मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - कुरकुरे कान्हा । गाई गेल्...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


कुरकुरे कान्हा । गाई गेल्या राना

आंबोण आण रे मामा । गाई गुरांना

लागलेला दिवा । मंद त्याची वात

घर झालें शांत । सांज वेळीं

वार्‍याहून हळू । हालवीते झूला

बांधली दोरीला । जुई फुलें

मिटलेल्या मुठी । नको चोखूं आतां

पाजिलें अमृतां । पोटभर

मीट डोळे मीट । वासरासी गाय

हंबरुन काय । सांगे ऐक

अरे माझे डोळे । पेंगाया लागले

खुद्‌कन हांसलें । गालीं कोण ?

N/A

References :

कवी - शिरीष पै

Last Updated : January 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP