ॥ नंदी शोणितांचीं ॥११२॥गदा धातें नंदिकेश्वर त्रासिका ॥ तेणें रत्नबीज प्रसवला ॥ चतु र्दशरत्नांचा जन्म जाहाला ॥ तो कैसा नंदी पासुनी ॥११३॥रत्नें उद्भवलीं आपुले शरीरीं ॥ तीं नंदिकेश्वर ॥ टाकी सागरीं ॥ षपमुख म्हणे महातपेश्वरी । परियेसीं रत्न जन्म ॥११४॥मुखां तूनि काढी लक्ष्मीचा अंकुर ॥ रत्नें प्रसवता जाहाला नंदि केश्वर ॥ लक्ष्मी उद्भवली सर्व श्रृंगार ॥ सहवर्म मान ॥११५॥नंदी स्फुरण करी दक्षिण हस्तीं ॥ तेणें उद्भवला जी दिव्य दीप्ती ॥ तो चतु र्दंश शुभ्र ऐरावती ॥ तोही टाकिला सागरीं ॥११६॥नंदीनें स्फुरिला आपुला चरण ॥ तेणें उद्भवला वारू शुभ्र वर्ण ॥ जो सप्त मुखगती श्यामकर्ण ॥ उच्चैःश्ववा नाम तो ॥११७॥मग पुच्छ झाडी नंदिकेश्वर ॥ तों उद्भवला महा तरुवर ॥ तो जैसा महाविद्येचा दातार ॥ कल्पद्रुम नामें ॥११८॥चकोरां स्त्रवत पीयूष आहार ॥ जो षोड शकळीं अमृतकर ॥ तो चंद्रमा रोहिणीवर ॥ जन्मला नंदी ह्रदयीं ॥११९॥मौळीं मिरव्त होता वासुकीच्या ॥ जो शोभा यमान कंठीं विष्णूच्या ॥ तो कौस्तुभ दिव्य तेजाचा ॥ नेत्रीं जन्मला नंदीचे ॥१२०॥विघ्न केलें उद्दालक ऋषीचे घरीं ॥ जे चतु र्दश कटाक्ष निशाचरी ॥ ते जन्मली नंदीचे वाम करीं ॥ लक्ष्मी सरिसी ॥१२१॥प्रळयान्त मांडिला होता समय ॥ शिवें त्रिपुरासी केला क्षय ॥ त्र्यंबक धनुष्यें प्राप्त केला जय ॥ तें जन्मलें नंदीचे श्रृंगीं ॥१२२॥अमृत करावया कालकूटीं ॥ महा विष परा भवी द्दष्टीं ॥ तो धन्वं तरी जन्मला नासा पुटीं ॥ नंदिकेश्वराचे ॥१२३॥सर्व देवां भक्षावयाची अति प्रीत ॥ मर्त्यजंतु तत्काळ होती स्वस्थ ॥ तें नंदीचे जिव्हाग्रीं अमृत ॥ उद्भवलें पैं ॥१२४॥देवां परोपकारास्तव प्राणु ॥ कल्पितां तृप्त होती सर्व जनु ॥ ते नंदीचे लिंगीं कामधेनु ॥ जन्मली पैं ॥१२५॥शिरें कापिलीं समुद्रमथनीं ॥ असुर उन्मत्त केले मोहनीं ॥ ते मंदिरा जन्मली स्वेदा पासुनी ॥ नंदीचे ॥१२६॥जेणें सुनीळ जाहालें व्योमपुट ॥ शिवासी नाम जाहालें नीलकंठ ॥ तें नंदीचे मुखफेणीं कालकूट ॥ जन्मलें विष ॥१२७॥रंभा आदि सर्व अप्सरा ॥ ज्या अष्ट नायिका लाव्ण्य सुंदरा ॥ त्या सर्व देव भक्तीसी तत्परा ॥ जन्म लिया वामचरणीं ॥१२८॥महारणी ज्याचे स्फुरणा विण ॥ महा शूरांसी नव्हे धीरत्व गुण ॥ तो देव द्त्त शंख सगुण ॥ जन्मला दशनीं ॥१२९॥ऐसीं चतु र्दश रत्नें उद्भवलीं ॥ तीं क्षीर सागरीं प्रवाहिलीं ॥ तीं क्षीरार्णवाचे ह्रदयीं राहिलीं ॥ सहस्त्र वरुषें ॥१३०॥नंदी चिया दशन शोणितें ॥ समुद्री जाहालीं जळजंतें ॥ नाना जल जीव शंख मुक्तें ॥ सर्वही पैं ॥१३१॥आतां असो हें पुढें नंदी-विष्णु ॥ युद्धा प्रवर्तले महादारुणु ॥ तेथें दोघीं धरिला अभिमानु ॥ महाशूर त्वाचा पैं ॥१३२॥नंदिकेश्वर आणि वन माळी ॥ दोघे मल्ल युद्धा आले समफळीं ॥ गर्जना करितां व्योमंडळीं ॥ महादीर्घ ध्वनीं ॥१३३॥क्रोधें आवे शला ऋषि नंदन ॥ मौळीं झडपें हाणीतला नारायण ॥ ह्रदयीं दाटला दखिण चरण ॥ पडिला तळीं ॥१३४॥क्षितितळीं पाडिलें शार्ङ्गधरा ॥ पळ सुटला विष्णु किंकरां ॥ थोर आंदोळ जाहाला क्षीर सागरा ॥ तेणें मर्यादा सांडिली ॥१३५॥एक सहस्त्र साठ संवत्सर ॥ दोघां युद्ध जाहालें अत्यंत क्रूर ॥ परी तो त्रिविध नंदिकेश्वर ॥ नाटोपे हरीसी ॥१३६॥मग बुद्धीनें विचारी नारायण ॥ म्हणे अगम्य याची शक्ति पूर्ण ॥ हरि म्हणे माग रे मी प्रसन्न ॥ इच्छा तुझी ॥१३७॥तूं कोठील कवणाचा आत्मज ॥ ऐसें प्रश्निता जाहाला गरुड ध्वज ॥ तंव बोलतसे वत्सराज ॥ पुरुषोत्तमासी ॥१३८॥माझें नांव बसवा नंदिकेश्वर ॥ मी शिखि मुनीचा कुमर ॥ क्षुधा क्रांत येथें क्षीर सागर ॥ प्राशूं आलों ॥१३९॥इतुकें परि सोनियां श्रीपती ॥ वंदन केलें बद्ध हस्तीं ॥ साष्टांग मस्तक ठेवूनि क्षितीं ॥ म्हणे भृत्य तुमचा मी ॥१४०॥मग शांत करो नियां क्षत्रिय धर्म ॥ दोघांहीं विसर्जिला संग्राम ॥ मग स्तुति करी पुरुषोत्तम ॥ नंदिकेश्वराची ॥१४१॥हरि म्हणे जी नंदिकेश्वरा ॥ तूं श्रेष्ठ जी सर्व गणांच्या वरा ॥ आतां मी एक मागेन दातारा ॥ तें मज प्राप्त करीं ॥१४२॥प्रथम तुम्हांसी जाहालों प्रसन्न ॥ हेंही अनुवादलों वचन ॥ तरी तुझिया रक्तबीजा पासून ॥ होतील रत्नखाणी ॥१४३॥हें माझें आशी र्वचन तुम्हांसी ॥ आतां इच्छावर दीजे आम्हांसी ॥ जें वसत आमुचे मानसीं ॥ तें सांगा तुम्हां ॥१४४॥नंदिकेश्वरासी प्रार्थी वनमाळी ॥ तुम्हीं चरण ठेविला माझे वक्षःस्थळीं ॥ पद उमटलें ह्रदय कमळीं ॥ तें मज भूषण ॥१४५॥हें मज प्राप्त केलें परम निधान ॥ हा माझा शृंगार श्रीवत्सलांछन ॥ महाबळी दैत्यांसी मर्दीन ॥ याचेनि अधिकारें ॥१४६॥हें पद माझे अंगीं सज्ज निश्चितीं ॥ वज्राहूनि घनवट अंगीं शक्ती ॥ दैत्य संहारीन क्षितीं ॥ करीन पुण्यवृद्धी ॥१४७॥तुम्हां संग्रामा नाहीं जी प्रीती ॥ परी माझी पूर्व पुण्याची प्राप्ती ॥ मज प्रसन्न व्हावया उचिती ॥ क्षमा केली तुम्हीं ॥१४८॥म्हणोनि घातलें लोटांगण ॥ माझें ब्रह्मतत्त्व गा सगुण ॥ मज क्षमा कीजे संपूर्ण ॥ थोर अन्यायी मी ॥१४९॥ऐसी नंदिकेश्वराची स्तुती ॥ हरीनें केली परम प्रीतीं ॥ मग नंदिकेश्वर विष्णू प्रती ॥ प्रसन्न जाहाला ॥१५०॥म्हणे माग माग रे पुरुषोत्तमा ॥ तुज मी प्रसन्न जाहालों मेघ श्यामा ॥ तूं संपूर्ण सिद्धी आगमा ॥ सर्वां वंद्य हरी ॥१५१॥नंदीसी प्रार्थी शार्ङ्गधर ॥ तुम्हीं दिधला मज पूर्ण वर ॥ तरी तुझिया मस्तकाचा पीतांबर ॥ प्राप्त करीं मज ॥१५२॥मग मौळींचा दिव्य पीतांबर ॥ समर्पिला हरीसी सपरिकर ॥ मग नाम पावला शार्ङ्गधर ॥ पीतांबरधारी ॥१५३॥नंदी मुखीं जन्म लक्ष्मीसी ॥ म्हणोनि श्रीवत्स म्हणसी त्यासी ॥ हेंचि श्रीवत्सलांछन विष्णूसी ॥ ऐसें झालें ॥१५४॥ऐसा विष्णूसी झाला पूर्ण वर ॥ मग नंदीनें आश्वासिला शार्ङ्गधर ॥ शुभ्र होऊ नियां वेग वत्तर ॥ आला पितृ स्थानीं ॥१५५॥षण्मुख म्हणे गा अगती ॥ ऐसी नंदिकेश्वराची उत्पत्ती ॥ हा शिवासी प्राप्त जाहाला त्रिमूर्ती ॥ तो कैसा आतां ॥१५६॥ऋषि वाक्य तें म्हणिजे निर्गुण ॥ परी श्रोते जनीं कीजे व्याख्यान ॥ तेचि हे महा राष्ट्र भाषा सद्गुण ॥ जनां परोपकार ॥१५७॥आतां श्रवण दीजे कथेसी ॥ नंदी जाईल अमर पदासी ॥ ते कथा परिसा पुढारी कैसी ॥ म्हणे शिव दास गोमा ॥१५८॥इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे नंदिकेश्वरोत्पत्ति महात्म्यवर्णनं नाम पंचषष्टितमाध्यायः ॥६५॥॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP