Dictionaries | References

डोंगर

   
Script: Devanagari

डोंगर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
the hills. As villagers, fleeing from the Penḍhárís or other marauders, were wont to do.

डोंगर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A hill. Used fig. of an arduous work, a heavy calamity &c.
डोंगराचे आंवळे व सागराचें मीठ   Improbabilities become sometimes realities.
डोंगर पोखरून उंदीर काढणें   Much ado about nothing.

डोंगर     

ना.  घाट , टेकडी , पहाड , लहान पर्वत ;
ना.  ढिगारा , ढीग , ढेर , रास .

डोंगर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पर्वत

डोंगर     

 पु. १ लहान पर्वत ; टेकडी ; पहाड ; घाट . २ ( ल . ) मेहनतीचे काम ; काळजी करण्यासारखा आजार ; कर्जाचा बोजा , पाप , गुण , संकट , त्रास यांचे आधिक्य . ३ ( ल . ) काजळाचा गोळा , रास ( भांड्याच्या बुडावर धरलेली ) . ४ ( को . ) डोंगराळ मुलुखांत प्रथम नाचणी पेरलेले शेत . ५ ( कों ) शुष्क ; डोंगराळ प्रदेश ; नाचणी , वरी यांसारख्या पिकांच्या उपयोगी जमीन . [ प्रा . डुंगर ; गु . डुंगर ] ( वाप्र . ) डोंगर खणून ( पोखरुन ) उंदीर काढणे - अचाट परिश्रम करुन त्याची फलश्रुति फारच अल्प झालेली दाखविणे . डोंगरावरुन उडी टाकणे - क्षुल्लक गोष्ट करणे . उदा० हलकी देणगी देणे . डोंगरी दिवा लावणे - ( पेंढारी , लुटारु इ० ना भिऊन ) डोंगरात जाऊन राहणे ; वस्ती करणे . म्ह ० १ डोंगरास दुखणे आणि शिंपीत औषध . २ दुरुन डोंगर साजरा . सामाशब्द -
०कठडा   कठाड कठाडी कांठ किनारा - पु . डोंगराची कड , हद्द , सीमा ; डोंगराच्या पायथ्यांच्या , आसपासचा प्रदेश . डोंगरकठाड्याचे गांवास रान लगत पडले .
०कणगर   कंगर पु . डोंगर पर्वत ; डोंगराळ मुलुख ; टेकड्या .
०करी वि.  डोंगरी ; डोंगरात राहणारे . डोंगरकरी कोण आहेत .... यांची जोराची चवकशी चालू केली . - अस्पृ . ४ .
०कोळी  पु. डोंगराळ मुलुखातील एक जात व तींतील व्यक्ति .
०खिंडी  स्त्री. खिंडीतील अरुंद मार्ग ; घाट .
०गाव   पुन . डोंगरावरील डोंगरामधील गांव . डोंगरत क्रिवि . ( व . ) उत्तरेस , उत्तरेकडेस तो डोंगरात गेला .
०दळे  न. जंगल तोडून लागवडीस आणलेली डोंगरावरील जमीन .
०पठार  स्त्री. डोंगराच्या माथ्यावरचा सपाट प्रदेश .
०रान  न. डोंगराळ प्रदेश . मुलुख .
०वट   डोंगराळ - वि . डोंगरांनी युक्त ; डोंगरी ; डोंगरासंबंधी , खडकाळ , ( प्रदेश ); पहाडी .
डोंगरट   डोंगराळ - वि . डोंगरांनी युक्त ; डोंगरी ; डोंगरासंबंधी , खडकाळ , ( प्रदेश ); पहाडी .
०सरा   सरी - डोंगरांची , टेकड्यांची रांग . डोंगराचे लवण - न . डोंगरातील वळण अथवा वांकण . डोंगरी - स्त्री . १ लहान डोंगर ; टेकडी . २ डोंगरी कापड पहा . - वि . १ डोंगरांवर पिकणारे , होणारे . २ डोंगरांनी युक्त ; डोंगराळ . ३ डोंगरासंबंधी . [ डोंगर ]
०कापड   २ ( ल . ) हलक्या जातीचे व दराचे कापड . इंग्रजीतहि डुंगरी या नावानेच हे कापड प्रसिद्ध आहे .
०ऊंस   डोंगरी - पु . एक जातीचा ऊंस . - कृषि ४५० .
०किल्ला  पु. मुंबईचा फोर्ट जॉर्ज किल्ला .
०बागायत  न. ( कों . ) डोंगराच्या उतारावरील बागाईत .
०मिरी  स्त्री. ( राजा . ) काळी मिरी , मिर्‍यांची एक जात .

डोंगर     

डोंगर खणून (पोखरून) उंदीर काढणें
अचाट परिश्रम पण त्‍याची फलश्रुति फारच अल्‍प.
अल्‍प फायद्यासाठी फार मोठी यातायात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP