Dictionaries | References

अटकळ

   
Script: Devanagari

अटकळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

अटकळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Conjecture, supposition; rule.

अटकळ     

ना.  अंदाज , अदमास , अनुमान - धक्का , होरा ;
ना.  अनुमान , कयास , तर्क ;
ना.  धारणा , मत , समजूत .

अटकळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अनुमान, अदमास

अटकळ     

 स्त्री. 
अजमास ; अनुमान ; अंदाज ; सुमार ; तर्क ; मत ; कल्पना .
गणित किंवा इतर शास्त्रांतील नियम , सिध्दांत ; रुढ किंवा लौकिकांतील चाल , रीत ( कुस्ती , दांडपट्टा खेळण्याची , घोड्यावर बसण्याची किंवा कोणतीहि विद्या - कला पार पाडण्याची ). [ सं . अर्ध + कल = मोजणें ; सांगणें . हिं . अटकल ; गु . अटकल ; सिं . अटकल ].
०णें   उक्रि .
ज्ञात होणें ; माहीत होणें . गुप्त करो सदसतकृत तत्काळ दहाजणांस अटकळतें ॥ - मोआदि २८ . १ .
अंदाज करणें ; कल्पना , तर्क करणें ; निश्चित करणें - बोलणें - सांगणें . किती आहे तें मला अटकळत नाहीं .
०पंचविशी  स्त्री. आधारावांचून बांधलेला तर्क ; अनुमान धपका ; तर्क ; अजमास ; कल्पना ; तगदमपट्टी .
०बाज वि.  अंदाज करण्यांत तरबेज .
०बांधणें   कल्पना करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP