मनोबोधाची आरती - वेदांचे जें गुह्य शास्त्र...
मनोबोधाची आरती
वेदांचे जें गुह्य शास्त्रांचें जें सार ।
प्राकृतशब्दांमाजी केला विस्तार ॥
कर्म उपासना ज्ञान गंभीर ।
ज्याच्या मननमात्रें आत्मा गोचर ॥ १ ॥
जय देव जय देव जय मनोबोधा ।
पंचप्राणें आरती तुज स्वात्मशुद्धा ॥ ध्रु ॥
दोन शतें पांच श्र्लोक हे जाण ।
श्रवणें अर्थें साधक पावति हे खूण ॥
परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण ।
यशवंत सद्गुरु दासाचा प्राण ॥ २ ॥
N/A
N/A
Last Updated : August 30, 2012
TOP