Dictionaries | References

भला

   
Script: Devanagari

भला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adverb  मंगल जनक या शुभ है कि   Ex. भला हो तुम्हारा । / भला आप हमारे घर आए तो ।
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
अच्छा
adverb  नहीं का सूचक शब्द जो प्रायः वाक्यों के आरंभ अथवा मध्य में जोर देने के लिए प्रयुक्त होता है   Ex. भला ऐसा भी कभी होता है ।
See : अच्छा, हित, सज्जन, कल्याण, उपकार, शुभ, ख़ैर

भला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
g. of o. To be officiously sympathizing or kind; to concern one's self obstrusively about the welfare of. Ex. माझें भलें कां घेऊन फिरतोस?

भला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Good, virtuous; of the proper quality. भला घेणें
Give it to finely; beat or abuse
in fine style.

भला     

वि.  ऋजु मनाचा , चांगला , सद्‌गुणी , सरळ , सुस्वभावी ;
वि.  अब्रुदार , मान्यता असलेला , सभ्य ;
वि.  मातब्बर , मोठा .

भला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चांगला, सज्जन, कल्याण

भला     

वि.  
चांगला ; सदगुणी ; योग्य ; चांगल्या स्वभावाचा . चिकित्सक भला भला म्हणुनि फार वाखाणिला । - केका ४४
सभ्य ; पतवाला ; अब्रूदार ; चांगल्या मान्यतेचा , नांवाचा .
( काव्य . ) बरा . घावु भला होये । - वैद्यक ७६ .
जसा असावा तसा ; योग्य गुणाचा , परिणामाचा ; प्रशंसेस पात्र ; नामी ; उत्कृष्ट ; उमदा ; भव्य . आज भला पाऊस पडला .
मोठा ; सपाटा . इतक्यांत शेजारच्या वारुळांतून एक भला मोठा नाग निघून ...
( व . ल . ) श्रीमंत .
( व . ) मोठा ; पुष्कळ . हा भला खाबबोका आहे . - उद्गा . शाबास ; भले . वत्सा ! भला ! जयपद नारायण सखा नरा ! हो रे ! - मोभीष्म ४ . २४ . [ सं . भद्रक ; प्रा . भल्लओ ; अप . भल्लउ ; हिं . ] म्ह भले भले करुन भागली व देवपूजेला लागली .
०घेणें   सक्रि . सपाटून मारणें ; निंदणें . भलें घेऊन फिरणें , पुसणें , विचारणें लुबरेपणानें समदूःखी , मायाळू असणें ; लचाळपणें दुसर्‍याच्या कल्याणाबद्दल काळजी बाळगणें . माझें भलें कां घेऊन फिरतोस ! भला बुरा वि . चांगला अथवा वाईट . तुक सकळाचें गोविंदाचें हातीं । कोण कोण गति भलीबुरी । [ हिं . ]
०माणूस  पु. 
अब्रूचा , प्रामाणिक , सभ्य , मनुष्य .
( व ) श्रीमंत , चांगला मनुष्य . भला , इकी , यकी , भलाई - स्त्री .
चांगुलपणा ; सुजनता ; सात्विकता ; स्वभावाचें मृदुत्व , कोमलता .
मोठेपणा . भली भलाई कर पण कांही अधर्ममार्गी शिरुं नको । - अफला ६० .
सन्मान्य प्रसिद्धि ; कीर्ति . ( क्रि० मिळणें ; मिळवणें ).
०ईबुराई  स्त्री. चांगलेपणा किंवा वाईटपणा ; बरेवाईटपणा . [ हिं . ] भलावण , भलामण स्त्री .
अब्रूपत्र ; आपले ओळखीच्या पत असलेल्या माणसावर एखाद्यास गरज असलेली रक्कम देण्याविषयीं दिलेली चिठ्ठी ; वरात .
ओळखीचें पत्र ; शिफारसपत्र .
आश्रय ; मेहेरबानी ; शिफारस . [ भला ]
०वणपत्र  न. एक मनुष्य दुसर्‍या मनुष्यास उधारी देण्याविषयीं अखत्यार देतो तो लेख .
०वणी  स्त्री. ( गुज . ) शिफारस . भलीबरी स्त्री .
चांगलें व वाईट वर्तन ; पत ( मनुष्याचें ); चांगलेपणा व वाईटपणा ( स्थल , धंदा इ० कांचा ). [ हिं . ] भली भलाई , भली भलाय , भलीभलायकी - स्त्री .
चांगलेपणा ; सदगुण ; सदाचरण ; स्वभावाचा चांगुलपणा .
कीर्ति ; सामान्य प्रसिद्धि , लौकिक ; प्रशंसा .
खुशालीची हकीकत ; आरोग्य ; चालू काम , परिस्थिति यांची बातमी . [ हिं . ] भलें - उद्गा . खाशी ! नामी ! चांगलें ? शाबास ! भलें स्मरण जाहलें समयिं कंसदासीकरें । - केका ३७ . भलेबाप - उद्गा . उत्तेजन , स्तुति याविषयीं उद्गगार . भले लोक - पु . राजे , सरदार इ० कांचे पदरीं जे मानकरी , शिपाई , शिलेदार इ० लोक असतात ते . भलरी , भलेरी - स्त्री .
समुदायानें कष्टाचें काम करीत असलेल्या मनुष्यांनीं तें हलकें जावें म्हणून गाणें म्हणणें , एकमेकांस हाक मारणें व उत्तेजन देणें ; भले रे दादा ! भले रे भाई ! इ० उत्तेजनपर शब्द . ( माण . ) काढणीच्या वेळचें गीत ; शेतकामें करण्यास उल्हास येण्यासाठीं गाण्याचें गीत ( क्रि० घालणें ).
जोरदार व न खळणारा यत्न ; कष्टाचें काम ; झपाट्याची एकसारखी ओढ , धावें , नेट , ताण , दम . ( क्रि० लावणें ; घालणें ).
कृत्रिम , तोंडपुजेपणाची , मूर्खपणाची वाखाणणी ; गाणें इ० कलेचे मर्म न जाणतां , तें उत्तम नसतां त्याची उगीच केलेली प्रशंसा ; अवास्तव स्तुति . [ भला + अरे ] भलोबा - पु . लडिवाळपणाचा शब्द ; चांगला , भला माणूस . [ भला + बा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP