|
पु. १ ओढ मधील १ , २ , ९ , ११ , १२ हे अर्थ पहा . २ ( दोर , गज ) बळकट व स्थिर करणें . ३ दुसर्य़ा ठिकाणीं लावलेल्या भाताच्या रोपांतून वाळलेल्या पात्या ओढून काढणें ; लावणी केल्यानंतर नवी पात फुटुं लागते तेव्हां जुनी सुकलेली पात काढून टाकितात , हा जो व्यापार तो . ४ घरगुती कामें ; कामाचा रगाडा , ढीग . ( क्रि०ओढणें ). ' सारा दिवस घरांतला ओढा ओढला पाहिजे .' ५ खांब व तुळई यांना बळकटीसाठीं जें एक जोड लाकुड जोडतात ते . ६ ( फोड वगैरेचें ) आकर्षण ; त्यावर देण्याचा औषढीचा लेप . ( क्रि० घालणें ; लावणें ; शेकणें ; धरणें ). ' तुमचे पायाचे सुजेवर चांगला ओढा घाला .' ( सं . उपधा ( वर ठेवणें )- ओढा . भाअ १८३४ ). ७ नारळ , सुपार्या वगैरे एका ठिकाणी जमा करणें . ८ पर्हा ; नाला ; हरळा ; विशेषतः पावसाचा बरड जमिनींतील वाहणारा लहानसा प्रवाह व त्यांचें कोरडें पात्र . ' ओढु ' - पाटण शिलालेख शके ११२८ . ' ओढा वदे तो तरी काय ऐका । ' ९ खोगीराच्या तंगाची अथवा पठाडीची दोरी . १० रहाटाला बैल अगर रेडा जोडण्याकरितां बांधलेल्या जोखडास मागें जो बांबू दोरांनीं बांधून वेसनेकडास जोडलेला असतो तो . ( सं . अवकंर्षक - अउअढअ - ओढारा . ग्रंथमाला ) पु. राशींतून जेवढा कवेंत मावेंल तेवढा गट्ठा ओढून घेण्याचा कुलकर्ण्याचा हक्क . ( ओढणें .)
|