Dictionaries | References

कृपण गेली पंढरपुरा। वेशीपासून येई घरा ।।

   
Script: Devanagari

कृपण गेली पंढरपुरा। वेशीपासून येई घरा ।।     

एखादी बाई पंढरपुरास विठ्ठलाचे दर्शन घेण्यास निघाली. पंढरपूरच्या वेशीपर्यंत पोहोचली पण आतापर्यंतच्या खर्चात पंढरपुराला कराव्या लागणार्‍या खर्चाची भर पडणार हे पाहून खर्चाच्या धाकाने वेशीपासून ती परतली. येथपर्यंतचे तिचे कष्‍ट व पैसा निष्‍फळ गेला. तद्वत्‌ एखादी कामगिरी डोक्‍यावर घेऊन अनेक कष्‍ट सोसून ती पूर्णतेच्या जवळ आणावी पण मग थोड्याशा कष्‍टाला भिवून ती मध्येच सोडून देणें, हा अवसानघातकीपणा होय. अशा कमकुवत मनोवृत्तीच्या माणसाला उद्देशून ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP