Dictionaries | References

गोठ्यांत गेल्‍लें गोरूं शेण केल्‍याशिवाय रावना

   
Script: Devanagari

गोठ्यांत गेल्‍लें गोरूं शेण केल्‍याशिवाय रावना     

(गो.) गोठ्यात गेलेले गुरूं तिथे मलविसर्जन केल्‍यावांचून राहात नाही. गुरांचा स्‍वभाव असा असतो की, रानातून चरून आल्‍यावर त्‍यांना स्‍वच्छ अशा गोठ्यात आणून बांधले की ती ताबडतोब तिथे मलमूत्र विसर्जन करतात. जणूं काय त्‍यांना तो वाळलेला स्‍वच्छ गोठा आवडतच नाही. हीन मनोवृत्तीच्या माणसांचा स्‍वभावहि असाच. तेहि अशीच चांगल्‍या वस्‍तूची खराबी करतात आणि बर्‍या गोष्‍टीलाहि विकृत रूप देतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP