मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
क्षण सुवर्णकण झाले रमणा !

क्षण सुवर्णकण झाले रमणा !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


क्षण सुवर्ण-कण झाले रमणा,

स्पर्शली तुझी न कळत करुना. ध्रु०

स्पर्शक्षम हे सगुण जरी क्षण

कळे न त्यांचें मोल मला पण,

घरीं लोळत जसे रजःकण

तुज रे चिंता अशरण-शरणा. १

मिळे पारखी तुझ्या दयेनें

तो शोधुनि वेंचोनि तयां ने,

हार रचुनि अर्पिला तयानें

रे जनतारूप तुझ्या चरणां. २

दयाघना पारख्या माझिया,

रमण-मंदिरीं रुजू तव दया;

उपकृति गाऊं फुका कासया ?

जाणतो तोच तव थोरपणा. ३

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - नववधू

राग - रामकली

ठिकाण - प्रतापगड

दिनांक - १६ ऑक्टोबर १९२०

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP