आरती संतांची - आरती संतमंडळी । हातीं घ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


आरती संतांची

आरती संतमंडळी ।

हातीं घेउनिं पुष्पांजुळि ओंवाळिन पंचप्राणें ।

त्याचें चरण न्याहाळी ॥ धृ. ॥

मच्छेंद्र गोरख ॥ गैनी निवृत्तीनाथ ।

ज्ञानदेव नामदेव ॥ खेचर विसोबा संत ।

सोपान चांगदेव ॥ गोरा जगमित्र भक्त ॥

कबीर पाठक नामा ॥ चोखा परसा भागवर ॥ आरती ॥ १ ॥

भानुदास कृष्णदास । वडवळसिद्ध नागनाथ ।

बहिरा पिसा मुकुंदराज । केशवस्वामी सूरदास ॥

रंगनाथ वामनस्वामी । जनजसवंत दास ॥ २ ॥

एकनाथ रामदास । यांचा हरिपदीं वास ॥

गुरुकृपा संपादिली । स्वामी जनार्दन त्यास ॥

मिराबाई मुक्ताबाई । बहिणाबाई उदास ।

सोनार नरहरी हा । माळी सांवता दास ॥ ३ ॥

रोहिदास संताबाई । जनी राजाई गोणाई ॥

जोगापरमानंदसाल्या । शेखमहंमद भाई ॥

निंबराज बोधराज । माथा तयांचे पायीं ॥

कूर्मदास शिवदास ॥ मलुकदास कर्माबाई ॥ ४ ॥

नारा म्हादा गोंदा विठा । प्रेमळ दामाजी ॥

तुकोबा गणेशनाथ । सेना नरसीमहत ॥

तुलसीदास कसांबया । पवार संतोबा भक्त ॥

महिपती तुम्हांपासी । चरणसेवा मागत ॥ ५ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000