झोप घे रे तान्ह्या बाळा
गोविंदा गोपाळा
आईच्या मांडीवरी डोल डोल डोल रे
डोल डोल डोलतां मंद मंद हांस रे
मंद मंद हांसतां शांत शांत झोप रे
झोपतांना दे पडूं स्वप्न छान रे तुला
गोविंदा गोपाळा
खेळ खेळ खेळुनी शीण आला भरुन
नाच नाच नाचुनी पाय आले दुखून
बोल बोल बोलुनी ओठ गेले सुकून
हांस एकदां तरी मीट पाकळी फुला
गोविंदा गोपाळा
सांवल्या भिंतीवरी झोंपतां पाहूं नको
दुःख छोटें रे फुका आठवूं आतां नको
शांत शांत रात्र ही चाळवूं बाळा नको
रे सकाळीं हांसतां जाग येऊं दे तुला
गोविंदा गोपाळा