मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
सामाजिक पाश

सामाजिक पाश

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


प्रेमोत्कर्ष मनें परस्पर जयीं आकर्षितो भूवरी

तेव्हां काय घडे महाकविसही तेंये कसें सांगतां ?

जन्मा प्रेमिजनाचियाच बघणें जाऊनिया तें स्वता;

वंध्येला प्रसवाचिया वद कळा कैशा कळाव्या तरी ?

माळा व्याकुळ ही गळ्यांतिल करी, होई पळाचें युग,

सांगूं काय, अफाट ये जरि नदी दोघांमधें आडवी,

ओढोनी जणुं का लगाम फिरवी भीती तयांना मग.

आशा, प्रीति फळा न येउनि जरी मृत्यूच नेई लया

,

हा हा हा ! मग काय दुर्गति घडे योगें उरे त्या उरीं

होवोनी भडका हलाहलविषें सांगूं कसें तें तरी ?

देवा रे, जगतांत शांतविल का दाहास कांहींहि या ?

सार्‍या रौखयातना पुरवती, दुःसह्य ही दुर्गती !

वैर्‍यालाहि न दे हरी ! कुणि तरी पाडील का विस्मृती ?

N/A

कवी - भा. रा. तांबे

काव्य प्रकार - सुनीत

वृत्त - शार्दूलविक्रीडित

ठिकाण - प्रतापगढ

दिनांक - २९ फेब्रुवारी १९२०

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP