|
न. ( कों .) जुना , कुजका झांप ( नारळीचा ). वि. कठिण ; त्रासदायक ; कंटाळवाणे ; खट्याळ ; खाष्ठ ; द्राष्ठ ; उग्र . ( माणुस , देश , मार्ग , ग्रंथ इ० ). ' झाली दडपणीं खडतर देवता । संचारली आतां निघों नये ॥ ' - तुगा २०१ . ( सं . खरतर ) सामाशब्द - ०औषध न. तीव्र , अमोघ , रामबाण औषध . ०दैव नशीब प्रारब्ध - न . दुदैव ; दुर्भाग्य ०दैवंत न . उग्र . दुराराध्य . कष्टसध्य देवता ( म्हसोबा , नरहरी , वीरभद्र , कालां इ० ) ०बीज न. १ वाईट बीं , मुळ , वाईट कुळ ; हीन कूळ ; २ ( ल .) तिरसट , दुष्ट , खराब माणुस . ०वेळ स्त्री. १ कठिण , दुर्घट प्रसंग , योग , वेळ ( दुपारची तिनिसांजची ). २ कृयोग ( ग्रहांचा , राशींचा ). ०शब्द पु. कठोर , खोंचदार , टोचणारा , बोचक शब्द , भाषण . ०साल न. वाईट वर्ष ; अवर्षण , दुष्काळ , लढाई , रोग , सांथ यांनी युक्त असें वर्ष . ०हत्यार न. भयंकर तीक्ष्ण हत्यार ; शस्त्र . ( संगिनीला तिच्या जखम करण्याच्या स्वरुपावरुन म्हणतात .)
|