आरती अनसूयेची - जय शिखरेश्‍वरि भगवंते । भ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


आरती अनसूयेची

जय शिखरेश्‍वरि भगवंते । भवानी अनसूये, माते ॥धृ०॥

कुंकुम-कंकण-सौभाग्ये । अखंडित मंडितविमलांगे

शुभासनिं शोभसि अनुरागें । जडितमणि मखर पद्मरागें

पद्मजात्मज मानसरंगे । गुरु दत्तात्रय माय गंगे

(चाल) महासति देवहुति-तनुजा

कपिल-महामुनिची तूं अनुजा

भवाश्रमिं सिद्धि-तिष्ठती रिद्धि-विपुल समृद्धी

षड्‌गुणालंकृत श्रीमंते । कृपा करि अनुसूये, माते ॥१॥

चित्कलानंदे, अर्धमात्रे । जय जगजननी जगधात्रे

सगुण रुप सुंदर सुपवित्रे । सदा सुप्रसन्न पद्मनेत्रे

ताम्रध्वज तोरण नक्षत्रें । डोलती शिरिं चामर-छत्रें

(चाल) सदानंदोत्सव दिनरात्रीं

वाजती चौघडे वाजंत्री

वेदविद भाट करति बोभाट दाविती वाट

या षट्‌पद पदपद्मातें । कृपा करि अनुसूये, माते ॥२॥

वसति श्रीसिंहाद्रिपकुटीं । सरिता सर तीर्थें कोटी

देवऋषि-हरिहर-परमेष्ठी । अप्सरा अमर तुझ्यासाठीं

गाति गंधर्व कीर्ति मोठी । अशि असे म्हणती वैकुंठीं

(चाल) सिद्ध चिंतामणि कामाक्षी

देव देवेश्‍वर सर्वसाक्षी

महाकालिका-कोरिभूमिका-प्रकट रेणुका

प्रणिता पुण्य संगमातें । कृपा करि अनसूये, माते ॥३॥

भवाटविं जिव झाला कष्टी । विलोकुनि पहा अमृतदृष्टीं

यथा ऋतुकाळीं जळवृष्टी । करोनी करि सुफलित सृष्टी

चालवी धर्म-यज्ञ-इष्टी । देह आरोग्य तुष्टिपुष्टी

(चाल) विष्णुस्वामीची प्रार्थना ही

दयाळे ! अन्य स्वार्थ नाहीं

भेट मज देइ-पाव लवलाही-दिनाचे आई

कृपामृत पाजि कृपावंते । कृपा करि अनसूये, माते॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000