|
स्त्री. १ वेदपठण ; पुराण ; कीर्तन ; भजन ; गायन यांचा एकत्र जमून समवयस्क , समानशील व्यक्तींनीं केलेला कार्यक्रम . २ पागोटयाच्या बिनीवर चक्राकार एकावर एक पट्टया बसवून करतात ती रचना ; पागोटयाचें चाक ( चक्राकार वेढे असणारें ), चाकाप्रमाणें बांधलेलें पागोटें . ३ एक खेळणें ; भिंगरी . ४ सभोंवार कळया व मध्यें एखादें फूल असा पुष्पगुच्छ , फुलांचा तुरा पागोटयावर अलंकार म्हणून लावतात ती . ५ परंपरा . ६ ( व . ) पांढरें अगर इतर रंगाचें डोंगर . ७ बटाटयांतील एक रोग . ८ ( गो . ) चकली ( खाद्य ). ९ समुदाय ; मंडल ; कंपू . [ सं . चक्र ] ( वाप्र . ) स्त्री. भोंवळ ; चक्कर . ' अखेर डोळ्याला चक्री लागोन तो घायाळ मरणोन्मुख होऊन रणांत पडला .' - ऐपो २ . १५ . ( चक्र ) पु. कुंभार . दे येक म्हणतां कोरी घागरी । हास्य करोनि चक्री अंतरी । पांच रुपया द्याल जरी तरी । घडा देईन सुंदर वदे । - दावि २३५ . - वि . चक्र धारण करणारा ( विष्णु , कुंभार ). दिनमणि तव नोहे चंद्रसा रग चक्री - मुरामाअरण्य १०१ . ०उडविणें उपहास करणें ; छि : थू करणें ; टोमणा मारणें ; छद्मी भाषण करणें ; ( एखाद्याची ) फजीती करणें . ०करणें १ उपहास करणें . २ परस्परांत दांडगाइनें किंवा धिंगामस्तीनें ( एखाद्याची ) ओढाताण करणें . ०गुंग , गुंगविणें , उतरणें , भुलविणें - १ ( चक्री = अक्कल ) एखाद्याच्या पगडीचा - पागोटयाचा अगदीं पुढचा भाग ( म्हणजे अभिमान , शौर्य निदर्शक ) ओढून काढणे किंवा त्यास गोंधळांत पाडणें , फजीत करणें , नक्षा उतरणें . २ ( ल . ) लांब लांब बाता , डौलाचीं ; आढयतेचीं बोलणीं जिरविणें , फोल पाडणें ; एखाद्याचा नकशा ; तोरा उतरविणें ; मानहानि करणें ; कान उपटणें . करणें , गुंगविणें , उतरणें , भुलविणें - १ ( चक्री = अक्कल ) एखाद्याच्या पगडीचा - पागोटयाचा अगदीं पुढचा भाग ( म्हणजे अभिमान , शौर्य निदर्शक ) ओढून काढणे किंवा त्यास गोंधळांत पाडणें , फजीत करणें , नक्षा उतरणें . २ ( ल . ) लांब लांब बाता , डौलाचीं ; आढयतेचीं बोलणीं जिरविणें , फोल पाडणें ; एखाद्याचा नकशा ; तोरा उतरविणें ; मानहानि करणें ; कान उपटणें . ०गुंग , भुलणें , उतरणें - गोंधळणें ; ओशाळा होणें ; खुंटणें किंवा कुंठित होणें ; अक्कल गुंग होणें . होणें , भुलणें , उतरणें - गोंधळणें ; ओशाळा होणें ; खुंटणें किंवा कुंठित होणें ; अक्कल गुंग होणें . ०फिरविणें पगडी फिरविणें . १ पागोटयाचा , चक्रीचा पाठीमागचा भाग पुढें आणून दोन हात करण्यास अगर लढण्यास सिध्द होणें . २ बाजू बदलणें ; विरुध्द पक्ष स्वीकारणें . सामाशब्द - ०झोंप स्त्री. जींत निजणारा वाटोळा वाटोळा फिरतो , लोळतो अशी झोंप . ०दार वि. १ पुढें चक्री असणारें ( पागोटें , मुलाची टोपी ). २ वाटोळें ; चाकासारखें . ०पुराण न. एकाच बैठकींत एकामागून एक असें अनेकांनीं सांगितलेलें पुराण . चक्री पहा . [ सं . चक्र + पुराण ] ०परिषद स्त्री. जींत प्रत्येक सभासदाला आपलें म्हणणें स्पष्टपणें मांडतां येतें ; प्रत्येकजण सारख्या योग्यतेचा गणला जातो अशी सभा . ( इं . ) राऊंडटेबल कॉन्फरन्स .
|