Dictionaries | References

नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये

   
Script: Devanagari
See also:  नकटें असावें, पण धाकटे असूं नये

नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये     

शरीरानें व्यंग असलेलें चालेल पण धाकता मान, धाकटेपण येऊं नये. कारण धाकटायाची प्रतिष्ठा कोणी ठेवीत नाहीं. त्याला नेहमीं अरे तुरे करतात, कामें सांगतात व हलकें लेखतात, तसें नकटयाचें होत नाही. “जनकोजी शिंदे आपले जागां परम श्रमी जाले कीं, ‘नकटें अस वें परंतु धाकटें असो नये. ‘यत्न कोणाचा चालेना."-भाव ४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP