Dictionaries | References

न मागे तयाची रमा होय दासी।

   
Script: Devanagari

न मागे तयाची रमा होय दासी।

   जो मनुष्य याचना करीत नाहीं त्यावर लक्ष्मी आपण होऊन कृपा करते. न मागणारास परमेश्वर आपण होऊन देतो. “निरपेक्षतेची साक्ष कालच त्यानीं (पं.भाऊशास्त्री वझे) केलेल्या भाषणावरुन पटेल. तथापि ‘न मागे तयाची रमा हो दासी’या वचनाप्रमाणें त्यांचा आदर जनता शक्त्यनुसार आपण होऊन करते."-माझा चित्रपट१०३-कावळाढापी पृ.२२८. सबंध श्लोक असः-सदा मागतां दास देवान साहे न मागे तयाची रमा दासी होये॥ असे आस तो दास झाला जगाचा। नसे आस तो ईश ब्रह्मादिकाचा॥-समर्थ करुणाष्टकें व स्फुट श्लोक १३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP