मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड| अध्याय १० वा काशी खंड प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा काशी खंड - अध्याय १० वा स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे. Tags : kashikhandapothipuranकाशीखंडपुराणपोथी अध्याय १० वा Translation - भाषांतर होय आपणा ॥१॥मग तो गार्हपत्याग्नी ॥ तपःसाधनीं संकल्प धरोनीं ॥ मग आला आनंदवनीं ॥ जान्हवीतीरीं सत्वर ॥२॥तेणें मणिकर्णिकेसी केलें स्नान ॥ नमस्कारिला देहलीगण ॥ मग विश्वनाथासी प्रेमभावेंकरून ॥ केला साष्टांग नमस्कार ॥३॥सुवर्णकमळें बहु सुभट ॥ महासुंदर अनुच्छिष्ट ॥ दिव्यतेजें दंडीं नीट ॥ ऐसीं सहस्त्र अष्टकें ॥४॥बिंब नुगवतां तरणीचें ॥ अंबु आणी तो मणिकर्णिकेचें ॥ स्नपन करी विश्वनाथाचें ॥ वैश्वानरसुत तो ॥५॥अष्टोत्तरशत कमंडलू भरून ॥ स्वर्गसरितेचें आणोनि जीवन ॥ करीतसे नित्य स्नपन ॥ उमावराचें आदरें ॥६॥त्रिकाळ स्नान नित्य करी ॥ नित्य राहे पवनआहारी ॥ ऐस पूजिला त्रिपुरारी ॥ षण्मासवरी साक्षेपें ॥७॥नारदें सांगितली होती खूण ॥ जैं सौदामिनीपासाव आदान ॥ तें सत्य करावया वचन ॥ वज्रधर तेथें पावला ॥८॥गंगोदकें कुंभ भरूनियां ॥ जात होता हर पूजावया ॥ तंव देवें रचिली माया ॥ वज्रधरें ते काळीं ॥९॥गार्हपत्याग्नि पाचारिला जवळी ॥ मेघ दाविला अभ्रमंडळीं ॥ मग वज्र तुळिलें त्या काळीं ॥ सुरेशें अग्नीवरी ॥१०॥प्रळयमेधींच्या विद्युलता ॥ सहस्त्र एक कडकडितां ॥ तैसें वज्र देखिलें तुळितां ॥ अमरेश्वरासी ॥११॥देखिला प्रळयाग्निकल्लोळ ॥ भयभीत झाला वैश्वानरबाळ ॥ मग क्षणैक राहोनि निश्वळ ॥ झाला मूर्च्छागत ते ठायीं ॥१२॥त्या बाळकासी म्हणे वज्रपाणी ॥ भयभीत कां झालासी मनीं ॥ मग उठविला करीं धरूनी ॥ अमरनाथें तेधवां ॥१३॥म्हणे माग माग रे तुज मी प्रसन्न ॥ तुझी पावली भक्ति परिपूर्ण ॥ मग ऊर्ध्वमुख गार्हपत्याग्न ॥ पाहाता झाला अमरेशा ॥१४॥म्हने मज तूं झालासी प्रसन्न ॥ तरी ऐसा तूं समर्थ कोण ॥ म्यां जाणीतला संपूर्ण ॥ मावकर आहेसी तूं ॥१५॥तंव बोलिला देवाधीश ॥ तूं नेणसी रे बाळका मी महेश ॥ तुझिये भक्तिअवसानाचा दिवस ॥ पूर्ण झाला आजि पैं ॥१६॥मग अग्नि म्हणे दुराचारिया ॥ देवांमाजी तूं दीर्धदोषिया ॥ तुवां अभिलाषिली ऋषिभार्या ॥ तरी लांछनी तूं होसी ॥१७॥काय मागावा तुज वर ॥ तूं एक आज्ञाधर ॥ ज्याचे सत्तेनें चराचर ॥ उत्पन्न झालें तो देव ॥१८॥तो वेगळाचि असे अनाथदानी ॥ भरोनि उरलासे त्रिभुवनीं ॥ ऐसें ऐकोनि वज्रपाणी ॥ झाला थोर क्रोधायमान ॥१९॥मग तो ताडूं पाहे वज्रघात ॥ म्हणे करूं या वर्मिकाचा निःपात ॥ तंव धांबिन्नले शिवदूत ॥ गोकर्ण शैलादिगण ते ॥२०॥शिवगण देखतां अति त्वरें ॥ गमन केलें सुरेश्वरें ॥ अद्दश्य होऊनि एकसरें ॥ अमरभुवना पावला ॥२१॥मग त्या शिवगणीं बाळकासी ॥ सत्वर आणिलें शिवापासीं ॥ शिवचरणीं घातलें त्यासी ॥ शिवगणोत्तमीं ॥२२॥मग शंकरें धरिला ह्रदयीं दशकरीं ॥ म्हणे मी झालों तुझा आभारी ॥ तुवां मज पुजिलें षण्मासवरी ॥ ऐसा भक्त नाहीं देखिला ॥२३॥तुज वर दिधला संपूर्ण ॥ तूं माझा तृतीय भाललोचन ॥ तूं भक्तांमाजीं भक्त पूर्ण ॥ तेजरूप जाहलासी ॥२४॥तुज वर द्यावयाकारण ॥ म्यां पूर्वीं केलें विचारण ॥ म्हणोनि मी झालों प्रसन्न ॥ तुजकारणें बाळका ॥२५॥जें त्रिभुवनींचें तेज अदभुत ॥ तें तुज म्यां केलें प्राप्त ॥ तुज वर द्यावया जागृत ॥ असें या स्थळीं सर्वदा ॥२६॥तुझे योगें याग हवन ॥ सर्व प्रकारें विविध धान्य ॥ आणि देवांसी भक्ष्य भोजन ॥ होईल जाण तव मुखें ॥२७॥माझिया भाळीं तृतीय नयन ॥ तो तूं महाप्रळयाग्न ॥ त्रिभुवनींचें कार्य तुजवांचून ॥ निष्फळ जाण सर्वही ॥२८॥जें जें वैश्वदेवीं अग्निहोत्रीं ॥ तें माझेंचि रूप त्रिनेत्रीं ॥ स्वर्गमृत्युपाताळसूत्रीं ॥ जाळिसी प्रळयीं संपूर्ण तूं ॥२९॥जें जें बरवें त्रिभुवनीं ॥ तितुकें तुज दिधलें गार्हपत्याग्नी ॥ तूं सर्व देवांचा भागदानी ॥ महायागसमयीं ॥३०॥जैसा मी व्यापक चराचरीं ॥ तैसा तूं सर्व जंतूंचे जठरीं ॥ महाकल्पांतीं दग्ध करीं ॥ हा ब्रह्मांडगोळ सर्वही ॥३१॥ऐसा वर देत पंचानन ॥ मग शिवें केलें नामधारण ॥ तूं हुताशन पावकाग्न ॥ दाहकत्वें सर्वदा ॥३२॥तूं यागीं वैश्वदेवीं कृशान ॥ तूं प्रभु आणि ज्वलन ॥ तूं भक्षितान्नाचा जाण ॥ पचनकर्ता जीवांचा ॥३३॥ऐसें हरें केलें नामधारण ॥ मग त्यातें स्तविता झाला कृशान ॥ म्हणे जय जय स्मरदहन ॥ भालचक्षु सर्वदा ॥३४॥तूं परात्पररूप प्रेमलिंग ॥ तूं सर्व तेजोमय अंतरंग ॥ तूं उदधि भक्त तरंग ॥ पूर्णपणें शोभसी ॥३५॥तूं अनादि अगोचर ॥ क्षणें संहार ॥ हा सर्व त्रैलोक्यव्यापार ॥ लीलायंत्र तव हस्तीं ॥३६॥आतां जरी करूं तुझी स्तुती ॥ जें बोलावें तें तूं पशुपती ॥ म्हणूनि मस्तक ठेविलें क्षितीं ॥ घातलें लोटांगण ॥३७॥गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसा वर झाला गार्हपत्यासी ॥ मग या अग्निपुरीसी ॥ राज्याधीश केला साक्षेपें ॥३८॥मग शिव म्हणे कृशानूसी ॥ संख्या नाहीं तव पुण्यासी ॥ तूं माझेनि श्रद्धे तुळलासी ॥ त्रैलोक्यव्यापका समर्था ॥३९॥तरी परियेसीं गा त्रैलोक्यदहना ॥ तुवां केली जे लिंगस्थापना ॥ त्यासी म्यां केली नामधारणा ॥ अग्नीश्वर ऐसी पैं ॥४०॥जे अग्नीश्वरलिंग पूजिती ॥ अग्निहोत्री वैश्वदेव जे करिती ॥ अग्नीमाजी जीं नाना द्रव्यें होमिती ॥ तेणें तृप्ती सर्व देवां ॥४१॥गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ तो हा अग्निपुरीनिवासी ॥ ऐसें पुण्यफळ यासी ॥ प्राप्त झालें महातपें ॥४२॥ ऐसे ते सुशील पुण्यशील गण ॥ कीं ते विष्णुमूर्तीच परिपूर्ण ॥ विमानीं बैसोनियां गगन ॥ क्रमिती वैकुंठा जावया ॥४३॥तंव पुढें कवण लोक देखिला ॥ जैसा कृष्णपाषाणेंचि घडिला ॥ दीर्घशरीर विशाल आथिला ॥ गिरिवर जैसा वनांत ॥४४॥शिवशर्मा पुसे गणांसी ॥ हा कवण लोक सांगा आम्हांसी ॥ याचीं तरी पुण्यसामर्थ्यें कैसी ॥ तीं निरूपण करा आम्हांतें ॥४५॥मग शिवशर्म्यासी म्हणती गण ॥ वरवा केला तुवां प्रश्न ॥ तरी परियेसीं आदि अवसान ॥ नैऋतराजयाचें ॥४६॥तरी शिवशर्म्या अवधारीं ॥ दंडकारण्याचे तटीं विंध्यागिरी ॥ महापुण्यशील नगरी ॥ पाठारीं विंध्याद्रीच्या ॥४७॥पिंगाक्ष राजा असे ते स्थळीं ॥ तो जातीचा असे कोळी ॥ तो नित्य पूजी चंद्रमौळी ॥ नित्य क्रमी महापंथ ॥४८॥तो पिंगाक्ष पुण्यात्मा पुण्यसिंधू ॥ गिरिकूटीं असे त्याचा पितृबंधू ॥ तो महातस्कर महाव्याधू ॥ महादुरात्मा तो एक ॥४९॥ताराक्ष नाम असे तयासी ॥ तो असे सदा अरण्यवासी ॥ घात चिंतीतसे बंधुपुत्रासी ॥ महाव्याध अपवित्र तो ॥५०॥तंव कोणे एके दिनीं ॥ कापडी आले काशीयात्रेहूनी ॥ पूजोनियां हरभवानी ॥ तेचि मागीं पातले ॥५१॥ते राहिले तये नगरीं ॥ तंव पिंगाक्ष आला ते अवसरीं ॥ भावें लोटला चरणांवरी ॥ कापडीयांच्या ॥५२॥त्यांचिया चरणांची धूळी ॥ आपुल्या मुखीं घाली ते काळीं ॥ म्हणे मज श्रेय घडलें चंद्रमौळी ॥ पूजिलियाचें अनायासें ॥५३॥मग केशभार मुक्त करी मौळीचे ॥ राजा चरण कापडियांचे ॥ मग जे परमभाव काशीपुरीचे ॥ ते निरूपिती कापडी ॥५४॥त्यांसी क्षेमालिंगन देऊन ॥ काशीकथा पुसे सत्त्वगुणेंकरून ॥ कैसें घडलें तुम्हांसी स्नान ॥ स्वर्गसरितेचें ॥५५॥आनंदवूनि नेती आनंदवनीं ॥ काम्यकर्मांतें जाळिती म्हणोनी ॥ कीं स्वयंभू शूलपाणी ॥ पूजिले जाण कापडिये ॥५६॥जैसीं अलंकार भूषणें मळती ॥ तीं अग्निपुटीं घालिजेती ॥ मग दिसे कीं तयांची दीप्ती ॥ अनारिसी पाहतां ते ॥५७॥तैसें आनंदवनस्थानीं ॥ महाप्रांजळ असे जी मंदाकिनी ॥ तेचि महाअग्निपुट देऊनी ॥ काढिले कापडी अलंकार ॥५८॥जैशा अष्ट लोहांच्या जाती ॥ तैशा कापडियांच्या ज्ञाती ॥ ते हेमअळंकार जाहलेती ॥ विश्वनाथदर्शनें ॥५९॥मग पिंगाक्षे त्यांकारणें ॥ महाप्रेमें दिधलीं क्षेमालिंगनें ॥ त्यांचीं करूनि पादक्षालनें ॥ केलें अवभृथस्नान ते ठायीं ॥६०॥ऐसे ते कापडी नानावर्ण ॥ त्यांसी रायें दिधलें इच्छाभोजन ॥ मग प्राप्त केलें शयन ॥ जें जें रुदे जयासी ॥६१॥मग प्रातःकाळ झालियानंतरें ॥ कापडियां दिधलीं दिव्यांबरें ॥ जीं जयाचे मानसीं रुचिकरें ॥ तीं दिधलीं तयांसी ॥६२॥मग राजा बोळवीत निघाला ॥ दक्षिणपंथ तयां दाखविला ॥ तेथेंच राजा स्थिरावला ॥ कापडी झाले मार्गस्थ ॥६३॥मग त्या पिंगाक्षाचा पितृबंधू ॥ ताराक्ष आडवा आला महाव्याधू ॥ तेणें थोर केला विरोधू ॥ कापडियांसी तेधवां ॥६४॥हीरलीं त्याचीं दिव्यांबरें ॥ नाना वस्तु आणि पात्रें सुंदरें ॥ नागविलें ऐशिया प्रकारें ॥ कौपीना त्याही घेतल्या ॥६५॥ ऐसें नागवितां ताराक्षें वनीं ॥ मग ते आक्रंदती दीर्घध्वनीं ॥ पिंगाक्षा धांव म्हणोनी ॥ करिती अट्टाहास ॥६६॥तंव पिंगाक्ष धांवला वेगेंसीं ॥ परिवार जोडले सैन्येंसीं ॥ तंव देखिलें ताराक्षासीं ॥ नागवितां कापडियांतें ॥६७॥मग पिंगाक्ष म्हणे कुटिला ॥ महाव्याधा अमंगला ॥ योनी भोगिसी रे कुश्चला ॥ ऐसिया कर्मगतीनें ॥६८॥ तंव धांविन्नला तो ताराक्ष वीर ॥ चापीं योजिला बाण सत्वर ॥ तेणें विंधिला बंधुकुमर ॥ पिंगाक्ष तो ॥६९॥तें संधान पिंगाक्ष चुकवून ॥ मग धांवला क्रोधायमान ॥ आसुडिता झाला दोर्दंडेंकरून ॥ तस्कर भूमीसी पाडिला ॥७०॥दोघे झुंजती परस्परें ॥ हांकें गर्जती गिरिकंदरें ॥ मग काय केलें ताराक्षतस्करें ॥ पिंगक्षासी ते समयीं ॥७१॥पिंगाक्ष ताडिला जी खङ्गें ॥ वज्रघायीं लोटती जैसी गिरिश्रृंगें ॥ कीं उत्पाटती चंडवायुसंगें ॥ महाद्रुम अवनी जैसे ॥७२॥ऐसा पिंगाक्ष पाडिला क्षितितळीं ॥ ताराक्षें कापडी हरिले समूळीं ॥ दिव्य वस्त्रें आदि सकळीं ॥ घेऊनि गेला तो ॥७३॥तंव कैलासाहूनि शिवगण ॥ घेऊनि आले देव्य विमान ॥ मध्यें अप्सरा करिती गायन ॥ दिव्यरूप लावण्य जयांचें ॥७४॥मग विमानीं घालूनि पिंगाक्ष ॥ कैलासी नेता झाला गणाध्यक्ष ॥ यानंतरें वदता झाला तो विरूपाक्ष ॥ स्वगणांप्रती साक्षेपें ॥७५॥हा माझा प्रिय भक्त ॥ येणें पूजिला पांथस्थ ॥ कापडियांचे रक्षणीं यथार्थ ॥ देह येणें अर्पिला ॥७६॥मग शिव म्हणे गा प्रियकरा ॥ कापडियांच्या उपकारा ॥ आतां तूं पावलासी अभयवरा ॥ मजपासून ॥७७॥मज तोषविलेंसी गा पूर्णभक्ता ॥ तुवां जाणितली काशीची महिता ॥ म्हणोनि प्राप्त झाली सायुज्यता ॥ मुक्ती तुज ॥७८॥तरी तूं माझा परम भक्त ॥ तुज नाम ठेविलें नैऋत ॥ तूं नैऋत्यदिशेचा राजा निश्चित ॥ चंद्रार्कवरी केलासे ॥७९॥तरी परियेसीं निऋतीनाथा ॥ तुझी परा भविली जन्मव्यथा ॥ आतां ताराक्ष जाईल यमपंथा ॥ जो कां तुझा पितृबंधु ॥८०॥द्वादश सहस्त्र रौरव असती ॥ त्यांत एकही न चुके ताराक्षाप्रती ॥ तेथें धर्मराज असे अधिपती ॥ तो जाणे दोषदंड ॥८१॥गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसा वर झाला पिंगाक्षासी ॥ निऋतिदिशेचें राज्य तयासी ॥ दिधलें जाण शंकरें ॥८२॥त्याचें तुज निरूपिलें मूळस्थान ॥ ऐसिया सामर्थ्यें झाला पावन ॥ तो हा नैऋत्यदेश संपूर्ण ॥ निरूपिला जाण शिवशर्म्या ॥८३॥यानंतरें विमान पुढें चालिलें ॥ तंव त्यानें आणिक देखिलें ॥ मग शिवशर्म्यानें पुसिलें ॥ गणांप्रती ॥८४॥म्हणे तो सुशील पुण्यशील गणां ॥ माझी पूर्ण कीजे हो कामना ॥ स्थिर चालों दीजे विमाना ॥ क्रमितां पंथ ॥८५॥हा कवण लोक कवण प्रजा ॥ कवण तो या लोकींचा राजा ॥ येणें कैसें आराधिलें वृषभध्वजा । तें काय तप पुण्य जाणावें ॥८६॥ऐसें कवण याचें नेमव्रत ॥ कीं हा लोक झाला यासी प्राप्त ॥ आणि हा कवणाचा सुत ॥ तें निरूपावें मजलागीं ॥८७॥गण म्हणती मथुरावासी ॥ तूं बरवा प्रश्न आम्हां योजिलासी ॥ जेणें होतसे मनमळासी ॥ पराभव तात्काळ ॥८८॥तुझ्या प्रश्नोदकीं प्रक्षालितां ॥ मनोगजासी ॥ होतसे शुद्धता ॥ कीं आकलनचि मदमत्ता ॥ तुझिया प्रश्नांकुशेंकरुनी ॥८९॥तूं परिसें गा ब्रह्ममूर्ती ॥ ये लोकीं वरुण अधिपती ॥ गंधवतीनगरीं गंधपर्वतीं ॥ पश्चिमदिशे असे तो ॥९०॥ चार लक्ष योजने विस्तीर्ण ॥ चाळीस सहस्त्र मंदिरें पूर्ण ॥ साठ कोटी याचें सैन्य ॥ परम दुर्धर असें तें ॥९१॥नव्यायशीं कोटी क्षितीवरी ॥ ऐसा नाहीं गा परोपकारी ॥ याचे आधारें खाणी चारी ॥ वर्तताती जाण पां ॥९२॥हा जलवृष्टी करीतसे क्षितीं ॥ तेणें सर्व बीजें अद्भवती ॥ वापी कूप तडागें भरती ॥ पूर्ण सरिता सरोवरें ॥९३॥सप्त सागर सर्व सरिता ॥ गंगा आदिकरूनि तत्त्वतां ॥ यांसी जळें पूर्णता ॥ हा वरुण करीत की ॥९४॥जळेंविण सरिता विशोभित दिसती ॥ जळेंविण न शोभती वनस्पती ॥ जळें देवऋषिपितरां तृप्ती ॥ तो वरुणोपकार जाणावा ॥९५॥या वरुणापासाव द्विजवरा ॥ वनस्पती फळती अपारा ॥ मग त्या येती उपकारा ॥ सर्व जनांकारणें ॥९६॥याचेनि क्षितितळीं पुष्पयाती ॥ नानावर्ण सुगंधजाती असती ॥ प्रमथादिकांसी बहु प्रीती ॥ धरिती मौळीं सर्वदा ॥९७॥नव लक्ष याती तृण भूमंडळी ॥ उद्भवे सर्व वरुणजळीं ॥ मग धेनु स्त्रवती महीतळीं ॥ पंचामृतें उत्तम तीं ॥९८॥चहूं खाणींचिया जीवांसी ॥ जीवनाविण जीवित्व कैंचें त्यांसी ॥ परोपकारकर्ता सर्वांसी ॥ ऐसा हा वरुण जाण पां ॥९९॥नाना मिष्टान्नें परिपाकें होती ॥ विरिंचि-हरि-हरादिकां तृप्ती ॥ त्या सर्व धान्यांची उत्पत्ती ॥ या वरुणापासाव जाण पां ॥१००॥सर्व जनांचिया कामना ॥ हा वरुण पूर्ण करी जाणा ॥ आणिक परियेसीं गा ब्राह्मणा ॥ या वरुणाचा उपकार ॥१०१॥जे देवांचे मुकुटीं रत्नमणी ॥ आणि पृथ्वीगर्भीं ज्या रत्नखाणी ॥ तयांचीं बीजें या वरुणापासोनी ॥ उत्पन्न होती सर्वदा ॥१०२॥तींच बीजें शुक्तिगर्भीं पडती ॥ तेथें मुक्ताफळें निपजती ॥ कर्दळीगर्भीं पडतां उत्पत्ती ॥ होतसे कर्पूराची ॥१०३॥जैं वृष्टी करिती स्वाती ॥ तैं दारण ऊर्ध्व शुंडा करिती ॥ स्वातीतोय शुंडामुखीं घेती ॥ कुंभस्थळीं साक्षेपें ॥१०४॥मग तेणें गजमुक्तें निपजती ॥ या वरुणापासाव चिंतामणी होती ॥ ते अष्टधातूंसी सुवर्ण करिती ॥ भरंवसा जाण सर्वथा ॥१०५॥या सर्व जनांच्या हिताकारण ॥ चार पदार्थ परिपूर्ण ॥ ते आतां परिसा कोण कोण ॥ सांगों यथार्थ ॥१०६॥सर्व सुगंध सर्व आहार ॥ सर्व वस्त्रें संपूर्ण अलंकार ॥ या चहूंचें मूळ साचार ॥ एक ते असे लक्ष्मी ॥१०७॥ती लक्ष्मी वरुणापासूनी ॥ जन्मली नंदिकेश्वराचे नयनीं ॥ तो नंदी अवतार असे म्हणोनी ॥ वरुणाचा सत्य पैं ॥१०८॥या वरुणापासाव उत्पन्न होती ॥ चहूं खाणींचिया जंतुजाती ॥ हे चार पदार्थ उपयोगा येती ॥ देवां मानवां श्वापदांसी ॥१०९॥ऐसा हा वरुणेश्वर ॥ चहूं खाणींचा कल्पतरु थोर ॥ यावेगळा या सृष्टीचा व्यापार ॥ न चले विरिंचिदेवाचा ॥११०॥गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ एवढें सामर्थ्य जोडलें तयासी ॥ हा प्राप्त झाला या पदासी ॥ तें कवण तप याचें सांगूं ॥१११॥ब्रह्मयाचा पुत्र कर्दमऋषी ॥ झाला नव्हता पुत्र त्यासी ॥ म्हणोनि आलासे तपसाधनासी ॥ आनंदवनीं तो ॥११२॥त्या कर्दमें केलें तपसाधन ॥ मानसपूजें पूजिला त्रिलोचन ॥ ऐसें तप झालें जी संपूर्ण ॥ पांच लक्ष संवत्सर ॥११३॥नित्य स्नान मणिकर्णिकेसी ॥ मानसपूजा करी शिवासी ॥ कर्दमाचिया संतोषला भक्तीसी ॥ मग तो द्दश्य झालासे ॥११४॥ कर्दमें घेतलें करीं जीवन ॥ मग स्तविला तो पंचानन ॥ म्हणे आतां जी भाव संपूर्ण ॥ नव्हे तुजवांचूनियां ॥११५॥भक्तीनें संतोषला हर ॥ म्हणे कर्दमा पूर्ण दिधला वर ॥ आतां होईल तुज कुमर ॥ तो जाण थोर उपकारी ॥११६॥मग तिसरा नेत्र स्फुरितां चंद्रमौळी ॥ तेजदीप्ति तेथूनि निघाली ॥ ते कर्दमाचिया अर्ध्यांजळी- ॥ माजी पडली येऊनी ॥११७॥तेथेंचि झाला तया कुमर ॥ शिव म्हणे लाधलासी रे वर ॥ तेंचि गुणनाम साचार ॥ वरुण ऐसें जाण पां ॥११८॥ऐसा हर झाला प्रसन्न ॥ कर्दमासी दिधलें पुत्रदान ॥ कीं तो पूर्णरत्नांची खाण ॥ चतुर्दशांची पैं ॥११९॥ऐसा कर्दमासी युत्र जाहाला ॥ आनंदें उत्साह वर्तला ॥ मग पुत्राचा व्रतबंध केला ॥ पांचवे संवत्सरीं ॥१२०॥मग कोणे एके काळीं ॥ अपूर्व वर्तलें तये स्थळीं ॥ तें महाआश्वर्य श्रोतीं सकळीं ॥ श्रवण कीजे सावधान ॥१२१॥तो वरुण आणि ऋषिबाळक ॥ आनंदवना गेले सम्यक ॥ जलक्रीडा खेळतां कौतुक ॥ अच्छोदनाम सरोवरीं ॥१२२॥जळीं बुडी देतां कर्दमकुमर ॥ भारे जैसा शीतकर ॥ त्यासी देखोनि आला मगर ॥ अकस्मात परियेसा ॥१२३॥मग त्या मगरें नेला तो वरुण ॥ ऋषिपुत्र गेले पळून ॥ मात ते सांगती येऊन ॥ कर्दमऋषीजवळिकें ॥१२४॥ऋषिपुत्र म्हणती कर्दमासी ॥ मगरें नेलें जी वरुणासी ॥ गेला होता अच्छोदसरोवरासी ॥ जलक्रीडा करावया ॥१२५॥तंव तो कर्दम महामुनी ॥ बैसलासे शिवध्यानीं ॥ म्हणे शिवपूजा प्रहारूनी ॥ कीजे पुत्राचें धांवणें ॥१२६॥तरी हें न घडेचि सर्वथा ॥ शिवेंचि दिधलें पुत्रार्था ॥ तरी ते शिवपूजा वृथा ॥ करावी आतां कासया ॥१२७॥यथार्थ पूजितां त्रिनयन ॥ जय प्राप्त होतसे मृत्यूपासून ॥ तरी तोचि पुत्र आम्हांसी आणून ॥ शिवचि देईल संतोषें ॥१२८॥म्हणोनि उठेना शिव पूजितां ॥ ध्यानीं लक्षी गिरिजाकांता ॥ मग झाला शिवासी पूजिता ॥ मानसपूजेंकरूनी ।१२९॥शुद्ध मनें केलें अभिषिंचन ॥ शुभ वाचेनें केलें सुगंधार्पण ॥ ज्ञानचक्षु उजळून ॥ दीपमाळा लाविली ॥१३०॥ ब्रह्मरस तो नैवेद्य करूनी ॥ पूर्ण पूजिला शूलपाणी ॥ मग पाहातसे पुत्रालागूनी ॥ ध्यानामाजीं साक्षेपें ॥१३१॥ध्यानीं पाहातसे सप्तसागर ॥ गंगासरिता ओघ अपार ॥ वापी कूप तडाग सरोवर ॥ लक्षीतसे ध्यानीं सर्वही ॥१३२॥ध्यानीं लक्षी सप्त पाताळ ॥ आणीक पाहातसे धरातळ ॥ पर्वत अष्ट कुलाचल ॥ लक्षिले ध्यानीं सर्वदा ॥१३३॥ऐसें त्रिभुवन लक्षी मुनिवर ॥ तंव देखिलें अच्छोदसरोवर ॥ तेथें मगरें नेला कुमर ॥ खेळतां ऋषिपुत्रांतूनी ॥१३४॥मगरें नेऊनि ठेविला विवरीं ॥ मम त्या जलदेवी सुंदरी ॥ म्हणती हें विघ्न उदेलें आम्हांवरी ॥ सागरासारिखें ॥१३५॥तरी हा कर्दमऋषीचा नंदन ॥ त्रिभुवनीं रक्षक पूर्ण ॥ विश्वनाथाचिया वरापासून ॥ प्राप्त झाला कर्दमासी ॥१३६॥ तरी हा बाळक सुकुमार ॥ यासी आपण मागेल सागर ॥ यास्तव त्याजवळी नेऊनि कुमर ॥ देऊं कर्दमाचा आदरें ॥१३७॥तो शिवभक्त कर्दमऋषी ॥ कोपें दग्ध करील त्रैलोक्यासी ॥ तो विघ्न करील सागरासी ॥ या पुत्रास्तव साक्षेपें ॥१३८॥मग जलदेवी मिळोनि समस्त ॥ सागराजवळ नेला कर्दमसुत ॥ मग त्यांहीं जाणविला वृत्तांत ॥ सागरासी वरुणाचा ॥१३९॥समुद्र म्हणे जलदेवतांसी ॥ तुम्हीं भलें आणिलें यासी ॥ आम्हांसी मागतां कर्दमऋषी ॥ कल्पान्त थोर होईल ॥१४०॥आपुले मंदिरीं असतां निश्चित ॥ विघ्न उदेलें अकस्मात ॥ परी होतें आपुलें पूर्वार्जित ॥ तें उपयोगा आलें ये काळीं ॥१४१॥मग सागरें त्या कर्दमसुतासी ॥ आलिंगिलें ह्रदयासीं ॥ सर्व अलंकार भूषणेंसीं वरुण तोषविला सागरें ॥१४२॥दिधलें रत्नमणी बहुत ॥ अविंधमुक्तें केलीं प्राप्त ॥ आणि देवांसी जे अप्राप्त ॥ ते अंलकार दीधले ॥१४३॥ऐसा शृंगारिला कर्दमकुमर ॥ मग काय करी तो नदीश्वर ॥ धरूनि आणविला तो मगर ॥ तत्काळचि ते ठायीं ॥१४४॥मग पाशीं बांधोनि मगराप्रती ॥ दिधला वरुणाचे हातीं ॥ त्या वरुणासी घेऊनि आला सरितापती ॥ कर्दमाजवळी तेधवां ॥१४५॥ऐसा आणिला काशीभुवनीं ॥ तंव कर्दम बैसलासे शिवध्यानीं ॥ मग प्रार्थिता झाला दीनवदनीं ॥ सरितानाथ ते समयीं ॥१४६॥करसंपुट लावूनि भाळीं ॥ मस्तक ठेविलें क्षितितळीं ॥ मज क्षमा कीजे पादतळीं ॥ चरणरज होय तुमचा ॥१४७॥सागरें देखिला कर्दमऋषी ॥ जेवीं मित्रउदय झाला पूर्वदिशेसी ॥ तेव्हां समुद्राचे मानसीं ॥ प्रवर्तलें महद्भय ॥१४८॥मृगाजिन घालोनि क्षितितळीं ॥ कर्दम बैसला शिवाजवळी ॥ जैसा गजचर्मावरी चंद्रमौळी ॥ तैसा शोभला कर्दम तो ॥१४९॥कर्दमासी म्हणे सरितानाथ ॥ मज ठाउका नसे वृत्तांत ॥ जेणें धरिला तुमचा सुत ॥ तो वरुणापाशीं दीधला ॥१५०॥कर्दम पाहे जंव द्दष्टीं ॥ तंव मगर बांधिला पुत्रपृष्ठीं ॥ मग ह्रदयीं होऊनि थोर संतुष्टी ॥ पुत्र घेतला जवळिकें ॥१५१॥कर्दम कुरवाळी बालकासी ॥ म्हणे हा शिवें प्राप्त केला आम्हांसी ॥ मग प्रत्युत्तर सागरासी ॥ वदता झाला कर्दम तो ॥१५२॥कर्दम म्हणे हो सरितानाथा ॥ संख्या नाहीं मगराचिया सामर्थ्या ॥ त्याची हरिली गा जन्मव्यथा ॥ श्रीकाशीच्या दर्शनें ॥१५३॥या काशीचा प्रादुर्भाव ऐसा ॥ येथें जंतु न पावे जीवदशा ॥ कल्याण कल्पी हा भरंवसा ॥ अनृत न होय सर्वथा ॥१५४॥या मगराची थोर पुण्यसामुग्री ॥ जयातें प्राप्त काशीपुरी ॥ आतां याचा अन्याय कोण विचारी ॥ या त्रैलोक्यमंडळामाजी ॥१५५॥ऐसी आज्ञा असे वेदशास्त्रीं ॥ जो जुंत वसे काशीक्षेत्रीं ॥ तो जाणावा त्रिनेत्री ॥ शिवचि केवळ साक्षात ॥१५६॥अनेक तीर्थें असती अनेकास्थळीं ॥ परी जो स्नान करी मणिकर्णिकाजळीं ॥ तो साक्षात चंद्रमौळी ॥ ऐसें वेद बोलती ॥१५७॥कर्दम म्हणे गा नदीश्वरा ॥ अन्यायी न म्हणिजे या मगरा ॥ हा वंद्य झाला समस्त जलचरां ॥ अन्यत्र स्थळींचिया ॥१५८॥मग समुद्र गेला मणिकर्णिकस्नाना ॥ पुढती आला शिवदर्शना ॥ मग केली लिंगस्थापना ॥ तयातें नाम सागरेश्व ॥१५९॥लिंगस्थापना करूनि सागर ॥ नमस्कारिला निश्वंभर ॥ मग जाता झाला नदीश्वर ॥ आपुलिया स्थानासी ॥१६०॥मग वरुण म्हणे पितयासी ॥ एवढें सामर्थ्य केवीं तुम्हांसी ॥ जे सागर आला प्रार्थनेसी ॥ तें कवण तप आचरलां जी ॥१६१॥मग कर्दम म्हणे रे कुमारा ॥ नित्य नित्य पूजितों शंकरा ॥ तेणें वंद्य चराचरां ॥ आणि स्वर्गींचिया देवांसी ॥१६२॥सर्वकाळ आराधिजे विश्वनाथा ॥ तरी त्यातें विघ्न नसे सर्वथा ॥ अनंत हरे जन्मव्यथा ॥ चौर्यायशीं लक्ष योनींची ॥१६३॥ऐसें ऐकोनि पितृवचन ॥ मग तप आचरे वरुण ॥ नित्य भक्षी तरुपर्ण ॥ जीं कां गलित वातस्पर्शें ॥१६४॥ऐसे पंचसहस्त्र संवत्सर ॥ वरुणें पूजिला तो शंकर ॥ जो भक्तवत्सल करुणाकर ॥ प्रकटला तो शूलपाणी ॥१६५॥वरुणाची देखोनि तपशक्ती ॥ तेणें थोर संतोषला पशुपती ॥ मग वर द्यावया प्रीतीं ॥ कर्दमसुतासी सरसावला ॥१६६॥शिव म्हणे रे कर्दमसुता ॥ माझिया पूर्णभक्ता ॥ तुझिया मनींचें माग रे आतां ॥ तुज वर दिधला ये वेळीं ॥१६७॥मग करिता झाला वरुण स्तुती ॥ म्हणे जयजयाजी शिवमूर्ती ॥ भक्तां रक्षिसी कल्पांतीं ॥ काशीपूरनिवासिया ॥१६८॥तुझें करावया स्तवन ॥ मज सामर्थ्य असेल कोठून ॥ वेद वर्णूं न शकती गुण ॥ तेथें मी किती मानुषी ॥१६९॥तूं जरी तोषलासी पंचानना ॥ माझी भक्ती आली तुझिया मना ॥ तरी म्यां केली लिंगस्थापना ॥ यासी देईं वर आतां ॥१७०॥तरी परियेसीं गा वृषभध्वजा ॥ हे पृथ्वीचे जन करीं माझी प्रजा ॥ सागर सरिता जळजंतूचा राजा ॥ करावें मज ये वेळीं ॥१७१॥मग शिव वदे यथातथ ॥ तुज इतुकेंही दिधलें स्वामित्व ॥ आणिक या लिंगाचें महत्त्व ॥ परिसें वरुणा सादर ॥१७२॥तरी ऐसा असे माझा वर ॥ लिंगा नाम वरुणेश्वर ॥ मी येथें निरंतर ॥ आणिक वर तो ऐसा ॥१७३॥जे वरुणेश्वरलिंग पूजिती ॥ त्यांसी इच्छिलीं फळें प्राप्त होती ॥ त्यांसी वरुणलोकप्राप्ती ॥ युगायुगीं निरंतर ॥१७४॥मग वरुणासी म्हणे वृषभध्वज ॥ जो वर दिधला तेजःपुंज ॥ तेणें तुज केला म्यां महाराज ॥ गंधर्वपुरीं पश्चिमेचा ॥१७५॥तुज क्रीडतां सरोवरीं ॥ ज्या मगरें नेलें होतें विवरीं ॥ तोचि वहन तुझिया दारीं ॥ दीधला म्यां ॥१७६॥गण म्हणती शिवशर्म्या द्विजा ॥ पृथ्वीजन वरुणाची प्रजा ॥ हा गंधर्वांचा राजा ॥ कर्दमसुत वरुण जो ॥१७७॥हे कथा शिव सांगे भवानीप्रती ॥ ते लोपामुद्रेसी श्रवण करवी अगस्ती ॥ ते शिष्यांप्रती सांगे परम प्रीती ॥ सत्यवतीसुत व्यासमुनी ॥१७८॥शिवदास गोमा श्रोतयांसी ॥ विनंती करी बद्ध करेंसीं ॥ आतां विमान जाईल कवण्या लोकासी ॥ तें परिसा अत्यादरें ॥१७९॥इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे वरुणलोकवर्णनं नाम दशमाध्यायः ॥१८०॥शुभं भवतु ॥ N/A References : N/A Last Updated : September 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP