त्रेसष्टचा आंकडा यांतील सहा व तीन या अंकांच्या आकृति एकमेकीकडे तोडें करून बसलेल्या माणसांप्रमाणें त्यांचें ऐक्य द्दगोचर होतें म्हणृन प्रेमाचें अस्तित्व हा अर्थ, (मराठी शब्दांचें उद्धाटन)
त्रेसष्ट तामिळ शैव - संत १ सुन्दर, २ नीलकंठ, ३ महाधन, ४ मार, ५ सत्यार्थ, ६६ वीरमिन्द, ७ अमरनीति, ८ दारक, ९ अनपानय, १० एनादिनाथ, ११ नील, १२ कलानाथ, १३ मानविक्रम, १४ शंकुलादाय, १५ गोनाथ, १६ मूर्तिनाथ, १७ स्कंदनाथ, १८ पशुपति, १९ नंद, २० विचारवित् , २१ विचारशर्मा, २२ रसनाराज, २३ कुलपक्ष, २४ विद्याशूर, २५ पूतवती, २६ आमूतिचरण, २७ नीलनग्न, २८ नवनंदी, २९ ज्ञानसंबंध, ३० कलिकाम, ३१ मूलनाथ, ३२ दंडभक्त, ३३ शिवभक्तार्चक, ३४ मारसोमयाजी, ३५ शाक्यनाथ, ३६ निरुद्धशार्दूल, ३७ अग्रभक्त, ३८ क्षमावंत, ३९ गणनाथ, ४० परांतक, ४१ सत्यदास, ४२ धर्मकेतन, ४३ प्रतापसूर्य, ४४ प्लव, ४५ मानधन, ४६ कालनीति, ४७ शक्ति, ४८ पंचपाद, ५४ सिंहांक, ५५ साहसांक, ५६ भूतिद, ५७ कीर्तिसख, ५८ शूरव्याघ्र, ५९ शंभुचित्त, ६० पद्मावती, ६१ कीर्तिरथ, ६२ लोहिताक्ष आणि ६३ गीताकर - पेरिया पुराणम् (तमिळ)
त्रेसष्ट शलाका पुरुष २४ तीर्थंकर (२४ अंकीं पाहा,) १२ चक्रवर्ती, ९ नऊ नारायण, ९ नऊ प्रतिनारायण आणि ९ बलिमद्र मिळून ६३ शलाका पुरुष होता.
असे त्रेसष्ट शलाका पुरुष जैन धर्मांत होऊन गेले. (
[म. ज्ञा. को. वि. १५])