|
पु. पाण्याचा लोंढा ; ओढा . ( का . ओडि = झुळुझुळु वाहणें , झिरपणें ) पु. गोंवर , माती वगैरे घालून तयार केलेली जागा , जसें - अळवाचा ओंडा , भाजीचा ओंडा . ( ओढा ?) वि. खोल ( पाणी इ० ). ओड पहा . पु. १ लांकडाचा ठोकळा , तुकडा , खांड . २ ( कों ) केळीचें लोंगर तोडून घेतल्यानंतर जमिनीवर वाढलेला जो केळीचा भाग असतो तो . हा भाग तोडला म्हणजे त्यालाहि ओंडाच म्हणतात . ३ झाडाचें खोड ; खोडाचा भाग , तुकडा . ४ मूर्ख ; मल्ल . ( का . ओडि = तोडणें , मोडणें ; ओडे = खांड , तुकडा ) ०पट्टी - स्त्री . सरकारी कामासाठीं जे ओंडे कापतात त्याची मजुरी भागविण्यासाठी बसविलेला कर . पु. ग्रामदेवतेपुढें होळीच्या सणांत नाचविण्यात येणारा पोफळीचा दांडा ; शीत . हा ओंडा होळीच्या नेमावर पुरावयाचा असतो . - आडिमहा ३७ . ( ओंडका पहा )
|