आज तो कुठे जिवाचाचोर ! ध्रु०
वादळ गर्जे, विजा चमकती, आलि घनघट घोर. १
रिम् झिम् रिम् झिम् पाऊस पडे, स्मरास आला जोर. २
उंच गोखड्यामधुनि दिसे या सारें काळेंभोर. ३
लपलिं पांखरें, रानिं एकला उंच पुकारी मोर. ४
तटस्थ पानें, तटस्थ रानें, ये राजा जणुं थोर. ५
नाक फुगवुनि कान उभारुनि उभें चित्रसें ढोर ? ६
टवकारुनिया पातीं-कणसें कुणास बघति समोर ? ७
लीन लयीं का तया प्रतीक्षिति, बांधिन कधिं शिरजोर? ८