मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २| निरोप घेतांना संग्रह २ मातृभूमीप्रत आलें तुझ्या रे दारीं नृपा रे चेटक्या ! प्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं ? रे मानसहंसा ! अनंत-स्तोत्र सामाजिक पाश कोठे शांति, तुझा निवास ? शांतिनिवास चल जळो ज्ञानविज्ञान गड्या ! जीवसंयोग प्रणयप्रभा कुणी कोडें माझें उकलिल का ? जीवनसंगीत मग विसर हवा तर हा क्षण गे ! लोकमान्यांस घट भरे प्रवाहीं बुडबुडुनी बघुनि तया मज होय कसेंसें ! गौप्यमान भयचकित नमावें तुज रमणी ! प्रेमरत्नास तें दूध तुझ्या त्या घटांतलें नववधू प्रिया, मी पावलोपावलीं साउलि ही ! क्षण सुवर्णकण झाले रमणा ! घन तमीं शुक्र बघ राज्य करी ! सोन्याची घेउनि करिं झारी आह्रानशृंग मंदिरीं मना, तव गान भरे या प्रकाशशिखरीं रे अजात अज्ञात सखे जन ! गोंधळाचें घर या वेळीं माझ्या रे रमणा ! गे शपथ तुझी ! नटेश्वराची आरती घातली एकदा अतां उडी ! रुद्रास आवाहन उद्यांची गति पोशाख नवनवा मला दिला ! महा-प्रस्थान घाबरूं नको, बावरूं नको ! आलों, थांबव शिंग ! जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !' निरोप घेतांना मरणांत खरोखर जग जगतें ! उदार चंद्रा ! गाडी बदलली ! किति महामूर्ख तूं शहाजहां ! जीवितसाफल्य आज तो कुठे जिवाचा चोर ? स्वारी कशी येईल ? वैरिण झाली नदी ! निजल्या तान्ह्यावरी कळा ज्या लागल्या जीवा जन म्हणती सांवळी ! फेरीवाला पक्षि पिंजर्यांतुनी उडाला ! दृष्ट हिला लागली ! विरहांतील चित्तरंजन तुझे लोचन घट भरा शिगोशिग निष्ठुर किति पुरुषांची जात ! घट तिचा रिकामा पुनवेची शारद रात कवणे मुलखा जाशी ? निरोप घेतांना भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात Tags : b r tambekavipoemकविताकवीभा रा तांबे निरोप घेतांना Translation - भाषांतर जगाच्या बागेंत फुललें मी फुल, लागली चाहूल प्रेमी लोकां. १ जन जिव्हाळ्याचे भोवती मिळाले; मज सांभाळिलें नानापरी. २ अगे मायभूमी, किती लाडके मी ! अंकीं घेशी प्रेमीं मज दीना. ३ अहा रे वरुणा, वर्षोनी करुणा, पाजिलें जीवना दिसंदीस ४ जगाच्या लोचना, न्हाणोनी किरणीं इंद्रचापवर्णी शृंगारीले. ५ अगा वायुराया, कोवळ्या अंगुली लावोनिया गालीं हासव्लें. ६ जातें ! मज आतां मंगलाचें धाम मूर्त जगत्प्रेम बोलावीतें. ७ घराशीही जातां हुरहूर वाटे, अश्रूपूर दाटे लोचनांत. ८ असें हीन दीन सार्यांचें मी ऋणी, उपेक्षिलें कुणीं नाहीं दीना. ९ नानापरी झाले अपराध कोटी, घालोनिया पोटीं क्षमा कीजे. १० आतां शेवटील परिसा विनंती पायीं डोई अंतीं ठेवीतसें ११ लोभ असों द्यावा आतां पूर्वींपरी, जरी जातें दुरी काळाआड. १२ सारे प्रेमीजन करा बोळवण, पुढे आठवण राहूं द्यावी. १३ N/A कवी - भा. रा. तांबे अभंग - छंद देवद्वार ठिकाण - अजमेर दिनांक - १८ ऑगस्ट १९२१ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP