Dictionaries | References

अडलें कोल्हें मंगळ गाय

   
Script: Devanagari

अडलें कोल्हें मंगळ गाय     

कोल्हा हा फार लबाड प्राणी मानण्यांत येतो व तो नेहमीं दुसर्‍यास ठकविण्याच्या मार्गांत असतो. तो कधीं चांगला आवाज काढीत नाहीं किंवा कोणाबद्दल बरें बोलत नाहीं. पण अडचणींत सांपडल्यावर त्याचा इलाज नसल्यामुळें मंगल गीत गाणेंहि त्याला भाग पडतें. त्याप्रमाणें मनुष्य अडचणींत सांपडला म्हणजे स्वभावाविरुद्ध गोष्टहि करण्यास तयार होतो. [ एका कोल्ह्यानें आपल्या फायद्यासाठीं सुसरीची मनधरणी तिच्या वर्णनपर गाणें म्हणून केली अशी गोष्ट आहे. ‘ सुस्वरी बाई तुझी पाठा मऊ ’ इ ०. ]
अडणें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP