Dictionaries | References

अडणें

   
Script: Devanagari
See also:  अडणा

अडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be stopped, detained, hindered, impeded. 2 To work or go tightly, stiffly, hard; to pinch. 3 To stop, decline, refuse; to refrain obstinately. 4 To be restive--a horse. 5 To suffer stoppage in parturition. अडतें or अडलें पाहणें-धरणें-मोजणें g. of o. To behold one's distress or difficulty without relieving it: or to take advantage of one's necessity. As a form of reduplication of अडणें the verb भिडणें is often taken up. Ex. अडलें भिडलें काम असलें तर मला सांग; अडला भिडला कोण्ही आला तर त्याचा समाचार घ्यावा.

अडणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Be stopped. Stop. Pinch. Be restive. To suffer stoppage in parturition.

अडणें     

अ.क्रि.  
 पु. न . अडसर . पण स्वर्गसुखाच्या मंदिराच्या दाराला हा कोर्टिंगचा एवढा अडणा नसता तर फारच चांगलें . - सु १११ . [ सं . अर्गला ; का . अडने = आडवें ]
अ.क्रि.  ( कु .) १ अशक्त होणें . २ खोळंबा होणें ; गरज लागणें . ( का . अड्ड )
प्रतिबंध - अडथळा होणें ; अडकला जाणें ; वेढला जाणें ; खोळंबून राहणें . तरी मग सांग पां कैसेनि अडे । - ज्ञा ६ . ४०१ .
आवळ , घट्ट बसणें ; अडस होणें ; जेमतेम जाणें .
इनकार करणें ; ना म्हणणें ; नाकारणें ; नडून किंवा रुसून बसणें ; हट्ट धरुन बसणें . दोघांचें ( जहाल मवाळ पक्षांचें ) जें कांहीं अडतें आहे तें कांहीं हेतूबद्दल नव्हे , कृतीबद्दल आहे . - टि ३ . २५३ .
प्रसूतींत अडथळा येणें .
दाटणें ; संकटांत सांपडणें - पडणें ; चिमटलें जाणें .
चालतां चालतां थांबणें , स्तब्ध राहणें ; पुढें पाऊल न टाकणें ( गाडी , घोडा इ . ).
वेढणें ; अडविणें ; व्यापणें . सागरें कवणें ठायीं नाहावें हें गगनचि आडे आघवें ॥ - ज्ञा ९ . ११ . म्ह०१ अडली गाय फटके खाय .
अडला नारायण गाढवाचे पाय धरी = प्रसंगीं श्रेष्ठ , शहाण्या माणसास ( नारायणास ) मूर्खाचे पाय धरण्याची पाळी येते . [ का . अड्ड ]. अडतें धरणें , अडल धरणें , अडतें पाहणें , अडतें मोजणें - संकटांत पडलेल्यास मदत न करतां उलटा आनंद मानणें ; किंवा त्याच्या अडचणीचा फायदा घेणें ; एकाद्याला नडविणें . अडला नारायण - अडचणींत सांपडलेला माणूस ( अडला नारायण गाढवाचे पाय धरी या म्हणीवरुन ). अडला भिडला - संकटांत - अडचणींत पडलेला ; त्रस्त . अडल्या भिडल्यासी वेगीं पार पाडूं । - दावि ४२८ . ( अडणें याच्या रुपापुढें भिडणें याची रुपें लागून पुष्कळ शब्द बनतात . उ० अडलेंभिडलें काम असलें तर मला सांग . अडलाभिडला कोण्ही आला तर त्याचा समाचार घ्यावा . ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP