|
न. १ फुरफुर ; भरभर ; कंप ( डोळा , कातडी , अवयव यांचा ); लखलखाट , ( वीज , तरवार , इ०चा ), चमक , लुकलुक ( तारा , रत्न इ०ची ); आवेश , राग इ० चा झटका ; संचार ; स्फूर्ती ( युद्ध , वाद यातील ): थरथराट , कंप ( राग , भीति इ०मुळें ). २ एखादी गोष्ट एकदम आठवणें ; स्मरण होणें ; मनात उद्भूत होणें . ३ धडधड ; धक्का . [ सं . स्फुर् = फुरफुरणें ] स्फुरणें --- क्री . स्फुरण पहा ; कंप पावणें , मनांत एकाएकी येणें ; सुचणें स्फूर्त --- र्ति - १ स्त्री . स्फुरण पहा . एकाएकी प्रादुर्भाव ; स्फुरणें . २ थरकापं , ३ मनांत उत्कठतेणें प्रकट होणारी वरि प्रतिभा .
|