मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|
जय देव जय देव जय श्रीशशिन...

आरती चंद्राची - जय देव जय देव जय श्रीशशिन...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।

आरती ओंवाळूं पदिं ठेउनि माथा ॥ धृ. ॥

उदयीं ह्रदयीं तुझ्या सीतळतां उपजे ।

हेलावुनि क्षीराब्धि आनंदे गर्जे ॥

विकसितकुमुदिनी देखुनि मन तें बहु रंजे ।

चकोर नृत्य करिती सुख अद्‌भुत माजे ॥ जय. ॥ १ ॥

विशेष महिमा तुझा न कळे कोणासी ।

त्रिभुवनि द्वादशराशी व्यापुनि आहेसी ॥

नवही ग्रहांमध्ये उत्तम तूं होसी ।

तुजें बळ वांछिती सकळहि कार्यांसी ॥ जय. ॥ २ ॥

शंकरगणनाथादिक भूषण मिरविती ।

भाळी मौळी तुजला संतोषें धरिती ॥

संकटनामचतुर्थिस पूजन जे करिती ।

संपत्तिसंतति पावुनि भवसागर तरती ॥ जय. ॥ ३ ॥

केवळ अमृतरुप अनुपम्य वळसी ॥

स्थावर जंगम यांचे जीवन आहेसी ॥

प्रकाश अवलोकितां मन हें उल्हासी ।

प्रसन्न होउनि आतां लावीं निजकासी ॥ जय. ॥ ४ ॥

सिंधूतनया इंदु बंधु श्रीयेचा ।

सुकीर्तीदायक नायक उड्डगण जो यांचा ॥

कुरंगवाहनचंद्रा अनुचित हे वाचा ।

गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ॥ जय. ॥ ५ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP