Dictionaries | References

निर्वाहः प्रतिपन्न वस्तुषु

   
Script: Devanagari

निर्वाहः प्रतिपन्न वस्तुषु     

(मुद्राराक्षस २.१८) अंगीकृत कार्य चिकाटीनें तडीस नेणें
एकसारखा प्रयत्न करीत राहणें. कोणी या वचनाचा अर्थ असलेल्यांत कसातरी गुजारा करणें असा करतात पण तो चूक आहे. पुण्यांतील शिक्षणप्रसारक मंडळीचें हें बोधवाक्य आहे. या वचनाचा गैरअर्थ टाळण्यासाठीं ‘हातीं घ्याल तें तडीस न्या’ Efforts Unending अशी मराठी व इंग्रजी वचनें शेजारी लिहितात.
-अग्रणी २२-१२-१९४१. किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि क्ष्मां न क्षिपत्येष यत्‌। किं वा नास्ति परिश्रमो दिनपते- रास्ते न यन्निश्चलः। किं चाङ्गीकृतमुत्सृजन्हि मनसा श्वाघ्यो जनो लज्जते। निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम्‌॥
सुर.५३.२६९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP