-
स्त्री. १ ( कठिण ग्रंथावरील ) व्याख्या ; स्पष्टीकरण ; विवरण ; भाष्य ; भाषांतरानें किंवा व्याख्येनें केलेलें अर्थविवरण ; भाषांतर ; टिप्पण अर्थ २ पहा . २ ( ल . ) पाल्हाळ ; विस्तार ; अतिशयोक्ति . ३ ( ल . ) गुणदोषविवेचन ; दोषदर्शन ; ( पाठीमागें केलेली ) निंदा ; कुतर्कानें केलेलें मनस्वी शब्दपांडित्य . [ सं . ]
-
०कार पु. विवरण करणारा ; टीका ( टीपा ) देणारा , करणारा .
-
टीका करणें सोपें परंतु क्रिया करणें कठिण
-
ना. आलोचना , गुणदोष विवेचन , निरुपण , भाष्य , विधायक टीका , विध्वंसक टीका , विवरण , स्पष्टीकरण , समालोचन , समीक्षा ;
Site Search
Input language: