Dictionaries | References

अवघडणें

   
Script: Devanagari

अवघडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be in straits and difficulties. 2 To be awkwardly situated; to be puzzled, posed, nonplus-ed, confounded; to be inops consilii. 3 To be hampered, fettered, clogged; to be embarrassingly engaged or occupied with. 4 To be incommoded or inconvenienced; to be painfully pressed or placed. 5 To be straitened, confined, restrained, hindered, impeded.

अवघडणें     

अ.क्रि.  
अडचणींत - संकटांत सांपडणें , पडणें .
पेचांत सांपडणें ; गोंधळणें ; भांबावणें ; घाबरणें ; मति गुंग होणें .
अडकून राहणें ; खोड्यांत पडणें ; गोत्यांत येणें ; अटकेंत पडणें ; पंचायतींत , तारांबळींत सांपडणें .
एखाद्याची निकड लागणें ; गैरसोय होणें ; नेट लागणें ; तगादा लागणें .
अडचणणें ; अडणें ; अतिशय ताण बसणें ; अडथळा होणें ; कोंडमारा होणें ; कुचंबणें . स्वभाव त्यायोगें अवघडला । - विक ३ . ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुध्दि अवघडे । - ज्ञा २ . ३२७ .
( शरीराचे गात्र ) भारावणें ; मुंग्या येणें ( रक्तप्रवाह बंद झाल्यामुळें ); ताठणें . याला घे , माझा हात अवघडला .
गरोदरपणामुळें भारावणें . शिवनेरीवर सडा शिंपला अवघडल्या तो हातीं - शिवमाय ( स्वातंत्र्य - शार्दुल ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP