मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके| बावन्नश्लोकी गुरुचरित्र मराठी पुस्तके शेतकर्याचा असूड अमृतानुभव चरितामृत आनंदलहरी श्री बालाजी वेंकटेश्वर माहात्म्य बालबोध सार्थ श्रीएकनाथी भागवत टीका भाग्योदय श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र चांगदेवचरित्र चतुःश्लोकी भागवत दासबोध गीत दासायन श्रीदासोपंतचरित्र समग्र दिवाकर ज्ञानेश्वरांचे काव्यालंकार श्रीज्ञानेश्वरांची गाथा श्रीज्ञानदेवतेहत्तिशी ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ज्ञानोदय भजनी मालिका एकादशी महात्म्य श्रीकृष्ण - कथामृत तुकाराम बाबा अभंग संग्रह समश्लोकी भगवद्गीता गीताई गीतापद्यमुक्ताहार ग्रामगीता हंसपद्धती श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हरिवंश हरिविजय हस्तामलक कथाकल्पतरू कुशलवोपाख्यान सार्थ लघुवाक्यवृत्ती लीळा चरित्र गीत महाभारत मयूर भरत्सार श्री नक्षत्रस्वामी चरित्र प्रायश्चित्तमयूख रुक्मिणीस्वयंवर सामराजकृत रुक्मिणीहरण संकेत कोश श्रीसंतएकनाथ गाथा सती हृदय शुकाष्टक श्यामची आई श्री सिद्धारूढस्वामी चरित्र स्वात्मसुख स्त्रीशिक्षा प्राकृत मनन संत तुकाराम गाथा वेदस्तुति विवेकचूडामणि विवेकसार यशवंतराय महाकाव्य बावन्नश्लोकी गुरुचरित्र चिरंजीवपद बावन्नश्लोकी गुरुचरित्र श्री गुरुचरित्र फार मोठे असल्यामुळे दर गुरुवारी हे बावन्नश्लोकी गुरुचरित्र म्हणावे. Tags : gurucharitraगुरुचरित्र बावन्नश्लोकी गुरुचरित्र Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीमद्दत्तात्रेयगुरवे नमः । अथ ध्यानम् ।श्लोक: दिगंबरं भस्मसुगंध लेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च । पद्मासनस्थं रविसोमनेत्र्म दत्तात्रयं नमभीष्टसिद्धिदम् ॥१॥काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् । चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥२॥कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः । द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॥३॥ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जयजयाजी लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१ ॥श्लोक॥त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरीं वास करुनि बोजा । सद्भक्त तेथें करिती आनंदा । त्या देव स्वर्गीं बघती विनोदा ॥२॥जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णंवातुनी । संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कुडें केलें ॥३॥ऐशी शिष्याची विनंती । ऐकूनि सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणीं ॥४॥भक्तजन रक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सगरपुत्रा कारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळीं ॥५॥तीर्थें असती अपार परी । समस्त सांडूनि प्रीति करी कैसा पावला श्रीदत्तात्री । श्रीपादश्रीवल्लभ ॥६॥ज्यावरीं असे श्रीगुरुची प्रीति । तीर्थमहिमा ऐकावया चित्तीं । वांछा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति गुरुराया ॥७॥गोकर्णक्षेत्रीं श्रीपादयती । राहिले तीन वर्षें गुप्ती । तेथूनि गुरु गिरिपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥८॥श्रीपाद कुरवपुरीं असताम । पुढें वर्तली कैसी कथा । विस्तारुनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥९॥सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी । अनंतरुपें परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥१०॥सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची॥ ११॥श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भंरवसा जीवित्वाचा ॥१२॥श्रीगुरुचरित्र कथामृत । सेवितां वांछा अधिक होत । शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपासिंधु ॥१३॥ऐकूनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता झाला विस्तारें ॥१४॥ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली परियेसी ॥१५॥विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत । सांग स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥१६॥ऐक शिष्या नामकरनी । श्रीगुरुभक्त शिखामणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली निर्धारें ॥१७॥ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं कथामृत संजीवनी । आणिक निरोपाची दातारा ॥१८॥अज्ञान तिमिर रजनींत । निजलो होतो मदोन्मत्त । श्री गुरुचरित्र वचनामृत । प्राशन केलें दातारा ॥१९॥स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरीं असती जाण ॥२०॥सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका । उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेंत जननीसी ॥२१॥तुझा चरणसंपर्क होता । झालें ज्ञान मज आतां । परमार्थीं मन ऐकतां । झालें तुझें प्रसादें ॥२२॥लोटांगणें श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्तीसीं । नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥२३॥शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी । ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥२४॥सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला । सांगतां न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥२५॥श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमू रे युक्तीसी । वेदांत न कळे ब्रह्मायासी । अनंत वेद असती जाण ॥२६॥चतुर्वेद विस्तारेंसी । श्रीगुरु सांगती विप्रासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥२७॥नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । उल्हास होतो माझे मानसीं । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥२८॥पुढें कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्रीं । निरुपावें विस्तारीं । सिद्धमुनी कृपासिंधू ॥२९॥श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्हीं पाजिला आम्हांस । परि तृप्त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥३०॥सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥३१॥पतिव्रतेच्या रीती । सांगे देवांसी बृहस्पती । सहगमनाची फलश्रुती । येणें परी निरुपिली ॥३२॥श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारुनि आम्हांसी । निरुपावें स्वामिया ॥३३॥श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषि । तया काश्मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥३४॥पुढें कथा कैसी वर्तली । विस्तारुनि सांगा वहिली । मति असे माझी वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥३५॥गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु । सांगतां न ये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥३६॥ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजनां कल्पतरु । सांगतां झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥३७॥आत झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्रभाग सांगें श्रीगुरुचा । माझें मन निववीं वेगीं ॥३८॥सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । साठ वर्षें वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥३९॥सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तलें आणिक ऐका । वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥४०॥जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक या भवार्णवांतुनी । नाना धर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिलें ॥४१॥मागें कथा निरुपिलें । सायंदेव शिष्य भले । श्रीगुरुंनीं त्यासी निरुपिलें । कलत्रपुत्र आणि म्हणती ॥४२॥श्रीगुरु म्हणती द्विजांसी । या अनंत व्रतासी । सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वीं बहुतीं आराधिलें ॥४३॥श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरुभवन । आपण नये आतां येथून । सोडूनि चरण श्रीगुरुचे ॥४४॥तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख । सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥४५॥गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति झाली अपारु । लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥४६॥सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र । ऐसें हें श्रीगुरुचरित्र । तत्त्परतेसी परियेसा ॥४७॥श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी । मार्गांत शूद्र परियेसी । शेतीं आपुल्या उभा असे ॥४८॥त्रिमूर्तींचा अवतार । वेषधारी झाला नर । राहिलें प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनियां ॥४९॥तेणें मागितला वर । राज्यपद धुरंधर । प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥५०॥राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावें म्हणूनियां ॥५१॥म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट साधेल ॥५२॥इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णम्॥ N/A References : N/A Last Updated : August 07, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP