Dictionaries | References

गूळ

   
Script: Devanagari

गूळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Coarse or raw sugar; juice of the sugar-cane inspissated by boiling. Pr. वाण्यानें आपला गूळ चोरून खावा. गुळाचा गणेश or गणपति A term for a mild, easy, assenting, acquiescing fellow: also for a fat, lazy, humorous, happy fellow, a Falstaff. गुळाचा गण- पति गुळाचाच नैवेद्य Making a present to a man out of his own gift. Pr. गूळ नाहीं पर गुळाची वाचा नाहीं? You deny me, but cannot you deny me sweetly? 2 गूळपुऱ्या वाटणें-करणें To make a feasting. Pr. जो गुळानें मरतो त्याला विष कशाला? Why beat him who dies under a look?

गूळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Coarse or raw sugar, juice of the sugar-cane inspissated by boiling.
गुळाचा गणेश, गणपति   A term for a mild, easy, assenting, acquiescing fellow: also for a fat, lazy, humorous, happy fellow, a Falstaff.
गुळाचा गणपति गुळाचाच नैवेद्य   Making a present to a man out of his own gift.

गूळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ऊस, ताड, माड इत्यादी वनस्पतींपासून मिळणारा रस उकळून थंड केल्यावर तयार होणारा घन पदार्थ   Ex. उसापासून गूळ तयार करण्याची क्रिया भारतात प्राचीन काळपासून माहीत आहे
ATTRIBUTES:
गोड
HOLO COMPONENT OBJECT:
तिळवा लाडू
MERO STUFF OBJECT:
रस
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগুড়
gujગોળ
hinगुड़
kanಬೆಲ್ಲ
malശര്ക്കര
oriଗୁଡ଼
panਗੁੜ
sanगुड़ः
tamவெல்லம்
telబెల్లం
urdگڑ

गूळ     

 पु. आटवलेला उंसाचा रस ; पदार्थाला गोडपणा येण्यासाठीं रस आटवून केलेला घन पदार्थ ; साखरेचा कच्चा प्रकार , अवस्था ; तांबडी साखर . [ सं . गुड ; प्रा . गुल ; पाली गुळ ; कों . गोड ; खा . गूय ] ( वाप्र . )
०करणें   उपहास , निंदा करणें .
०देणें   हातीं देणें - १ लालूच दाखविणें ; लांच देणें . २ फसविणें ; भुरळ घालणें ; झुलविणें ; तोंडावर हात फिरविणें .
०पुर्‍या   - हौस पुरविणें . गुळमटणें - १ ( राजा . ) अंबा ; चिंच इत्यादींनीं गुळमट , गोडसर होणें . २ गुटमळणें ; संदिग्ध , अडखळत बोलणें . म्ह० १ गाढवास गुळाची चव काय ? २ जो गुळानें मरतो त्याला विष कशाला ? सामाशब्द -
वाटणें   - हौस पुरविणें . गुळमटणें - १ ( राजा . ) अंबा ; चिंच इत्यादींनीं गुळमट , गोडसर होणें . २ गुटमळणें ; संदिग्ध , अडखळत बोलणें . म्ह० १ गाढवास गुळाची चव काय ? २ जो गुळानें मरतो त्याला विष कशाला ? सामाशब्द -
०आंबा   गुळंबा ळांबा गुळांब - पु . एक पक्वान्न . गुळाच्या पाकांत शिजविलेल्या आंब्याच्या फोडी ; गुळाचा मोरंबा .
०कैरी  स्त्री. ( व . ) गूळ घालून केलेलें बिन मोहरीचें आंब्याचें लोणचें .
०खोबरें  न. ( गूळ आणि खोबरें यांचा खाऊ ). १ ( ल . ) निवळ फसवणूक ; लांच ; लालूच . गुळखोबरें विलोकुनि भलत्याहि जनासि बाळक बळावा । - मो उद्योग ७ . ९ . २ पोकळ भाषण , वचन .
०चट   चीट मट - वि . १ थोडेंसें गोड ; गोडसर . येक्या सगें तें कडवट । येक्या सगें तें गुळचट । - दा ११ . ७ . १६ . २ ( तंजा . ) गोड ; मधुर .
०चट   चीट - गूळसाखर वगैरे गोड पदार्थ . गुळण्णा - पु . ( गो . ) गुळाचा गणपति . [ गूळ + अण्णा ] गुळत्र गुळय - न . गूळ , राब , काकवी यांचा समुदाय . मद पारा गुळत्र । - दा १५ . ४ . १५ . गूळदगड धोंडा - पु . १ गुळाच्या ढेपेंत सांपडणारा दगढ . गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड । - दा ८ . ५ . ४७ . २ ( ल . ) ढोंगी , कपटी मनुष्य .
०धवा   धा धिवा धुवा देवा धेवा धावी - पु . केवळ तांबडा नव्हे , केवळ पांढरा नव्हे असा मिश्र रंग ; गुळी रंग . - वि . अशा रंगाचा ( मोती , इ० पदार्थ ).
०धानी वि.  लालसर ; गुळधवा रंगाचा ( मोती ).
०पापडी  स्त्री. १ एक पक्वान्न ; गुळांत पाकविलेल्या रव्याच्या वडया . २ ( राजा . ) गुळाच्या पाकांत भाजलेली कणीक वगैरे घालून केलेले लाडू . ३ ( ल . ) एखाद्यानें मागें अपराध करून समक्ष गोड गोड , कपटी भाषण करणें ; गुळगुळ थापडी ; गुळमटा ; गुळवणी
०पीठ  न. एकमेकांचा दाट स्नेह ; मेतकूट ; एकी ; सलोखा ; एक विचार .
०पोळी  स्त्री. गूळ घालून केलेली पोळी . गुळमट , गुळंबट - १ गुळचट अर्थ १ पहा . २ ( गो . ) आंबटसर .
०मारी  स्त्री. दर उसाच्या मळयापाठीमागें २२॥ शेर गूळ घ्यावयाचा कर .
०वणी   गुळेणी गुळोणी - न . १ गुळ मिश्रित पाणी . २ ( कु . व . ) गुळाच्या पाण्याचें कालवण ( पोळीशीं खाण्यासाठीं ). यांत कधीं थोडें पीठहि घालतात . [ गूळ + पाणी ]
०वरी   गुळोरी - स्त्री . एक खाद्य , पक्वान्न ; गुरोळी पहा . मांडा साखरपांडा गुळवरी । - एभा २७ . २९० ; - ह १० . ३४ . गुळवा गुळावा गुळवी गुळव्या गुळया गुळरांध्या - पु . गूळ तयार करणारा . [ गुडवाहक ]
०शील   शेल शेलें - न . ( व . ) तांबडा भोपळा उकडून त्यांत दूध , गूळ घालून केलेली खीर . गुळाचा गणपती गणेश - पुवि . १ आळशी ; मंद ; गलेलठ्ठ ; अचळोजी . २ होयबा ; बुळा ; दुर्बळ ; शेणाचा पोहो . म्ह० गुळाचा गणपति गुळाचाच नैवेद्य = वस्तुत : एकच असणार्‍या दोन व्यक्ती ; ज्याचें त्यासच देणें . गुळार गुळहार - गुर्‍हाळ पहा . गुळेरस - पु . ( हेट . ) नारळाचें दूध व गूळ घालून केलेलें पिठाचे गोळे यांचें बनविलेलें एक पक्वान्न .

गूळ     

गूळ करणें
उपहास, निंदा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP