मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - काय ही जमीन । त्यांत वाढल...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


काय ही जमीन । त्यांत वाढलें तन । जावें शरन । सद्‌गुरुपाशीं शरन । बाळा जू जू र

एक नांगर । कोरीला डोंगर । आधार मंत्राचा । दोरा पंतगीचा । बाळा जू जू र

दोर धरून । खेळूं अवघेजन । दोहींचे खंडान । नांगराली जमीन । बाळा जू जू र

वज करूं जमिनीची । कुरपा सद्‌गुरुची । झाली पेरनी । आली उगवूनी । बाळा जू जू र

करून राखान । सत्त्वाची गोफन । मन भावें धरून । पिकाची राखान । बाळा जू जू र

तिवडा रवीला । चार वेद जुंपिले । झालं मळण । वारा सुट मंजळ । भक्तरस परमळ ।

झाली आवड । करूं या चडाओडा बाळ जू जू र

गाड्या भरून । उरली आक्षारं दोन । माज्या सद्‌गुरुंनीं जडीलं जडान । पहावं वाचून । बाळा जू जू र

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP