मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|
मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन...

नागनाथ आरती - मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन...


नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


मंगलमूर्ती मंगल वदन त्रिनयना ।
करुणा सिंधु देवा जिंतियले मदना ।
भक्त जयजयकारा जय उमारमणा ।
तुजविण मी अनाथ तू अधार या प्राणा ॥
जयदेव जयदेव जय गुरु नागेशा ।
सहजी सहजोदीता व्यापक दशदीशा ।
विश्वरूप देवा तू आधार विश्वेशा ।
प्रतापदिनकरा तुमचा प्रताप ऐसा ॥ध्रु॥
गौरतनु व्यापक हारी भवकंदर कोठारा ।
राया रंका समसुख देशी उदारा ।
चरणदर्शनमात्रे चुकती अजन्म येरझारा ।
हे सेवा सुख द्यावे मज नागेश्वरा ॥२॥
भुजंग भूषण भूषित धुलितांबरशोभा ।
गजचर्मवेष्टोनी उमावल्लभा ।
दीनोद्धार देवा सहजी सुलभा ।
पूर्णनंदे वहल मोहक कर प्रभा ॥३॥
परात्पर तू शिवा आत्मायारामा ।
निर्मल निरूपाध योग्या विश्रामा ।
अखंडित अपरंपरा निरुपम महिमा ।
हे सेवा सुख द्यावे नागेशा आम्हा ॥४॥
पूर्वसंचितफळ हे दृष्टी दिखिलासी ।
धन्यभक्तजन हे स्थिर चरणपाशी ।
हे सेवासुख मागे अज्ञानसिद्ध नागेशी ।
अखंडित मन माझे अवघे तुजपाशी ॥५॥
बापा जयदेव प्रणव प्रकाशा ।
जय जय वडवाळसिद्ध नागेशा ।
जय जय नागेंद्र गुरुपद नागेशा ।
बापा जयदेव ॥ध्रु॥
आदी अनादी अपरंपरा ।
सहजीसहजोदीता परात्परा ।
परब्रह्म गुरु निजनिर्धारा ।
प्रकट सकळा सखया आदिईश्वरा ॥१॥
विश्वरूप तू विश्वनाथा ।
विश्व तुजमधे तू विश्वाचा दाता ।
विश्व खेळविसी तू नागनाथा ।
विश्व तूची तू बा आदि अनंता ॥२॥
विश्वरूप तू विश्वलिंगा
तुझे मस्तकी ती आदि गंगा ।
दर्शनमात्र दोष जाती भंगा ।
ऐसा अगम्य तू नागलिंगा ॥३॥
देवाधिदेवा तू पार न कळे याचा ।
ऐसा प्राचीन कुलदैवत आमुचा ।
अज्ञान विनवी शिवसुत नागेशाचा ।
अखंड वर्णावया दे मज वाचा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP