Dictionaries | References

युद्ध्य

   
Script: Devanagari
See also:  युद्ध , युद्ध

युद्ध्य

  न. 
   लढाई ; रणकंदन .
   भांडण ; मारामारी ; झुंज ; दोन व्यक्तींचा , पक्षांचा , झगडा , लढा , सामना . समासांत कुक्कुटयुद्ध ( कोंबड्यांची झुंज ); मेषयुद्ध ( मेंढ्यांची साठमारी ); गजयुद्ध ; मल्लयुद्ध ( मल्लांची झोंबी , कुस्ती ); तलातलयुद्ध ( हातांनीं केलेली मारामारी ); गदायुद्ध ; मुष्टियुद्ध इ० [ सं . युद्ध , युध = लढणें ] ( वाप्र . ) युद्धास तोंड लागणें - युद्ध सुरु होणें . कलहास , मारामारीस , वादास वगैरे आरंभ होणें . सामाशब्द -
०कंडू  स्त्री. लढाईची खाज ; लढण्याची , भांडण्याची तीव्र , उत्कट इच्छा ; मारामारीची खुमखुमी . [ सं . ]
०कंदन  न. लढाईंतील कत्तल ; प्राणांतिक लढाई . युद्धकंदन मग करुं । - रावि १५ . ७५ . [ युद्ध + कंदन ; ]
०करी  पु. योद्धा ; लढणारा . युद्धकर्ज न . युद्धाच्या खर्चासाठीं काढलेलें कर्ज .
०फळी  स्त्री. ( काव्य ) सैन्याची रांग ; लढाईस उभें असलेलें सैन्य ; सैन्याची मांडणी , रचना .
०मद  पु. लढण्याचा आवेश , स्फुरण . [ सं . ]
०वीर  पु. शूर पुरुष ; योद्धा . [ सं . ] युध्दांगण न .
   रणमैदान ; रणभूमि .
   फड ; हौदा ; कुस्तीची किंवा झुंजेची जागा . [ युद्ध + अंगण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP