|
छपन्न कोश ग्रंथ (संस्कृत) १ अमर, २ मेदिनी, ३ हलायुध, ४ त्रिकांडशेष, ५ हालावली, ६ वैजयंती, ७ एकाक्षरी, ८ हेमचंद्र, ९ उत्पलरुद्र, १० नानार्थध्वनिमंजरी, ११ विश्वप्रकाश, १२ वाग्मट, १३ माधव, १४ वाचस्पति, १५ धर्म, १६ तारपाल, १७ विश्वरूप, १८ विक्रम, १९ आदित्य, २० कात्यायन, २१ वामन, २२ चंद्रगोमि, २३ शुभांक, २४ गोवर्धन, २५ रमसपाल, २६ रत्नमाला, २७ गंगाधर, २८ जय, २९ अमरदत्त, ३० हर, ३१ रंतिदेव, ३२ बोपालित, ३३ शाश्वत, ३४ वररुचि, ३५ भागुरि, ३६ नाममाला, ३७ संसारावर्त. ३८ शब्दार्णव, ३९ उत्पलिनी, ४९ राजकोश, ४१ अजयपाळ, ४२ अनेकरत्न, ४३ भारतमाला, ४४ भावप्रकाश, ४५ भानदीक्षित, ४६ भूतिप्रयोग. ४७ पदार्थकौमुदि, ४८ नाना रत्नमाला, ४९ सिद्धांतकौमुदि, ५० शब्दसंदर्म सिंधु, ५१ शब्द - रत्नावली, ५२ धरणी, ५३ रत्नमाला, ५४ अनादि, ५५ भारतमाला आणि ५६ व्याडि ([दु. श. को.]) छपन्न देश (प्राचीन) (अ) १ कोसल, २ कुरु, ३ पांचाल, ४ शूरसेन, ५ जांगल, ६ आर्यावर्त, ७ यामुन, ८ माथुर, ९ मत्स्य, १० सारस्वत, ११ मरुधन्व, १२ गुर्जर, १६ आमीर, १४ मागध, १५ सौवीर, १६ आनर्त, १७ मलय, १८ विदर्म, १९ कीटक, २० कान्यकुब्ज, २१ सुराष्ट्र, २२ पांडु देश, २३ विदेह, २४ कुशावर्त, २५ कोक, २६ चेक, २७ सिंधु, २८ सौराष्ट्र, २९ मैथिल, ३० कैकेय, ३१ द्विकूटक, ३२ शाल्व, ३३ कर्नाटक, ३४ आवंत्य, ३५ निषध, ३६ पौंड्र, ३७ मद्र, ३८ वंग, ३९ अंग, ४० कलिंग, ४१ कारुष, ४२ सृंजय, ४३ आंध्र, ४४ त्रिगर्त, ४५ द्राविड, ४६ मालव, ४७ केरळ, ४८ कीकल, ४९ उशीर, ५० कुंतल, ५१ कांबोज, ५२ भोज, ५३ कंक, ५४ मधु, ५५ महाराष्ट्र आणि ५६ अर्ण. असे प्राचीन काळी भारतांत छपन्न प्रदेश होते. (आ) १ अंग, २ अरुण, ३ अवंति, ४ आंदिर, ५ इलाड (लाट), ६ ओदिय, ७ करुष, ८ कलिंग, ९ कन्नड, १० कन्नड, ११ काश, १२ काश्मीर, १३ कंधार, १४ कंबोज, १५ किडार, १६ कुरुकु, १७ कूडक, १८ कुंतल, १९ कुरु, २० कुलिंद, २१ कू (गुर्ज्ज) र्च्चर, २२ केकय, २३ केरल, २४ कोंगन (कोंकण ?) २५ कोल्ल (कोळवण) २६ कोसल, २७ शक, २८ शबर, २९ शाल्व, ३० सिंग (ह ?) ल, ३१ सिंधु, ३२ शीन (सेन ?) ३३ शूरसेन, ३४ शोल, (चोल), ३५ शोनक, ३६ दिराविड (द्रविड), ३७ तुळुब, ३८ तेंगन, ३९ निदद, (निषाद ?) ४० नेपाल, ४१ पप्पर, ४२ पल्लव, ४३ पांचाल, ४४ पाण्डय, ४५ पुलिंद, ४६ पोड (पौण्ड्र ?) ४७ मगध, ४८ मत्स्य, ४९ मरात, ५० मलयाळ, ५१ मालव, ५२ यवन, ५३ युगन्द, ५४ वंग, ५५ बङगाल (बंगाल) आणि ५६ विदर्भ (इंडियन अँन्टिक्वरी) ([म. ज्ञा. को. वि. १३]) छपन्न भाषा १ अंग, २ वंग, ३ कलिंग, ४ कांबोज, ५ काश्मीर, ६ सौवीर, ७ सौराष्ट्र, ८ मागध, ९ मालव, १० महाराष्ट्र, ११ नेपाळ, १२ केरळ, १३ चोळ, १४ पांचाळ, १५ गौड, १६ मल्लाळ, १७ सिंहल, १८ वडय, १९ द्रविड, २० कर्नाटक, २१ मरहट, २२ पानाट, २३ पांडय, २४ पुलिंद, २५ आंध्र, २६ कनोज, २७ यावन, २८ जलांध, २९ शलम, ३० सिंधु, ३१ अवंती, ३२ कन्नड, ३३ हूण, ३४ दाशार्ण, ३५ भोजकोट, ३६ गांधार, ३७ विदर्म, ३८ बाल्हिक, ३९ गज्जर, ४० बर्बर, ४१ कैकेय, ४२ कोशल, ४३ कुंतल, ४४ शूरसेन, ४५ टंकण, ४६ कोंकण, ४७ मत्स्य, ४८ मद्र, ४९ सैधव, ५० पाराशर्य, ५१ गुर्जर, ५२ खचर, ५३ भूचक्र, ५४ झल्लुक, ५५ प्राग्जौतिष आणि ५६ कराहट. भारतांत पूर्वी असे छपन्न देश विभाग व त्यांची प्रत्येकीं एक भाषा अशी ही गणना होती. ([हंसकोश]) छपन्न भाषेचा केलासे गौरव। भवाणीवी नांव उमारिली ॥ ([नामदेव अभंग])
|